रितेपणातील समृद्धपण मंद सुवासाने दाखवून देतो
इवलीशी, नाजूक, नक्षत्रांसारखी ही फुले त्यांचा भार असा कितीसा असणार? आपल्या फुलांचा सडा टाकून बकुळ रिकामा झाला असला तरी रिता नक्कीच नाही होत... रित होण्यासाठी रिकामपण अंगी असावं लागत... हे रिकामपणं त्याच्याकडे नक्कीच नाही. त्याला उद्यासाठी तेवढ्याच कळ्यांना खुलवायचंय.... फुलांना फुलवायचंय.... प्रत्येक फुलात सुगंधाची कुपी लपवायचीये...
मला हा बकुळ तटस्थ योगी सारखा वाटतो. ज्या क्षणी त्याची फुलं फांदीपासून सुटतात, त्या क्षणी तो त्या फुलांवरचे सारे हक्कही सोडतो... आजची फुललेली सारी फुलं, वर्तमानाच्या त्या क्षणाला वाहून तो मोकळा होतो... त्या फुलांमध्ये तो गुंतून नाही पडत.... म्हणून त्याला विरहाच दुःखच नाही... आणि रितेपणाची भावना ही नाही... तेथे असते ती फक्त बहरण्यातली परिपूर्णता आणि 'देण्या'तलं समाधान.
आपल्याला ही आयुष्य असंच जगता आलं तर? प्रत्येक क्षण पूर्णपणे जागून, वर्तमानाला अर्पण करता आला तर?! जगलेल्या प्रत्येक क्षणातून मोकळ होता आल तर?! गेलेल्या क्षणात गुंतून न राहता पुढचा नवा क्षण खुलवायला, फुलवायला, नव्याने सज्ज होता आले तर?! फक्त आपलंच नाही तर इतरांचही आयुष्य सुगंधी करता आले तर?!
जमेल का आपल्याला असं 'बकुळ' व्हायला?
-मी मधुरा...
१० जून २०१८