ही गोष्ट आहे एका "तो" ची आणि एका "ती" ची..
ह्या गोष्टीत पण आटपाट नगर आहे.. आणि ह्या नगरात आहेत आपल्या कथेचा नायक "तो" आणि नायिका "ती"...

"तो" हुशार, चुणचुणीत, सगळ्यांच्या गळ्यातला ताईत.. त्यामुळे थोडासा 'मी शहाणा' असे समजणारा..
आणि "ती" गोबऱ्या गालांची, काळ्या-कुरळ्या, लांब केसांची, स्वतःच्याच भावविश्वात रमणारी..
"तो" तसा जगनमित्र, पण "ती" मोजक्याच चार मैत्रिणींच्या टोळक्यात राहणारी...
दोघांचे जग एकदम वेगळे पण तरी एकमेकांच्या समांतर जाणारे.. बालपणीचा काळ सुखाचा असे काहीसे गेलेले बालपण.. दोघं एकाच गावात लहानाची मोठ्ठी झाली..
एकाच शाळेत जात असली तरी वर्ग मात्र दोघांचे वेगळे.. खाकी चड्डी पांढरा शर्ट मधला "तो" मुलांच्या वर्गात तर निळा स्कर्ट पांढरा ब्लाउज मधली "ती" मुलींच्या.. अव्वा इश्य करायच्या वयात मात्र दोघे एका वर्गात आले.. नुकतंच मुसुरड फुटलेल्या त्याची आणि वयात आलेल्या तिची एका नवीन जगाशी ओळख होऊ लागली...
ती:
तो:
असं वाटणं, सतत तुझाच विचार करणं, म्हणजे प्रेम असेल तर हो मी नक्कीच प्रेमात आहे...
💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
वर्गातल्या नजरा नजरीचे हे खेळ आता शाळेत, शाळेबाहेर ही घडू लागले.. एकमेकांचे टाईम टेबल आपसूकच पक्के झाले.. क्लासला, शाळेला जाण्यायेण्याची वेळ दोघे साधू लागले.. एकमेकांना पहिल्या शिवाय जगणे अशक्य वाटू लागले..
तो:
नुसते सूचक बघत राहतेस
ती:
मनातले असे संवाद मनातच होत राहिले.. दोघांच्या ओठांवर ते कधी आलेच नाहीत.. भावनांची मनातील कोंडी कशी फोडायची हे, ना तिला कळत होतं ना त्याला.. हळूहळू नजरेची देवाणघेवाण, एकमेकांचे अस्तित्व सवयीचं झालं.. नजरेच्या बोलाचालीत, मोहक धुंदीत दिवस मात्र भराभर सरत होते..
एक दिवस त्याच्या बद्दल तिला काहीबाही कळालं.. मनात शंकेनं घर केलं.. त्याच्या डोळ्यांत काही वेगळं दिसतंय का "ती" पाहू लागली.. आता सगळं संपलं ह्या विचाराने "ती" अस्वस्थ झाली, कावरी बावरी झाली..
ती:
ब्रेकअप व्हायला, आधी जुळायला तर हवेना
मग हे काय होतंय मला, काहीच कसं कळेना
जेवण जाईना, झोप येईना, कशातच मन रमेना
कोणाशी बोलवेना, घरी जावेना, आयुष्यात रसच वाटेना
रोज तुला पाहून, नव्याने प्रेमात पडायला मन नाही म्हणेना
पेपर कोरा टाकून, मैत्रिणींशी भांडून रागाचा सौदा काही पटेना
दुःखाचं आभाळ फुटलं तरी मळभ काही हटेना
प्रेमाचे बीज खोलवर रुजलं तरी अंकुर काही फुटेना
मग हे काय होतंय मला, काहीच कसं कळेना
ब्रेकअप झाला तरी मन कसं मानेना, मन कसं मानेना..
बघता बघता दहावीचे वर्ष उजाडलं.. अभ्यासाचं, बोर्डाच्या परिक्षेचं वारं वाहू लागलं.. "तो" तर हुशार आणि जिद्दी.. कसलीच अपेक्षा नसलेली "ती" ही आता अभ्यासाला लागली.. नजरानजर होत होती.. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकतच होती.. "तो" मात्र स्वतःच्या धुंदीत होता.. नजरेने तिला काही तरी सांगायचा प्रयत्न करत होता.. तिच्या मनाची घालमेल त्याच्या ठावी ही नव्हती..
तो:
का छळतेस तू मला अशी?
बसलो असा अभ्यासाला की,
रुंजी घालत फिरत असतेस अवतीभोवती..
तुझ्या हसऱ्या चेहऱ्यात जीव मग अडकत जातो,
अन तुझ्या टपोऱ्या डोळ्यात निराळेच विश्व दिसू लागतं..
तिथे असतं माझं राज्य, ज्याचा असतो मी राजा अन तू राणी..
दिवसभर हातात हात गुंफून आपण मग बागडत राहतो,
कधी नदीकाठी तर कधी बागेत रममाण होतो...
तुझ्या निरर्थ बडबडीत वेळ कसा जातो कळतच नाही..
पुस्तकाचं पान उलटायचं मग भान ही रहात नाही..
छळू नकोस राणी तू मला अशी
संपवून अभ्यास परत येईन तुझ्यापाशी..
प्रिलिम झाली.. सेंड ऑफ चा दिवस ही उजाडला..
आज "तो" आणि "ती" जीवाची होणारी घालमेल लपवत होते.. नजरेच्या कोपऱ्यातून एकमेकांचा अंदाज घेत होते.. व्यक्त होण्यासाठी धडपडत होते.. कारण आज नंतर कदाचित परत ते कधी भेटणार नव्हते..
तो:
ओठावर आलेले शब्द तसेच सांडून गेले
डोळ्यात दाटलेले भाव तिथेच विरून गेले
चंद्र तारे तोडून द्यावेत असं मनात यायचं
पण हे शक्य नाही लगेच ध्यानात यायचं
मग मी माझी इच्छा फुलावरच भगवायचो
पण ते फुल ही पुस्तकातच सुकून जायचं
सगळी तयारी, सगळी हिम्मत नेहमी अशीच फुकट गेली
तिच्यासाठी असलेला हळवा कप्पा ती न पाहताच निघून गेली..
ती:
किती दिवस झाले "तो" भेटून.. शाळा संपल्यानंतर क्लासेसमुळे "तो" भेटायचा तरी.. आता क्लासेस पण संपले.. कसा असेल "तो"? माझी आठवण येत असेल का त्याला? वाटतं कधी कधी, फोन करावा, बोलावं त्याच्याशी... पण ओळखेल का तो माझा आवाज?.. का कोण जाणे, नंबर डायल करताना बोटंच अडखळतात.. श्वासाची गती वाढते.. मग फोन हातात घेऊन नुसतीच बसून राहते.. पण एक सांगायचं आहे त्याला..
परीक्षा झाली.. रिझल्ट लागला..
पण आज सुद्धा "तो" तिला नाही दिसला.. मन खट्टू झालं.. जड मनानेच मैत्रिणींबरोबर सेलिब्रेशन झालं..
बरंच काही सांगायचंय, बरंच काही बोलायचंय
पण मन नुसतंच भरून येतंय
शब्दांवाटे नाही तरी डोळ्यांवाटे वाहून जातंय..
छोट्या भेटी, आठवणीतील असंख्य गोष्टी
विखुरलेल्या क्षणांमध्ये मन तुला धुंडाळतंय

