Sunday, March 17, 2024

तू नसताना..

तू नसताना, डोळे पाणवता 
धीर देऊ कसा मनाला?
उसासा घेऊन, शांत तरी 
किती करु श्वासाला?

निरोप न घेता जाणं तुझं  
मनी काहूर घेऊन आलं     
नजरेआड होताना पाहणं  
जीवन अर्थहीन करून गेलं  

हवालदिल होऊन मी 
सौजन्य:istock 
पाठमोऱ्या तुला पाहत राहिले  
पाहता पाहता परत
परत तुझ्यातच गुंतत गेले  

असं वेड लावलंस मला 
माझी मलाच हरवून बसले 
तू नेशील त्या वाटेवर 
मागं मागं चालत राहिले 

पाऊलखुणा पुसून साऱ्या
जरी गेलास तोडून स्वप्नं     
रममाण होऊन आठवणींत  
हृदयी तुला जपून ठेवीन.. 
हृदयी तुला जपून ठेवीन..  


-मी मधुरा.. 

************************************************