कधी कधी,
उगाचच एकटं वाटायला लागतं... भोवताली वर्दळ असूनही एकटंच मन कुढत राहतं.... आणि अगदी, अगदी त्याचवेळी मैत्रिणीचा व्हॅट्स अँप येतो.. कशी आहेस? missing you... आणि मग, मन फुलपाखरू होऊन बालपणात फिरून येतं...
कधी कधी,
वाटतं.. आपली कदरच नाही कोणाला.. हाऊस वाइफचा शिक्का मारून गृहीतच धरलं जातं आपल्याला... आणि अगदी, अगदी त्याचवेळी फोन येतो.. आज भाजी मस्त झाली होती... आणि मग, दिवसच नाही तर मन पण उजळून जातं...उगाचच एकटं वाटायला लागतं... भोवताली वर्दळ असूनही एकटंच मन कुढत राहतं.... आणि अगदी, अगदी त्याचवेळी मैत्रिणीचा व्हॅट्स अँप येतो.. कशी आहेस? missing you... आणि मग, मन फुलपाखरू होऊन बालपणात फिरून येतं...
कधी कधी,
कधी कधी,
स्वतःचच अस्तित्व संपल्या सारखं वाटतं... नानाविविध मुखवट्यात हरवायला होतं... आणि अगदी, अगदी त्याचवेळी लेक गळ्यात पडून म्हणते... you are the most beautiful person on the earth... आणि मग, आळणी जगणं जाबराक बनून जातं....
कधी कधी
एकदम असुरक्षित वाटायला लागतं... शेजारचा माणूस ही आतंकवादी वाटतो... आणि अगदी, अगदी त्याचवेळी अनोळखी माणूस मदतीचा हात पुढे करतो.... आणि मग, माणुसकीवर विश्वास बसतो... जगणं सुंदर होऊन जातं ....
कधी कधी,
वाटतं... आयुष्य हे क्षणभंगुर आहे... खूप काही करायचे आहे.... आणि अगदी, अगदी त्याचवेळी 'बाबू मोशाय जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए' ऐकू येतं.... आणि मग, वाटतं आधी मनसोक्त जगून घ्यावं...
-मी मधुरा...
६ मे २०१८