'आई निघाली शाळेला' असे वाचून गम्मत वाटली असेल ना? आजकालच्या मुलांना आई शाळेत जाणे काही नवीन गोष्ट राहिली नाही. कधी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन साठी तर कधी जॉब मधील नवीन स्किल्स आत्मसात करायला आईला शाळेत जावे लागते. पण आमच्याकडे आई काही वेगळ्याच कारणासाठी शाळेत चालली आहे.. आमची हि आई 'योगा टीचर ट्रैनिंग' करणार आहे. ह्यातील 'टीचर' ह्या पार्ट बद्दल अजुनी ती शाशंक असली तरी योगाचे पूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी ती आतुर आहे. हि आई दुसरी कोणी नसून खुद्द 'मी'च आहे.
तर मी २०० तासाचे योगा टीचर्स ट्रेंनिंग करते आहे. साडेचार महिन्याच्या ह्या प्रवासाची सुरुवात उद्यापासून होईल. कोर्सला ऍडमिशन घेतल्यापासून 'दिल योगा योगा हो गया' असे काहीसे झाले आहे. वह्या, पुस्तके, नवीन कपडे,नवीन योगा मॅट त्याच बरोबर हे सगळे घेऊन जायला एक दप्तर काही विचारू नका... नवीन पुस्तकांचा वास किती छान असतो ना? हा वास मला नेहमी शाळेच्या दिवसात घेऊन जातो... तसे शाळेच्या तयारीचे हे मंतरलेले दिवस दरवर्षी जूनच्या सुरवातीला आठवतात. शाळेने दिलेल्या पुस्तके वह्याच्या लिस्ट बरोबर मारुतीच्या शेपटी प्रमाणे माझी वाढत जाणारी लिस्ट हि आठवते.. कंपासपेटी, नवीन युनिफॉर्म, नवीन दप्तराची खरेदी, लंच बॉक्स वॉटर बॉटल बरोबरच रेनकोट, छत्री, गमबूट...
ह्या सगळ्यात माझी आवडती गोष्ट कोणती असेल तर वह्या पुस्तकांना कव्हर घालणे. अगदी लहान असताना बाबा पुस्तकांना कव्हर घालून द्यायचे. त्यांचे पाहून हळू हळू मी पण एकदम प्रो झाले. बाबांना दर शुक्रवारी सुट्टी असायची. त्यामुळे शाळा सुरु होण्या आधीचा शुक्रवार खास कव्हर घालण्यासाठी राखीव असायचा. विटकरी रंगाचा मोठ्ठा पेपर रोल आणला जायचा. कात्री, चिकटपट्टी, नावाचे स्टिकर्स सगळे घेऊन आम्ही मदत करायला सज्ज व्हायचो. हा कार्यक्रम चांगला दोन तीन तास चालायचा. नवीन वह्या पुस्तकाच्या वासाच्या धुंदीत वेळ कसा जायचा तेच कळायचे नाही. शाळा संपली आणि हे मंतरलेपण हि संपले. ऋचाला शाळेची पुस्तके घरी मिळत नसल्याने परत कधी कव्हर घालायची वेळच आली नाही. पण आता माझी कोर्स बुक्स पाहून परत कव्हर घालायची इच्छा होते आहे.. निदान एखाद्या पुस्तकाला तरी कव्हर घालून बघेन.
सगळी तयारी झाली असली तरी शाळेच्या पहिल्या दिवशीची हुरहूर मनात आहेच. क्लासमेट्स कोण असतील? टीचर्स कसे असतील? बाकी सगळे सांभाळून हे करायला जमेल ना? असे असंख्य प्रश्न मनात आहेत. पण उत्साह हि तेवढाच आहे.आता हि आई विद्यार्थिनींची जबाबदारी किती समर्थपणे पेलते हे पाहायचे..
-मी मधुरा...
६ ऑक्टोबर २०१७

No comments:
Post a Comment