Sunday, June 2, 2019

*मधुरा’ज आर्क्* ....

*मधुरा’ज आर्क्*

लहानपणापासूनच मला समुद्र खूप आवडतो.. सुट्टीत कोकणात गेल्यावर तासंतास समुद्र किनारी बसून त्याला निरखणे हा माझा आवडता छंद... "सिंदाबादच्या सफरी" वाचल्यानंतर तर त्याच्याबद्दलचे कुतूहल जास्तीच वाढले.. सिंदाबाद सारखे सफरीवर जावे आणि समुद्राच्या पोटातील गुपिते शोधावीत असे वाटायचे..  कित्येकवेळा अश्या सफरीच्या दुनियेत मी हरवून जायची.. सुट्टीहून घरी परत येताना शंख, शिंपले ह्याचा खजिना नक्की बरोबर असायचा.. "सिंदाबाद" कधी काळाच्या पडद्याआड गेला आणि त्याची जागा "दुनियादारी" ने घेतली हे कळालेच नाही.. पण समुद्राबद्दलचे प्रेम मात्र कायम राहिले.. 

समुद्रसफर करणे इतके सोपे आहे हे मला इकडे अमेरिकेत आल्यावरच कळाले.. सुट्टीसाठी म्हणून समुद्रसफर (cruise)करता येते हे कळाल्यावर माझ्यातला सिंदाबाद परत जागा झाला.. 'आपण दोघांनीच काय सफरीवर जायचे, मोठ्ठा ग्रुप हवा' असे म्हणून नवऱ्याने त्याला परत शांत झोपवले.. :) पण अधून मधून तो मनात खळबळ माजवत असे.. "things to do before i turn fifty" ह्या मध्ये 'एक समुद्रसफर.. Cruise ' हे होतेच.. समुद्रसफर तर करायचीच.. पण कोणती?? कॅरेबियन आयलँड्स, युरोप ही झाली लोकप्रिय ठिकाणे पण मला त्यात बिलकुल इंटरेस्ट नव्हता.. शाळेत भूगोल शिकत असताना अलास्का, नॉर्थ पोल ह्याबद्दल प्रचंड कुतूहल होते.. बर्फाच्छादित प्रदेश, इग्लू, एस्किमो, पोलर बेअर... त्यामुळे "अलास्का"ची समुद्रसफर मनात पिंगा घालत होती.. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते तेव्हाच ती घडते... महेशच्या शाळेच्या मित्रांच्या गेट टुगेदर मध्ये अलास्का क्रूझचा विषय निघतो काय आणि ट्रिप ठरते काय.. अगदी स्वप्नवत वाटावे असे.. "१८ मे ते २५ मे - प्रिन्सेस क्रूझ - डेस्टिनेशन अलास्का"... ७ दिवासाची राऊंडट्रीप... सिऍटल - जुनेऊ - स्कॅगवे - केतचिकेन - व्हिक्टोरिया बी. सी. - सिऍटल ... विथ inside passage आणि glacier bay national park... आणि सहा फॅमिलीची बुकिंग्स झाली पण ... 

ह्या ७ दिवसातील प्रत्येक टप्प्यात, दिवसा शिप डॉकला लागते आणि रात्री उशिरा परत पुढच्या प्रवासासाठी निघते.. दिवसभर त्या त्या ठिकाणची सफर(excurtions) करायची...  एकतर Princess कडून किंवा बाहेरून लोकल टूर कंपनी कडून.. आम्ही मोस्टली प्रिन्सेस कडूनच केली.. काही ठिकाणे अर्धा दिवस तर काही पूर्ण दिवस घालविण्यासारखी होती. खूप excursions available असल्याने, नेमके काय करायचे? must do things कोणत्या? यासाठी आधी बरेच वाचन, online research केला..  अलास्काला जायचे तर main attraction was "glacier walk ".. बाकी rain forest hike, float boating, exploring wildlife हे होतेच.. आमच्या ग्रुप मध्ये ऋचा एकटीच teen-ager असल्याने तिच्या आवडीनुसार आमची excurtions book झाली..

