💖 Happy Birthday to ME!! 💖
विश्वासच बसत नाही मी पन्नाशीच्या उंबरठयावर.. आता अजुनी एक पाऊल टाकलं कि उगाचंच मोठठं झाल्यासारखं वाटणार.. "Age is just a Number" हे कितीही खरं असलं तरी हा नंबर खरोखरीच मोठ्ठा आहे.. केसात डोकावणाऱ्या रुपेरी छटा.. चेहऱ्यावर दिसू पाहणाऱ्या अनुभवाच्या सुरुकुत्या.. नको तिथं खुखवस्तू आयुष्याचं शरीरानं मांडलेलं प्रदर्शन.. आयुष्यात येत चाललेलं रिकामपण.. सगळंच नवीन.. ह्या नवीन होऊ घातलेल्या बदलला, ह्या नवीन आयुष्याच्या टप्प्याला कसं घ्यायचं हे प्रत्येकानं आपापलं ठरवायला हवं..
थोडी सुजाण (?.. ) झाल्यापासून दरवर्षी मी माझ्या वाढदिवसाला सरलेल्या वर्षाचं सिंहावलोकन करते आणि ह्यावर्षी काय करायचं ह्याचा अंदाज घेते.. पण ह्यावेळी हे विचारमंथन बरंच आधीपासून सुरु झालं होतं.. हे विशेष वर्ष असल्यानं जरा हटके आणि थोडंसं आव्हानात्मक असं काही तरी करायचं होतं.. काय करता येईल हा विचार करत असताना पहिला विचार मनात आला तो म्हणजे "वाचन".. तशी मी काही 'पुस्तकी किडा' वैगरे तर अजिबातच नाही.. पण थोडे फार वाचत असते.. म्हणून पन्नास पुस्तकं हे माझ्यासाठी नक्कीच आव्हान असणार आहे..
पन्नास पुस्तकं.. विविध लेखन/साहित्य प्रकार.. कविता, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, कादंबऱ्या, नाटक.. आधी शक्यतो न वाचलेले लेखक.. आणि न वाचलेली पुस्तकं.. आणि ते हि इथं अमेरिकेत राहून.. (...मराठी पुस्तकं मिळायला खूप त्रास होतो हो.. )
मग काय पुस्तकांची शोधाशोध सुरु झाली आहे.. बुकगंगा साईट वर सध्या पडीक असते.. मैत्रिणींची बुक शेल्फ धुंडाळायला सुरुवात केली आहे.. "कोणी पुस्तकं देता का पुस्तकं.." अशी सध्याची परिस्थिती आहे..
बघू हे आव्हान असं पार पडत ते.. (बाकी अजुनी बऱ्याच गोष्टी डोक्यात आहेत...😀 )
-मी मधुरा...
२ मे २०२२
No comments:
Post a Comment