My precious Daughter behind the wheel of thousands of pounds of motorized steel...
बापरे!! ह्या विचारानेच पोटात खड्डा पडतो..
आता, लवकरच ती 'एकटी' कार घेऊन जाईल.. roads, freeways, byways.. स्कूल, मॉल्स, सिनेमा हॉल्स, क्लासेस.. एक हवेहवेसे वाटणारे स्वातंत्र्य..
नको.. ह्या विचारात सुद्धा एक विचित्र दहशत जाणवते.. ही भीती, ही दहशत नेमकी कसली आहे? ह्या बाहेरच्या जगात ती एकटी असेल याची का तिला आता माझी गरज नाही याची?..
मुलांवर, त्यांच्या संस्कारांवर किती ही विश्वास असला तरीही, प्रत्येक नवीन टप्प्यावर, एक पालक म्हणून आपलं मन साशंक होतंच.. असे अनेक टप्पे असतात जिथं helpless, असुरक्षित, भयभीत, out of control वाटतं.. वेळोवेळी त्यातून मार्ग काढला ही जातो.. आणि हीच पालक म्हणून 'growing-up' process असते..
🚗 🚗 🚗 🚗 🚗 🚗 🚗 🚗 🚗 🚗
त्याचे असे झाले की, पंधराव्या वाढदिवस झाला आणि लेकीने कार शिकण्यासाठी 'learning permit' काढले.. आणि ह्या सगळ्या विचारांनी मला पोखरायला सुरुवात केली.. खरंतर मी सुद्धा सोळा-सतराव्या वर्षी कार चालवायला शिकले होते.. पण इथे लेक अजुनी लहान वाटत होती.. 😁 motherly concern दुसरे काय?.. माझी एकंदरीत परिस्थिती पाहता, लेकीने बाबाकडे मोर्चा वळवला आणि बाबा कडून तिची शिकवणी सुरु झाली.. तिचा उत्साह, तिचा आनंद पाहताना, तिची प्रगती ऐकताना मी ही त्यात हळूहळू सामील झाले..
नंबरहूड ड्राईव्ह पासून सुरु झालेल्या प्रवासाची मजल ग्रोसरी शॉप, शाळा इथवर गेली.. पाच-सहा मैलाच्या अंतरावर ती सराईतपणे ड्राईव्ह करू लागली.. आता तिला मोठ्ठी अंतरे आणि मोठ्ठी कार खुणावू लागले.. "आई, आज जिमला जाताना मी ड्राईव्ह करू?" तिच्याकडून आलेल्या ह्या प्रश्नाला उत्तर देण्याआधीच "thank you.. see you inthe car" म्हणून गेली सुद्धा.. हे नेमकं काय झालं? हा प्रश्न कधीतरी समोर येणार हे माहिती होतं पण इतक्या लवकर?... स्वतःच्याच विचारात गुंतलेली मी पॅसेंजर सीट वर जाऊन बसले.. "aai, why are you so nervous?"... अगं का म्हणून काय विचारतेस? तू मोठ्ठी कार इतक्या लांब ड्राईव्ह करणार ना म्हणून.. पण हे सगळे शब्द गिळून टाकले आणि म्हणले.. "अगं, कुठं काय.. जायचे ना आपल्याला.." मनातली चलबिचल चेहऱ्यावर उमटू न देण्याचा प्रयत्न करत साईड ला बसून होते.. हळूहळू मी रिलॅक्स होत असल्याची जाणीव झाली.. "कार्टी, काय छान ड्राईव्ह करायला लागलीय.." मुलं तुम्हांला surprise करतात हेच खरं.. मग काय रोज जिमला जाणे सुरु झाले.. रेडिओवर गाणी ऐकत, गाणी म्हणत, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत तिच्या बरोबर जाताना मला एक वेगळाच आनंद मिळत होता.. तिला ही हक्काची driving partner मिळाली होती..
