गावाबाहेरचा तो डोंगरमाथा.. हा डोंगर आणि गावाला वेढा घातलेली नदी.. ही दोन मौल्यवान आभूषणं गावाची!!..
गाडी डोंगराच्या दिशेने वळली आणि त्याचे मन बालपणात.. कितीतरी आठवणी आहेत ह्या डोंगराच्या.. मित्रांबरोबर सायकलवरून "तो" इकडे यायचा.. मनात "ती"चे नाव घेत.. मनात "ती"चे नाव ठेवून न थांबता डोंगरमाथ्यावर पोचता आले तर "ती" नक्की मिळते, हा त्या मित्रांचा समज.. आणि जेव्हा असे झाले, तेव्हाच त्याने ठरवले, "ती"ला घेऊन इकडे नक्की यायचे.. आणि आज "ती" त्याच्या बरोबर होती..
गाडीत बसून "तो" आणि "ती" निघाले खरे, पण काय बोलायचं, कुठून सुरुवात करायची हेच कळत नव्हतं.. काहीतरी जुजबी संभाषण सुरु होतं .. पठारावर गाडी लावून "तो" आणि "ती" मनोऱ्याच्या दिशेने चालू लागले.. चढावर त्याने दिलेला हात अजुनी ही तसाच तिच्या हातात होता, तो उबदार स्पर्श खूप काही सांगत होता.. धुंद गारवा, मावळतीला चाललेला सूर्य आणि हातात हात घेऊन बसलेले "तो" आणि "ती"... मनातल्या भावना सांगायला एकदम पिक्चर परफेक्ट सिच्युएशन... पण दोघे शांत होते.. कदाचित शब्दांपेक्षा असं त्यांचं एकमेकांबरोबर असणंच आज महत्वाचं होतं.. हरवलेलं गावसल्याचं स्पर्शानंच जणू कबूल केलं होतं..
अंधार पडू लागला तसं "तो" आणि "ती" भानावर आले.. जड पावलांनीच गाडीकडे निघाले..
आता पुढे काय? हा विचार "ती" करत असतानाच "तो" म्हणाला, "हा हात असाच माझ्या हातात आयुष्यभर हवा आहे.. पण आत्ता सोडशील??.. मला ड्राइव्ह करायचंय.." इतकं बोलून त्यानं हळूच "ती"च्या हातावर आपले ओठ टेकवले.. "ती" मोहरून गेली... क्षणभरच त्याच्या हातांचा वेळखा "ती"च्या भोवती पडला..
चाहे तुम कुछ ना कहो, मैने सुन लिया
के साथी प्यार का मुझे चुन लिया, चुन लिया...
.... एक शांत, आल्हाददायी संध्याकाळ एकदम जादुई होऊन गेली.. अचानक हवेत हवाहवासा वाटणारा गारवा आला.. वाऱ्याच्या झुळूके बरोबर "ती"चा दुपट्टा हवेत उडू लागला.. मनात प्रेमाची चंद्रकोर आणि डोळ्यात स्वप्नांच्या असंख्य चांदण्या लुकलुकू लागल्या..
"हा हात असाच आयुष्यभर हातात हवा आहे.. ' ... प्रेमाचे पहिले शब्द.. ये किसी नशेसे तो कम नही थे.. ही प्रेमाची पहिली धुंदी.. ये पहला नशा..
प्रेमाची ही पहिली कबुली.. आणि ह्या कबुलीचा असर.. हा 'खुमार' दोघांच्या ही डोळ्यांत.. ह्या शिवाय दुसरं सुंदर काय असू शकतं??..
💕💕💕💕💕
गाडी पूढे जात होती... आणि 'तो' आणि 'ती' मात्र अजुनी त्या धुंद क्षणात रेंगाळत होते..
त्याचं मन "ती"च्या दुपट्याबरोबर हेलकावे घेत होतं.. सगळं स्वप्नवत वाटावं असं.. 'प्रेमाची कबुली', 'प्रेमाचा इजहार' सारं कल्पनातीत... शाळेत असल्यापासून "ती"ला 'I Love You' म्हणण्याची केलेली प्रॅक्टिस.. अनुभवलेले ते रोमांच.. आणि आज ते 'ढायी अक्षर प्रेम के..' न बोलताच केलेला प्रेमाचा इजहार... आणि आता "ती"चा हात हातात घेऊन, तिच्या बरोबर सारा आसमंत कवेत घ्यावं.. असं काहीसं असणारं feeling..
उड़ता ही फिरूँ इन हवाओं में कहीं
या मैं झूल जाऊँ इन घटाओं में कहीं
एक कर दूँ आसमान और ज़मीं
कहो यारों क्या करूँ, क्या नहीं
इतकी वर्ष मनात जपून ठेवलेलं प्रेम आज व्यक्त झालं होतं.. सगळ्यांना ओरडून सांगावसं वाटत होतं.. "Yes!!! I'm in Love.. We are in Love.. ".. एकतर्फी प्रेमाची, अव्यक्त भावनांची, एकाकीपणाची मधली सारी वर्षे अचानक धूसर होऊन गेली..
त्यानं "ती"च्याकडं पहिलं..
त्यानं धरलेला हात हृदयाशी ठेवून, "ती" डोळे मिटून बसली होती.. क्षणभर "ती"च्या डोळ्यांच्या कडा पाणवल्याचा भास त्याला झाला. "तो" काही बोलणार इतक्यात "ती"ने तिचा हात, गियर बॉक्स वरील त्याच्या हातावर अलगद ठेवला.. "ती"च्या मिटलेल्या डोळ्यातून काही अश्रू गालावरून ओघळले. आणि त्यांनी थेट त्याच्या काळजाचा ठाव घेतला.. ही प्रेमाची अनुभूती, हा क्षण त्याला रंध्रारंध्रात सामावून घ्यायचा होता.. त्यानं क्षणभर डोळे मिटले आणि खोलवर श्वास घेतला..
दोघं ही निशब्द..
त्याला आठवत होती ती मनोऱ्याकडून हातात हात घेऊन चालत येताना एकत्र पडणारी त्यांची पावलं.. त्याच्या आयुष्यात "ती"च येणं.. आणि ही साथ, ही सोबत अशीच हवी आहे हे त्याचं सांगणं...
ह्या शांततेत गाव कधी आलं दोघांनाही कळालं नाही.. "ती"नं डोळे उघडून त्याच्याकडं पाहिलं.. प्रेमानं, विश्वासानं भरलेली ती नजर.. उफ्फ..
"जाऊया ना?".. "ती"च्या प्रश्नाने "तो" भानावर आला.. "हं... "... असं म्हणत त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेऊन गालावर हलकेच ओठ टेकवले..
उसने बात की कुछ ऐसे ढंग से
सपने दे गया वो हज़ारो रंग के
रह जाऊँ जैसे मैं हार के
और चूमें वो मुझे प्यार से
पुढे कित्येक वेळ, "तो" आणि "ती" प्रेमाचा पहिला नशा, पहिला खुमार अनुभवत, हातात हात घेऊन तसेच बसून होते..