***********************************

एकदाचा शनिवार, १८ मे उजाडला..  ९ माणसे, १७ लहान मोठ्या बॅग्स अशी आमची वरात पोर्टलॅंडहुन सिऍटलला जायला निघाली.. तिकडे अजुनी ५ जणं आम्हाला जॉईन झाली.. हुश्श!!! मिळेल तश्या टॅक्सी करत आमची पलटण प्रिन्सेस क्रूझच्या डॉकला पोचली.. भली मोठ्ठी शिप पाहून ऋचाच काय तिची आई सुद्धा आनंदाने वेडी झाली.. कधी एकदा चेक-इन प्रोसेस पूर्ण होते आणि शिपवर चढतो असे झाले होते.. शेवटी न राहून मी आणि ऋचाने preboarding केलेच.. :) दाराशीच embarkment च फोटोसेशन होतं... आमचे अतिआनंदी चेहरे पाहून "we love to see happy faces"अश्या कंमेंट्स नाही आल्या तरच नवल... 

रूमवर वेलकम लेटर आमची वाट पाहत होते.. भरपूर ऑफर्स, क्युपॉन्स आणि बरच काही होत त्यात..  ऋचासाठी वेगळी फाइल ज्यामधे डे वाईस अ‍ॅक्टिव्हीटीजची माहिती, टीन लाउंज चे कार्ड.. लगेच आमची स्वारी टीन लाउंज कडे... music disk, mini movie theather, game room.. काय नव्हते तेथे? अलिबाबाची गुहा सापडल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता.. देश विदेशातील नवीन मित्र मैत्रिणी हि झाले.. ...  

२०१६ मधे बांधलेली १९ मजली ही बोट "प्रिन्सेस रुबी"... बोट कसली एक प्रचंड मोठं हॉटेलच होतं ते!!... ३५०० प्रवासी, १२०० कर्मचारी असलेले हे रुबी शिप जगप्रसिद्ध टायटॅनिकच्या तुलनेत ३ पट मोठं होतं!!!  पहिले ५ मजले मुख्यत्वेकरून कर्मचाऱ्यांसाठी, फूड स्टोरेज ह्यासाठी.. ६ आणि ७ व्या मजल्यांवर muster stations होती म्हणजे आपत्कालीन व्यवस्था...  पहिल्याच दिवशी आपत्कालीन परिस्थितीत लाईफ जॅकेट कसे घालायचे, आपत्कालीन बोटींवर कसे जायचे यांचा एक सराव झाला... muster station बरोबरच शॉप्स, रेस्टारंटस, केसिनो, थेटर, इन्फॉरमेशन सेंटर हि होते.. ८ ते १४ व्या मजल्यांवर प्रवाशांच्या खोल्या... त्यात 5 मुख्य प्रकार - Suite, mini-suite, balcony, ocean-view, आणि interior. नावाप्रमाणेच त्यांच स्वरुप होतं. आमची बाल्कनी रूम १२ व्या मजल्यावर होती...  छोटसं कपड्यांच कपाट, शेजारी वॉर्डरोब, मिनी शॉवर असलेली बाथरुम, ३ छोटे बेड्स त्यातला एक उप्पर बिर्थ... एकदम सुसज्ज ... बाल्कनी मध्ये दोन आरामखुर्च्या आणि एक टेबल.. १५व्या मजल्यावर रेस्टोरंट, स्विमिन्ग पूल्स, आऊटडोअर मूवी स्क्रिनिंग आणि ओपन डेक.. १७ व्या मजल्यावर जिम आणि स्पा.. १९ व्या मजल्यावर टेनिस कोर्ट आणि जॉगिंग ट्रॅक.. 

