पहिला lockdown संपत असतानाच एके दिवशी सकाळी व्हाट्स अँप वर दीपकचे फॅन्सी PPE किट मधले फोटो, एअर प्युरिफायर लावून सज्ज असलेली OPD पहिली आणि रोजच्या कामाला लागले.. काम करता करता डोक्यात विचार आला, हे नक्की काय पहिले मी? दीपक अश्या ऍस्ट्रोनॉट किट मध्ये? कामात लक्ष लागेना.. म्हणून परत दिपकची पोस्ट नीट वाचली आणि लगेच त्याला मेसेज पाठवला.. सगळे ठीक आहे ना?.. काळजी घे.. पण डोक्यातून काही ते फोटोज जाईनात.. आता पहिल्यांदा COVID नामक मॉन्स्टर ची भीती वाटू लागली.. मग डोळ्यासमोर एक एक अत्पस्वकिय डॉक्टर्स, ह्या किट मध्ये दिसू लागले तशी अजुनी भीती, काळजी ह्यांनी मन घेरलं.. लांब असले कि जरा जास्तच जाणवते हेच खरे.. लगेच बाकीच्यांना फोन लावले.. त्यांचे ही त्यांच्या गरजे प्रमाणे OPD प्रोटोकॅल्स सेट करणे सुरु होते.. आपलं कोणी तरी अश्या परिस्थितीत स्वतःच्या जीवाशी खेळते आहे पाहून, न राहून ठणकावून विचारालेच.., "का सुरु केलीस OPD?, का रिस्क घेतो आहेस?, नाही काम केलेस तरी छान बसून खाशील इतके मिळवले आहेस ना?, दुसरे कोणी ..." आणि माझी मलाच लाज वाटली.. समोरून आवाज आला.., "दुसरे कोणी नाही म्हणून 'मी'.. असे नाही, हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे.. आणि मला हे मनापासून करायचे आहे.. ह्यात पैसे मिळवणे हा उद्द्येश आत्ता तरी नाही.." 'काळजी घे' म्हणून मी फोन बंद केला..
मग रोजच एक दोन चौकशीचे फोन होऊ लागले.. खूपदा VDO कॉल्सच.. शब्द बोलत नाहीत तेव्हा चेहरा बोलतो अशी आपली माझी समजूत.. आज OPD आहे का? किती पेशंट आहेत? Surgery आहे का? कोणत्या hospital ला?.. असे काही ठराविक मोजके प्रश्न.. समोरून अगदी शांतपणे माझ्या प्रश्नाची उत्तरे यायची.. आवाजात ना भीती, ना आपण कोणी ग्रेट आहोत ही भावना.. एकमेकांच्या डोळ्यात पाहून मूकपणेच आधार दिला जायचा.. कश्यापासून बनली आहेत ही माणसे? इतकी तठस्थ कशी राहू शकतात? भावना बोथट होतात का ह्यांच्या? परिणामांची कल्पना असताना, आपल्याला, आपल्या कुटुंबाला जीवाचा धोका असताना, हे काम करताना त्यांच्या मनात नेमकं काय सुरु असतं? मग ते हे सगळं चेहऱ्यावरून, शब्दातून का नाही व्यक्त करत?.. आता तर परिस्थिती अजुनी बिकट झाली आहे.. कोणत्याही डॉक्टरला कधी ही COVID सेंटर्स ना ड्युटी लागू शकते.. OPD, OTs बरोबर आता कम्पल्सरी आठ तासाची एक्सट्रा ड्युटी.. म्हणजे आता डायरेक्ट COVID च्या एरियात जाऊन लढायचे.. इतके सगळे करून पेशंटचे बरे वाईट झाले तर?? डॉक्टर ला ही वेगळी भीती आहेच.. अश्या परिस्थितीत सुद्धा ह्यांनी माणूसपण जपून ठेवले आहे.. हिपोक्रेटीक ओथ घेतलेले पांढऱ्या कोटातील हे मावळे अकर्मी योगीच.. नाही का?.. ह्या मावळ्यांचा मला सार्थ अभिमान वाटतो..
