Friday, March 8, 2019

Happy Women's Day!!!

Happy Women's Day!!!💞
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
ज्याच्या असण्यामुळे महिलादिन साजरा करण्याला महत्व आहे 'असा तो'.. त्याला पण महिला दिनाच्या अनेक शुभेच्छा!! 

असा तो..
जो मला प्रोत्साहन देतो
जो मला चांगली वागणुक देतो
जो मला अनेक गोष्टीत मदत करतो
कारण 'तो' मला समजावून घेतो!!
असा तो..
ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे
ज्याच्याबद्दल मला खूप आदर वाटतो
ज्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो
कारण 'तो' माझ्या सदैव पाठीशी असतो!! 
'असा तो' कोणी 'एक' व्यक्ती नसून माझ्या आयुष्यात आलेला 'तो' प्रत्येक पुरुष आहे ज्यांच्यामुळे माझं जीवन सोप्पं, सुसह्य आणि समृद्ध झालंय!! 
मुलगी, बहीण, मैत्रीण, बायको आणि सून अश्या एकाच वेळी विविध भूमिका साकारताना एक स्त्री म्हणून ज्यांच्यामुळे मानाने जगता येतंय त्या सर्व पुरुषांचं खूप कौतुक आणि खूप खूप आभार!! तुमच्या असण्यामुळेच माझं असणं आहे!!! 
Thanks for always being there..!! 💖



-मी मधुरा..
८ मार्च २०१९