क्रूझ वरचं सर्वात आवडतं काम.. "उदरभरण... :) क्रूझवर जाऊन किमान ५ पाउंड तरी वजन वाढावे लागते नाहीतर फाऊल असतो.. जेवण म्हणजे ब्रेकफास्ट - लंच - डिनर... हे सगळे क्रुझच्या रक्कमेत included असते.. त्यातही दोन प्रकार असतात - Traditional dining and Anytime dining...  Traditional dining मधे ठराविक वेळा ठराविक ठिकाणी जेवण घेता येते तर Anytime dining मधे नावाप्रमाणेच कधीही, कोठेही... आम्ही Anytime dining घेतले होते...  Traditional dining हे ज्यांच्या जेवणाच्या वेळा अगदी ठरलेल्या असतात आणि ज्यांना dress code आवडतो त्यांच्यासाठी उत्तम... आम्ही १-२ वेळा छान तयार होऊन फोटो सेशन करून आलो...  पण अगदी casual अवतारात, मित्र मैत्रिणी बरोबर दंगा करत unlimited buffet वर आडवा हात मारण्यात जी मजा येते ती बाकी कोठे नाही...

अक्षरशः तिनित्रिकाळ लोक खाताना दिसायचे.. वेगवेगळ्या देशांमधले वेगवेगळे प्रकार... ५-कोर्स मिल... इंडियन फूड कॉर्नर पण होता.. मी व्हेजिटेरिअन असले तरी खाण्याचा काहीही प्रश्न आला नाही.. 

पहिल्याच रात्री समुद्राच्या रौद्र रूपाची छोटीशी झलक अनुभवायला मिळाली.. पॅसिफिक तसा रफ आहेच.. पण त्या रात्री लाटा इतक्या आक्रमक होत्या की स्वतःला बॅलन्स करणे ही जड जात होते.. लाटांच्या आवाजाने झोप हि लागणे अशक्य होते.. पहिल्याच दिवशी अशी हालत तर पुढचे ७ दिवस कसे काढणार हा पुसटसा विचार मनात येऊन गेलाच..  मोशन सिकनेसमुळे ऋचा पण टीन लाउंज मधून लवकर परतली... दुसऱ्या दिवशी १०-११ वाजे पर्यंत सगळे नॉर्मल झाले.. 
रोज रात्री ८ वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमचा आराखडा असलेले पत्रक रूमवर येण्याचे.. त्यात प्रोग्रॅम्स ची लिस्ट, त्यातील परफॉर्मर, टाइम, त्याचे ड्युरेशन इत्तमभूत माहिती असायची..  shopping, spa स्पेशल ऑफर्स, सिनेमा टाईमिंग्स, दुसर्‍या दिवशीच्या Port विषयी माहिती हि असायची... त्यामुळे दुसऱ्यादिवशीची रूपरेखा ठरवणे सोपे जायचे.. 

*************************************************

प्रि-बोर्ड करून, रूम पाहून, एकंदरीत शिपचा अंदाज आल्यावर सुरुवातीची एक्साइटमेंट हळू हळू कमी व्हायला लागली.. खरंच शिपवर आहे ही जाणीव खूप सुखद होती... ऋचा बरोबर लहानमुलीप्रमाणे शिपभर नुसती बाघडत होते.. कधी एकदा डेकवर जाते आणि ३६० डिग्री मध्ये परिसर पहाते असे झाले होते.. पण emergency run झाल्याशिवाय डेक वर जाण्यास सक्त मनाई होती.. initial formalities पूर्ण झाल्यावर पहिली पावले डेककडे वळाली... डेक वर पोचले तेव्हा काही मिनिटेच शिप सुटण्यासाठी राहिली होती.. हात पसरून एक खोल श्वास घेतला.. कॅप्टनने हॉर्न वाजवून निघण्याचा इशारा दिला.. आणि हात आपोआपच टाटा करण्यासाठी उचलला गेला.. माझे मलाच हसू आले.. कोणाला टाटा करत होते? माझी सगळी लोक तर शिपवरच होती.. मग खूप वेळ मी तिथे तशीच उभी होते.. मनातल्या मनात किनाऱ्याला बाय बाय करत.. परत कधी किनारा दिसेल माहिती नव्हते.. निदान किमान ४४ तास तरी..!! 