खरचं सात आठ महिन्यापूर्वी ह्यातील कित्त्येक गोष्टी आपल्याला माहिती ही नव्हत्या.. चायना, UK, America असा प्रवास करत, हा पाहुणा, कधी मुंबई, पुणे आणि आता चक्क आपल्या दारात उभा ठाकला कळालेच नाही.. सुरुवातीला lockdown ची मजा घेत dalgona coffee, नथीचा नखरा अशी वेगवेगळी challeges दिमाखात status वर झळकत होती, आता ती जागा boredom ने घेतली आहे.. सुरुवातीला प्रशासनाने घालून दिलेली chillout वाटणारी चौकट आता जाचक वाटू लागली आहे.. घालून दिलेल्या चौकटीत राहून new normशी जुळवून घेणाऱ्या, लहान मोठ्ठ्या शिलेदारांनी, ह्या चौकटी बाहेर जाऊन काम करणाऱ्या Front Line Heros, Warriors ना कधी टाळ्या तर कधी थाळ्या वाजवून, कधी दिवे उजळवून तर कधी पुष्पवृष्टी करून मानाची सलामी दिली.. त्यात ही एक वेगळा जोश, उत्साह, एकी पाहायला मिळाली.. पण आता सगळीकडे एक भीतीचे, नैराश्येचे सावट दिसते आहे..
असो.. अश्याही वातावरणात आपण घरी safe राहू शकतो ते ह्या Front Line Heros मुळे.. त्यात अगदी डॉक्टर्स, समाजसेवक, प्रशासन, पोलीस खाते या पासून ते बँक कर्मचारी, वाणी, दूधवाला, पेपरवाला सगळे सगळे आले.. माझ्या शाळेच्या ही ग्रुप मध्ये दीपक, चारू, पत्की सारखे डॉक्टर्स, ground level वर काम करणारी सरपंच सुनीता भोपे, जगण्यातील व्हिटॅमिन M जपणारी म्हणजेच बँकेत जॉब करणारी ललिता खलाटे ह्या front line heros बरोबर रक्तदान शिबीरसारखे उपक्रम आयोजित करून खारीचा वाटा उचलणारा महादेव.. यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.. guys thank you so so much.. तुम्ही बाहेर काम करता म्हणून, आम्ही आखून दिलेल्या चौकटीत का असेना, घरी स्वस्थ राहू शकतो.. तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा.. I Love You... love you all... and Happy Friendship Day!!
ही कविता तुम्हा सर्वांसाठी..
माझा लढा..
दख्खनच्या मावळ्यांना अश्या लढ्याचे काही वाटतच नाही..
हर हर महादेव म्हटलं कि रक्त कसं उफाळून येतं आणि
मग गनिम काय आणि यम काय सपशेल हार मानून जातं...
पण आजचा हा लढा काही वेगळाच आहे..
हा लढा आहे तो मानवता जपण्याचा, संकटे परतवण्याचा
माणसे जगवण्याचा आणि शांतता राखण्याचा..
पावित्र्य राखण्यासाठी, जगावरल्या प्रीतीसाठी संगरात झोकून देण्याचा..
खरचं, हा लढा काही वेगळाच आहे..
हा लढा आहे तो त्या न दिसणाऱ्या करोनाशी, रोज नवनवीन मिळणाऱ्या माहितीशी..
दोन वेळच्या भाकरीशी आणि लहानग्यांच्या चेहऱ्यावरील अनेक प्रश्नांशी..
मोठ्यांच्या डोळ्यातील काळजीशी, हा लढा आहे स्वतःचाच स्वतःशी..
पण हा वेगळा लढा मी लढते आहे..
झाकून घेऊन स्वतःचा चेहरा, बुरखा मनावरचा फेडला..
स्वतःची तमा तर नव्हतीच पण काळजीला ही जागा नव्हती..
माझ्या कर्तव्याने मला निवडले होते, चिलखत घालून धाडले होते..
मग निघाले तडक लढायला, मानवतेला जपायला..
एकजुटीची मशाल हाती घेऊन, ह्या देशाचा मावळा होऊन...
ह्या देशाचा मावळा होऊन, हा लढा मी लढते आहे, हा लढा मी लढते आहे...
-मी मधुरा..
२ ऑगस्ट २०२०