कवितेशी खरी ओळख झाली ती अकरावीत, आमच्या 'कुलकर्णी बाई' मुळे.. त्यापूर्वी पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमाला आहेत तितक्याच कविता वाचल्या जायच्या. त्यांच्यामुळे अभ्याक्रमाबाहेरच्या कविता वाचायला लागले.. त्यावर चर्चा करायला लागले. शब्दांशी खेळायची सवय त्यांनीच लावली. त्यांच्या प्रोत्साहनामुळे कविता कराव्याश्या वाटू लागल्या.
त्यांनी दिलेल्या ओढ ह्या विषयावर मी केलेली माझी पहिली कविता ....
चंद्रशेखर गोखले त्यांच्या चारोळ्यांनी मनात घर केले. त्यांचे चार ओळीत व्यक्त होणे आवडू लागले.
नंतर कॉलेज मध्ये मैत्रिणी हि अश्या मिळाल्या कि ज्या कवितांमध्येच जगतात. काही जणींच्या कविता तर कॉलेजच्या काचपेटीत दिमाखात लटकायच्या, कॉलेज स्मरणिकेत झळकायच्या.. मी मात्र नेहमी माझ्या पुरतेच लिहीत राहिले.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मेमरी बुक मध्ये पाहल्यांदाच माझी कविता मी मैत्रिणीसाठी लिहिली.
ग्रॅजुएशन नंतर प्रत्येकीचे मार्ग बदलले. नवीन कोर्स, नवीन मित्रमैत्रिणी मध्ये कविता मागे पडते कि काय असे वाटत असतानाच मनातल्या खास कोणासाठी तरी लिहायला सुरुवात झाली.
महेशला भेटले, लग्न झाले त्यावेळच्या भावना कवितेतून व्यक्त नाही झाल्यातरच नवल होते..
लग्नानंतर कवितांची जागा उखाण्यांनी घेतली. नवीन संसार, नवीन जबाबदाऱ्या ह्या सर्वात कविता कुठे विरून गेली कळलेच नाही. परत तिच्याशी भेट झालीच नाही. पण आता लवकरच भेटेन...
-मी मधुरा...
त्यांनी दिलेल्या ओढ ह्या विषयावर मी केलेली माझी पहिली कविता ....
चंद्रशेखर गोखले त्यांच्या चारोळ्यांनी मनात घर केले. त्यांचे चार ओळीत व्यक्त होणे आवडू लागले.
नंतर कॉलेज मध्ये मैत्रिणी हि अश्या मिळाल्या कि ज्या कवितांमध्येच जगतात. काही जणींच्या कविता तर कॉलेजच्या काचपेटीत दिमाखात लटकायच्या, कॉलेज स्मरणिकेत झळकायच्या.. मी मात्र नेहमी माझ्या पुरतेच लिहीत राहिले.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मेमरी बुक मध्ये पाहल्यांदाच माझी कविता मी मैत्रिणीसाठी लिहिली.
ग्रॅजुएशन नंतर प्रत्येकीचे मार्ग बदलले. नवीन कोर्स, नवीन मित्रमैत्रिणी मध्ये कविता मागे पडते कि काय असे वाटत असतानाच मनातल्या खास कोणासाठी तरी लिहायला सुरुवात झाली.
महेशला भेटले, लग्न झाले त्यावेळच्या भावना कवितेतून व्यक्त नाही झाल्यातरच नवल होते..
-मी मधुरा...
No comments:
Post a Comment