डेकवर पार्टी माहोल होता.. मुझिक, ड्रिंकस, डान्स.. धम्माल सुरु होती.. ह्या सगळ्या गडबडीत मी एकटीच डेकवर उभी होते.. माझा सगळा ग्रुप अजुनी मला भेटलाच नव्हता.. ऋचा सुद्धा कधीची पूल मध्ये डुंबत होती.. पण हा एकटेपणा हवाहवासा ही वाटत होता..  

रात्री बेडवर नुसतीच पडून होते.. आज सगळेच दमले होते बहुतेक.. जेवण झाल्यावर लगेचच सगळे आपापल्या रूम मध्ये गेले... मी ही दमले होतेच कि.. दमणुकीने असेल, लाटांच्या आवाजाने असेल किंवा ऋचा एकटीच टीन लाऊंज मध्ये आहे ह्या विचाराने असेल पण झोपच लागत नव्हती.. १ च्या सुमारास ऋचा आल्यावर डोळा लागला.. मध्येच कधीतरी जाग आली.. बाहेर पाहिलं तर छान केशरी छटा आभाळात होती.. घडाळ्यात पहिले तर ४ वाजत होते.. इतक्या लवकर सूर्योदय!! धावत वरती डेक वर गेले.. अप्रतिम केशरी रंगाची उधळण करत सूर्य उगवत होता.. असा केशरी रंग आणि त्याच रंगातील विविधता ह्यापूर्वी कधीच पहिली नव्हती.. १५-२० मिनिटाचा तो सोहळा डोळे दिपवून गेला.. मग काय पुढचे ७ दिवस रोज सकाळी ४ वाजता डेक वर येऊन बसायचा नियमच झाला.. पण असा सूर्योदय परत कधीच दिसला नाही.. खास सूर्योदय पाहायला डेकवर येणारी माझ्या सारखी २-४ वेडी माणसे भेटायची.. मानेने किंवा नजरेनेच एकमेकांना ओळख दाखवली जायची.. न बोलता.. वातावरणातील ती शांतता भंग न करण्याची खबरदारी घेतली जायची.. मूकपणाने ते मोहक सौंदर्य आत खोलवर साठवून घेतले जायचे.. हवेत गारवा वाढायला लागला कि आतमध्ये येऊन कॉफीच्या कपाबरोबर परत तंद्री लागायची.. सकाळचे ते स्वतःबरोबर घालवलेले १-२ तास खूप एनर्जेटिक असायचे.. 

सिऍटल-जुनेऊ हा प्रवासाचा पहिला टप्पा सर्वात मोठ्ठा म्हणजे ४४ तासाचा होता.. सुरुवातीला ह्या ४४ तासांचे थोडे टेन्शन आले होते.. मित्रांचा मोठ्ठा ग्रुप असल्याने गप्पाटप्पांमध्ये मज्जाच येईल हि खात्री होतीच.. पण ह्या दोन दिवसात शिपवर भरपूर कार्यक्रम आयोजित केले होते.. फॅशन शो , कॅप्टन्स डिनर हे मुख्यत्वाने नोंदवावेसे.. ह्या फॅशन शो मध्ये मला आणि ऋचाला मॉडेलिंग करायचा चान्स मिळाला.. हा खूपच छान अनुभव होता.. रॅम्पवॉक कसा करायचा, कसे उभे राहायचे ह्या सगळ्याचा आधी सराव करून घेतला होता.. संध्याकाळी कॅप्टन्स डिनर म्हणजेच फॉर्मल नाईट... फॉर्मलवेअर हा ड्रेस कोड.. कॅप्टन ह्यावेळी स्वतःबद्दल, शिप बद्दल माहिती सांगतो.. शॅंपेन पिरॅमिड इव्हेंट हा पण मस्त एक्सपेरियन्स होता.. कपलने एकत्र जाऊन कॅप्टन बरोबर शॅम्पेन ग्लासीसच्या पिरॅमिड मध्ये शॅम्पेन ओतायची.. नंतर सर्वाना शाम्पेन सर्व्ह केली.. जागोजागी प्रोफेशनल फोटोग्राफरचे फोटोबूथ होते... वेगवेगळ्या पोझेस मध्ये फोटो काढून घेणे हि एक ऍक्टिव्हिटी झाली होती.. :) 