एक दिवस मी तिला सहज म्हणाले, जायचं का freeway वर?.. तिचे डोळे विस्फारले.. त्या डोळ्यात काय नव्हतं? Are you sure? Are you crazy? हे नक्की आईच विचारते आहे ना?.. पहिल्या दिवशी free wayला merge करून पुढचा exit घेऊन परतलो... आणि मग ड्राइविंगचा एक चसकाच लागला.. मुलं मोठ्ठी होत असतांना, नवनवीन ध्येय गाठत असताना, त्या प्रवासात आपण त्याच्या बरोबर असलो तर आपल्याला वाटणारी काळजी, भीती आपोआप कमी होते..
... Finally, एक वर्षानंतर म्हणजेच सोळा वर्षे पूर्ण झाल्यावर 'Permanent Licence' मिळालं...
Yay.. 👏 👏👏.. So proud of Her.. 😘
Another Step Towards Freedom, Towards Independence, Towards Adulthood..
कदाचित मी sentimental ही होत असेन.. पण, licence मिळाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना, मला तिच्यात माझी छोटी बाहुलीच दिसत होती.. मी स्वतःला खूप शांत ठेवायचा प्रयत्न करत होते.. was trying not to think about the worst.. गाडी चालवण्यासाठी नवीन तिकिट मिळालेली माझी ही लेक, अनेक रस्ते explore करण्यासाठी मिळालेल्या ह्या तिकिटाचा ती नीट आदर करेल ना?.. Freedom comes with big responsibitity हे ती नक्कीच जाणते.. असो..
तिने एकटीने ड्राईव्ह करण्यासाठी अजुनी मन तयार होत नव्हते.. पण शेवटी तिच्या हट्टापुढे माघार घ्यायचे ठरवले.. आणि एक surprise plan केले..
नेहमी प्रमाणे बाबा तिला वॉटरपोलो प्रॅक्टिस नंतर pickup करायला जाणार.. मी मागून दुसऱ्या कार मधून जायचे.. तिला कार keys देऊन, एकटी ड्राईव्ह करून ये म्हणून सांगायचे.. तिच्या मागून आम्ही ड्राईव्ह करायचे.. एकदम full proof plan... ठरल्याप्रमाणे तिला keys दिल्या.. drive safe and always look both ways म्हणून सांगितले आणि दुसऱ्या कार मध्ये येऊन बसलो..
ती निघाली.. मागून माझी कार..
थोड्या वेळानं माझ्या लक्षात आलं कि मीच टेन्स होऊन steering घट्ट पकडून ड्राईव्ह करतीय.. मला टेन्स व्हायची काहीच गरज नव्हती.. ह्याच रोड वरून तिने कितीतरी वेळा ड्राईव्ह केले आहे.. फरक इतकाच आहे कि आज ती एकटी आहे.. नेहमी मी बरोबर असते..
तर माझी कार तिच्या कार मागून.. एक दोन सिग्नल सगळं ठीक सुरु होतं.. पुढच्याच सिग्नल ला तिची कार सुटली आणि मी अडकले.. आत्तापर्यंत समोर दिसणारी तिची कार एकदम दिसेनाशी झाली.. आणि आम्ही एकमेकांकडे पहिले.. क्षणभर एक पोकळी जाणवली.. आता काय??.. आता एकच.. एक विश्वास... जो आहे आणि नेहमीच असेल.. She is a good, responsible driver, and we are proud of her.. जगाच्या पाठीवर ती कोठे ही जाऊदे, काहीही करुदे, आम्ही असेच तिच्या मागे असू..
You fly high baby, chase your dreams.. But promise me, you will look both ways.. 😘
-मी मधुरा..
२३ मे २०२१
अप्रतिम, खूप छान लिहिलं आहेस नेहमीप्रमाणे. भावनांचे आणि विश्वासाचे हिंदोळे खूप छान मांडले आहेस.
ReplyDelete👌👌
ReplyDeleteआई वडिलांच्या भावना प्रामाणिकपणे उमटल्या.
ReplyDeleteसुंदर भावना,भावनांचे हेलकावे,जमवले उत्तम
ReplyDelete