मी माहेरवाशीण!!!
"अगं, तमक्यांची मुलगी येणार आहे चार दिवस माहेरपणाला, ह्यावर्षी मुलाच्या दहावीमुळे जरा लवकरच येते आहे... तमक्यांची मुलगी पण राहील म्हणे महिनाभर.. " इति आई .. मला तिचा एकंदरीत सूर लक्षात आला आणि म्हणाले, "....आणि मी पण येते आहे ३-४ महिन्यात!!"... दरवर्षी एप्रिल मे मध्ये होणारे आमचे हे संभाषण.. आई मला प्रत्येक उन्हाळी सुट्टीत हे सांगते आणि मी तिला माझ्या पुढील भारतवारीचे आश्वासन देते.. .. २० वर्षे झाली मी परदेशी येऊन पण तरी हे होतेच..
काय जादू आहे ना 'माहेर' ह्या शब्दात! नुसता शब्द उच्चारला तरी मायेचा स्पर्श जाणवतो. केवळ लग्न होते आणि आज पर्यंत आपले असलेले घर, जिथे आपण खेळलो, बाघडलो, लाडाकोडात वाढलो, हट्ट पुरवून घेतले ते घर बनते "माहेर"..आणि तिची होते "माहेरवाशीण"! हि गोष्ट जितकी मुलीच्या बाबतीत खरी आहे तितकीच मुलाच्या सुद्धा! शिक्षण, नोकरी, चांगली संधी ह्यामुळे मुले-मुली घरच्या बाहेर पडतात आणि मागे उरते ते माहेर...
काय असते हे माहेर? माहेरवाशीण म्हटले कि का उगीचच अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे वाटते? खरंच, माहेरवाशीण म्हणजे नेमके काय?
संसाराच्या रामरगाड्यातून सुटका म्हणजे माहेरवाशीण..
रोजच्या कामाच्या व्यापातून मुक्ती म्हणजे माहेरवाशीण...
आज काय स्वयंपाक करायचा ह्या विवंचनेतून सुटका म्हणजे माहेरवाशीण..
हे दे गं, ते दे गं, हे कर, ते कर ह्या कटकटीतून सुटका म्हणजे माहेरवाशीण..
हवं तेवढं लोळा, उठल्या उठल्या अंघोळ करा, रोज रोजच काम करा ह्या कटकटीतून सुटका म्हणजे माहेरवाशीण..
आईच्या हातचे ऊन ऊन खाऊन यथेच्छ लोळत पडणे म्हणजे माहेरवाशीण...
चारदिवस मनमुराद मौजमजा म्हणजे माहेरवाशीण...
स्वगृही परतताना, उंबरठ्यात रेंगाळणारी जड पावले म्हणजे माहेरवाशीण...
अलगद डोळ्यांच्या कडा ओलावणारी, आवंढा गिळणारी, तृप्त तरी अधुरी मी, म्हणजे माहेरवाशीण!!
आणि,
काळाच्या ओघात थकत चाललेल्या पावलांना माहेर देण्यासाठी धडपडणारी मी, मी माहेरवाशीण!!
-मी मधुरा...
१४ एप्रिल २०१८

No comments:
Post a Comment