क्रूझवर इतके काय काय करण्यासारखे होते कि कधी दिवस उजाडायचा आणि मावळायचा हेच कळायचे नाही.. रोज दिवसभर काही ना काही प्रोग्रॅम असायचेच.. मुझिक शो, मॅजिक शो, टॉक शो, कॉमेडी शो, आर्ट एक्सिबिशन्स, केरिओकी,  बिंगो, मुव्हीज, सिंगिंग कॉम्पिटिशन वगैरे वगैरे... प्रत्येकाला त्याच्या आवडी प्रमाणे काही ना काही तरी करता येत होते.. 

**************************************************

सकाळी ७ सडे ७ ला परत मित्रांचा अड्डा जमायचा.. जिम मग ब्रेकफास्ट.. एकदम रॉयल... १० च्या सुमारास शिप डॉकला लागायची.. मग excursions... 

सोमवार.. २० मे, जुनेऊ : अलास्का म्हटले कि ग्लेशिअर्स!!! आणि नुसते ग्लेशिअर्स पाहताच येत नाहीतर तर त्यावर चालता हि येत हे National Geografic Channal वर पहिले होते.. त्यामुळे Glasier Walk was most awaitng experience... मग काय.. फर्स्ट स्टॉप जुनेऊ... ग्लेशियर वॉक... आमचे स्वागत करायला आमचा टूर गाईड जुनेऊ डॉक वर हातात फलक घेऊन उभा होता.. अर्धा तासाच्या ड्राईव्ह नंतर आम्ही त्याच्या avialtion land वरील छोटेखानी ऑफिस मध्ये पोचलो.. गेल्या गेल्या त्याच्या टीम ने आम्हाला बूट्स, कोट्स, ग्लोव्हस घालून जवळ जवळ एक्सिमोच केले :) .. अडीच तासाच्या आमच्या टूर मध्ये हेलिकॉप्टरने आजूबाजूचा परिसर, काही untouched ग्लेशियर्स पाहून hubbard glecier वर वॉक असा प्लॅन होता.. डोळे फाडून फाडून ते सौंदर्य पाहत होतो.. फोटो काढायचे भान हि राहिले नाही.. काय काय capture करणार? each and every frame was photogenic!! ग्लॅशिअरवर पहिले पाऊल टाकताना नील आर्मस्ट्रॉग झाल्यासारखे वाटले :) ... चार पावले चालल्यावर कसे चालायचे ह्याचा अंदाज आला.. जवळून ग्लॅशिअर मधील इंद्रधनू रंग खूप मोहक दिसत होते.. 

मंगळवार, २१ मे, स्कॅगवे: आजचे मेन अट्रॅक्शन "डॉग स्लेडींग".. कुत्रांची घसरगाडी... अलास्कामध्ये ह्या घसरगाडीची वर्षातून एकदा मोठ्ठी रेस असते.. १४ कुत्री (अलास्कीअन हस्की) एका टीम मध्ये असतात ज्यांना बर्फावरून ९३८ मैल अंतर कटायचे असते.. (https://en.wikipedia.org/wiki/Iditarod_Trail_Sled_Dog_Race येथे माहिती मिळू शकेल) आम्ही ह्या अलास्कीअन हस्कीच्या ट्रैनिंग कॅम्प साईट ला जाऊन ह्या घसरगाडीचा अनुभव घेतला.. हि घसरगडी बर्फात नव्हती तर रोड वर होती.. एकदम वेगळा अनुभव होता.. (खाली VDO देत आहे)
   
