मैत्री म्हणजे...
एकत्र खेळलेली भातुकली.. बाहुला बाहुलींचे लावलेले लग्न..
चिमणीच्या दातांनी वाटलेला खाऊ..
मैत्री म्हणजे...
शाळेचा पार.. मिळून खाल्लेला डबा .. कैरीच्या फोडीवरून झालेले भांडण..
मैत्री म्हणजे...
मैत्रिणीसह बुडवलेला तास, १कचोरी, २ सामोसे, आणि बिलावरून झालेला वाद ...
मैत्री म्हणजे...
एक धुंद संध्याकाळ.. १ टेबल ... मैत्रीणींचा अड्डा आणि कटिंग चहा.. ...
मैत्री म्हणजे...
मैत्रिणीचे घर... हलकासा पाऊस... भजी... आणि खूप खूप गप्पा ...
मैत्री म्हणजे...
१ कार... ४ जिवलग मैत्रिणी ... आणि एक मोकळा पहाडी रस्ता...
मैत्री म्हणजे...
फोन उचलताच पडणारी मैत्रिणीची गोड शिवी.. सॉरी म्हटल्यावर अजून एक शिवी ... आणि खळखळून हसणे...
मैत्री म्हणजे...
मैत्रीणीचा एक मेसेज.. अंधुक झालेल्या काही ओल्या आठवणी आणि डोळ्यातले पाणी ...
मैत्री म्हणजे...
भेटण्याचा ठरलेला दिवस.. अतिवृष्टी ... आणि मित्रमैत्रिणी बरोबर जुने क्षण नव्याने जगण्यासाठी केलेला आटापीटा...
Thank you Friends for enriching my Life!!
Happy Friendship day!!
-मी मधुरा...
४ आॅगस्ट २०१९
No comments:
Post a Comment