आठवणी.. सुगंधी कुपीतल्या!!!
नेस कॉफी संपल्यामुळे थोड्या नाराजीनेच कॉफीसाठी आधण ठेवले.. सकाळच्या प्रत्येक मिनिटाचा हिशोब मनात तयार झाला.. 'ह्या कॉफीमुळे आज उशीर होऊ नये' हा विचार करतच आवरायला घेतले.. अहाहा... काही वेळातच कॉफीचा मंद सुगंध दरवळू लागला.. किती ओळखीचा गंध होता तो!!.. आठवणींचे अनेक कप्पे अलगद उघडू लागले.. एका छोट्याश्या कप्यात लहानपणीची ती आठवण सापडली... "माझी आज्जी!!"... सकाळचे सगळे आवरून झाले कि तिचा कॉफी ब्रेक असायचा!! कॉफी ब्रेकची ना वेळ बदलली, ना चव.. मी तिच्या आवती-भोवती मांजरी सारखी घुटमळत असायची.. ह्याचवेळी काय ती १-२ घोट कॉफी ची चव चाखता यायची.. आज कॉफी पिताना वाटलं.. आजीचं बसली आहे शेजारी आणि म्हणते आहे, "अगं.. मी इथेच आहे, तुझ्यापाशी.. थोडा वेळ काढून मला भेटत जा.." मग ठरवलं.. दर रविवारी आजी सारखी जायफळ वेलदोडा घालून झक्क कॉफी प्यायची..
अशी अनेक गंधवलय आपल्याभोवती असतात .. सकाळी उठल्यावर आपण दात घासतो तेव्हा टूथपेस्टचा वास, राखुंडी वापरत असाल तर त्याचा वास, काहीजणांना मशेरी वापरायची सवय असते ती भाजताना येणारा वास, गॅसवर उकळणाऱ्या आलं घातलेल्या चहाचा वास, अंघोळीच्या साबणांचे-शांपुंचे वेगवेगळे वास, पावडर- बॉडीस्प्रेंचे आणि अत्तरांचे वास, कारमधल्या एअर फ्रेशनरचा वास असे किती प्रकारचे वास आपण घेत असतो... पण बरेचदा हे सगळे वास नेहमीचेच झालेले असल्यामुळे त्यांची जाणीव आपल्याला होत नसावी... पण काही गंध-सुगंधाशी आपली भावनिक जोड असते... काही व्यक्ती, काही प्रसंग त्याच्याशी जोडले गेलेले असतात.. इंग्रजीत एक म्हण आहे .. "With the right music, either you forget everything or you remember everything!" तसंच या गंधांच्या बाबतीतही खरं आहे.. फक्त यात तुम्ही विसरत काहीच नाही, नुसतं आठवता आणि हरवून जाता अश्या एका जगात जे प्रत्येकाने आपल्यासाठी तयार केलेलं असतं..
फोन वर बाबा नुसतं जरी म्हणाले कि बागेत फुले काढतो आहे तर वेगवेगळ्या वासांची लयलूट होताना दिसते.. सोनचाफा, गुलाब, मोगरा, सोनटक्का, जाई, जुई, अनंत यासारख्या सुवासिक फुलांचे वास तर आहेतच पण तगर, जास्वंद फुलांचा मंद वास, तुळस दुर्वा बेल सुद्धा स्वतःचा म्हणून एक वेगळा वास.. एकदम कसे प्रसन्न वाटते...
देवघर म्हटले कि फुलांच्या सुगंधांच्या जोडीला अष्टगंध, चंदन, धूप, उद, कपूर, उदबत्त्या यांचे वास.. आरती, मंत्रपुष्प, घंटानाद....
विंटर मध्ये फायर प्लेस सुरु केल्यावर लहानपणीच्या सकाळची आठवण होते.. पाणी तापवण्यासाठी आमच्याकडे चूल पेटवली जायची.. त्यात नारळाच्या करवंट्या, सोडणं, बाकी लाकूडफाटा वापरला जायचा.. त्याचा एक छान सुगंध वातावरणात भरून जायचा.. त्या चुलीच्या शेजारी शेकत बसलेली आजी कधी त्यात रताळी, कांदे, ओल्या शेंगा, ओला हरभरा टाकून भाजायची.. अहाहा तोंडाला पाणी सुटलं...
स्वयंपाकघर म्हणजे तर अनंत प्रकारच्या सुगंधांचं माहेरघरच!
समुद्र म्हटलं कि बीचवरचा सुखद गारवा, चाटचे येणारे वास, लाटांचा आवाज, ओल्या मऊ वाळूचा पायाला झालेला स्पर्श...
नवीन वह्या-पुस्तकांचे वास... जे आपल्याला शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण नेहमी करून देतात... आजकाल किंडल च्या, ऑन लाईन पुस्तकांच्या जगात नवीन पुस्तकांचा हा वास एखाद्या कुपीतच ठेवावा लागेल..
पहिला पाऊस!!! No doubt पहिल्या पावसाला एक सुगंध असतो... त्याचा स्वतःचा असा एक सुगंध.. पाऊस पडल्यावर येणाऱ्या मातीचा सुगंधापेक्षा वेगळा.. मनात जपलेल्या त्या पावसाचा सुगंध.. मग तो एकट्याने भिजलेला असेल किंवा मित्र मैत्रिणीबरोबर केलेल्या पावसाळी सहलीचा असेल किंवा जोडीदाराबरोबरचे रोमँटिक औटींग असेल... प्रत्येक वर्षी परत परत त्या जादुई पावसाची आठवण करून देतो.. मुसळधार पडणाऱ्या पावसाचा सुगंध परत वेगळा जाणवतो.. एखाद्या अनुभव संपन्न व्यक्तिमत्वासारखा.. जुन्या पाण्यासारखा... थोडा शेवाळी वास असणाऱ्या या पावसापुढे आणि त्याच्या आवाजापुढे आपल्याला आपल्या मनातलही ऐकू येत नाही..
अजून एक वास म्हणजे आपल्या घराचा वास!... हो, प्रत्येक घराला स्वतःचा असा वास असतो!... "I am home…" हे फीलिंगच निम्मा थकवा घालवून टाकते.. ! बाहेर ८-१० अगदी १५ दिवस बरं वाटतं पण आपल्या घरात आल्यावर जे सुख मिळतं त्याची तुलनाच होऊ शकत नाही.. आईकडे गेल्यावर मनसोक्त घराचा वास घेतला कि मन एकदम रिचार्ज होऊन जाते..
आणि माझा सगळ्यात जवळचा, आवडता वास म्हणजे लहान बाळाच्या अंगाचा वास!... अंघोळ घातलेल्या, बेबी पावडर लावलेल्या अंगाचा, वेखंड पावडर लावलेल्या डोक्याचा वास!.. मातृत्वाचा सन्मान करणारा वास.. तो आठवला कि आठवतात ते मंतरलेले दिवस.. आणि जागवलेल्या रात्री!! .. :-)

आपल्या रोजच्या, धकाधकीच्या जीवनात अश्या लहानसहान गोष्टीतून, आठवणीतून आनंद घेता आला तर जगणं कसं 'जीवनगाणं' होऊन जातं.
-मी मधुरा...
५ मे २०१९
No comments:
Post a Comment