जेव्हा संपूर्ण दिवस क्रूझिंग असेल त्या दिवशी ब्रेकफास्ट नंतर फ्रेश होऊन एखादा शो पाहून परत अड्डा जमायाचा.. पत्ते, गप्पा, डान्स काही ना काही सुरु असायचे.. लंचला गेलो कि दुपारचा चहा घेऊन रूम वर परत.. अश्यावेळी, मला रेस्टोरेंटच्या पिक्चर विंडोतुन समुद्राकडं पाहत बसायला आवडायचे.. डॉल्फिन्स, व्हेल्स, सी लायन्स, ऑटर काही ना काही दिसायचे.. नुसते बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना निहाळयाला, त्यांचा अभ्यास करायला हि मजा येते.. आमच्या शिपवर मोस्टली ६०+ एज ग्रुप होता.. कपल्स पेक्षा फॅमिली, मैत्रिणींचा ग्रुप, कोणाचे माईल स्टोन बर्थडे, ऍनिव्हर्सरी, ग्रॅड्युएशन सेलीब्रेट करायला आलेली लोक जास्ती पहिली.. आमच्या बरोबर ८० वर्षाच्या आसपास असलेले एक यंग कपल होते .. ज्यांनी १००+ प्रिंसेस क्रूसेस केल्या आहेत आणि ७००+ दिवस शिप वर घालवले आहेत.. 

बुधवार २२ मे, ग्लेशियर नॅशनल पार्क: नॅशनल पार्क जे आम्ही शिप मधूनच पाहणार होतो.. 'बोटीतूनच ग्लेशिअर्स दिसणार' ह्या व्यतिरिक्त काहीही अंदाज बांधता येत नव्हता.. ऑलरेडी ग्लेशिअर वॉक केल्यामुळे ग्लेशिअर काय असते हे माहिती होते.. (पण त्या वरून बांधलेला अंदाज सपशेल चुकणार आहे ह्याची कल्पना नव्हती)... ग्लेशिअर्स पाहणे हा एक सोहळा होता.. आदल्या दिवशी, किती वाजता आम्ही पार्क मध्ये एंटर होणार, किती वाजता पहिले ग्लेशिअर पाहणार, किती वेळ शिप तेथे थांबणार सगळे डिटेल्स अनाऊन्स होत होते.. रूम वर मॅप, ग्लेशिअर्स माहिती पत्रक आले होते.. दिवसभर शिप वर ग्लेशिअर्स वर शो सुरु होते.. सकाळी ६ वाजता शिप पार्क मध्ये एंटर होईल आणि पार्क रेंजर्स अधिक माहिती देण्यासाठी शिपवर येतील...  मग काय, पहाटे सूर्योदयापासून डेकवर गेलेली मी तिकडेच रमले.. ६ चे ७ झाले ७ चे ८ तरी ग्लेशिअर्स दिसेनात.. सगळीकडे नुसते पाणीच पाणी.. शेवटी वैतागून रूम वर आले.. Princess TV वर लाइव्ह अनाऊसमेन्ट सुरु होती.. १० वाजता पहिले ग्लेशिअर दिसणार.. "Margerie Glacier"... मग परत तयार होऊन.. वेल पॅक.. डेक वर.. चांगली जागा पकडायला.. तिकडे ऑलरेडी लोकांनी गर्दी केली होती.. पण तरी आम्ही जागा मिळवण्यात यशस्वी झालो.. गर्दीत घुसून जागा पकडायची सवय अमेरिकेत २२ वर्षे राहून सुद्धा शाबूत होती.. याचा अनुभव आला :) ... ग्लेशिअर्स चे पहिले दर्शन.. शब्दातीत आहे.. ते याची देही याची डोळा पहायलाच पाहिजे.. निसर्गाच्या चमत्कारापुढे धन्य व्हायला होते.. किती पहिले तरी डोळ्याचे पारणे फिटत नव्हते.. गर्दीमुळे संपूर्ण ग्लेशिअर पाहता येत नव्हते.. मग गर्दीत कोणीतरी म्हणाले बाल्कनी रूम मधून छान दिसते.. आमच्या सगळ्यांच्या तर बाल्कनी रूम्स होत्या.. मग धावत पाहत रूम गाठली.. आणि जो काही नजारा होता.. डोळ्यात न मावणारा... एकटक त्या ग्लेशिअर कडे पाहत होतो.. त्यातील रंग, खुबी सगळे सगळे नीट पाहता येत होते.. आणि अचानक बर्फाचा एक भाग समुद्रात कोसळला काही कळायच्या आत दुसरा.. आणि नंतर एक आवाज.. काळजात चर्र झाले.. आणि मग पाण्यात पडलेल्या बर्फाच्या इतर लादी कडे लक्ष गेले.. वाटले हा पण कधी ग्लेशिअर्सचा भाग असेल.. 

एकूण आम्ही तीन ग्लेशिअर्स पाहणार होतो.. पहिले "Margerie Glacier" जितक्या जवळून पाहता आले तशी बाकीची दोन "Johns Hopkins Glacier" आणि "Lamplugh Glacier" नाही पाहता आली.. ह्या ग्लेशिअर्सचे रक्षण करण्या करता दिवसातून दोनच शिप ह्या एरियात येऊ शकतात.. आणि ते हि ठराविक अंतरावरूनच पाहावी लागतात.. 

ह्या नंतर परतीचा प्रवास सुरु झाला असे फीलिंग यायला लागले.. गुरुवार, २३ मे, केतचिकेन - जिथे आम्ही पॅसिफिक ओशन मध्ये वाइल्ड लाइफ पाहायला मोटर फ्लोट बोटने जाणार.. पोर्टलॅंड मध्ये पॅसिफिक ओशन मध्ये ऑलरेडी केलेले असल्याने एक्साइटमेंट तशी कमी होती..  शुक्रवार, २४ मे, व्हिक्टोरिया बी. सी - बुचार्ड गार्डन.. जे आधी पहिले आहे.. आणि... शनिवार, २५ मे, सकाळी उजाडता उजाडता सिऍटल... :( मग बाकी ग्रुप कॅनडाला जाईल आणि आम्ही पोर्टलॅंड.. सुट्टी संपणार, क्रूझ मधले पँपेरिंग संपणार ह्या बरोबर मित्र-मैत्रिणींना सोडायचे हा विचार ही नकोसा वाटत होता.. सर्वानाच ते जाणवत होते.. पार्टींग नेहमीच त्रासदायक असते हे खरे.. पण लवकरच एक दीड महिन्यात परत भारतात भेटूच.. हा विचार खूप सुखावह होता.. 
एकूण ट्रिप खूपच छान झाली.. hats off to the management!!!... शिपचे व्यवस्थापन हे क्लिष्ट, गुंतागुंतीचे असावे हे पदोपदी जाणवत होते.. प्रत्येक स्टाफ मग तो स्टुवर्ड असो वा मॅनेजर, बटलर असो वा सर्व्हर, इन्फॉर्मशन डेस्क असो वा स्टोअर किपर सगळे एकदम हसतमुख, मदतगार, कष्टाळू होते...  behind-the-scenes ह्या टूर मध्ये शिप मॅनेजमेंट कसे केले जाते हे पाहायला मिळते पण वेळेअभावी ते स्किप करावे लागले.. ह्या समुद्र-राजकन्येबरोबरचे हे राजेशाही थाटातील ७ दिवस कसे गेले तेच कळले नाही.. right from embarkment to disembarkment... शिप सोडताना भावनिक व्हायला झाले हे नक्की.. पुढची क्रूझ कोणती करायची हा विचार मनात ठेवूनच घरी परतलो.. 

-मी मधुरा..
मे २०१९

No comments:

Post a Comment