तुझा दरवळ, तुझा श्वास, सगळीकडे तुझाच भास
कोसळणाऱ्या पावसामध्ये तुझ्या संगे मन कसं चिंब होतंय

"तो" आणि "ती... आणि यांच्या आयुष्याचा नवा टप्पा.. नवं कॉलेज, नवी आव्हानं, नवीन मित्र मैत्रिणी, नवी स्वप्नं.. सगळंच नवं.. पण दोघांची वेगळी अशी दोन नवीन विश्व..
दोघांचं विश्व पार बदलून गेलं..
ती:
आपापल्या विश्वात दोघंही रुळले असले तरी त्याने तिला आणि तिने त्याला मनाच्या हळव्या कुपीत जपून ठेवले होते. शेवटी त्या अल्लड भावनांचे, अवखळ प्रेमाचे दोघं सोबती होते..
ती:
कधी कधी ना त्याची कमी उगाचच भासते.. मग मी त्याला माझ्यातच नव्याने शोधत राहते.. आठवणींचा गुंता सोडवता सोडवता नजर वहीच्या मागच्या पानावर अलगद स्थिरावते.. आणि दिसतं, रांगोळ्या रेखाटलेलं, टिकटॉक खेळलेलं, सह्यानं भरलेलं ते वहीच पान आणि त्यात कोणाला दिसणार नाही असं "तुझं माझं" बदामात लिहिलेलं नाव.. त्यावरून हात फिरवतांना जिवंत होतात ते सारे क्षण.. मग, आठवणींच्या त्या रिंगणात मन भावुक होऊन जातं..

तो:
तिच्या आठवणींचा सुगंधी रेशमी रुमाल हृदयाच्या कप्यात मी लपवून ठेवलाय.. अस्वस्थ झालो कि अलगद बाहेर काढून तिला श्वासात भरून घेतो.. आणि जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे सगळं जग एकदम बदलून जातं..
खरंच कशी असेल "ती"? पूर्वी होती तशीच का काळानुसार बदलली असेल?
अशीच असेल का ती अजुनी
स्वतःत रमणारी, इतरांना जपणारी
आनंद झाला कि खळखळून हसणारी..
अशीच असेल का ती अजुनी
थोडी समजुतदार, थोडी भांडणारी
लहान सहान कारणावरून रुसून बसणारी...
अशीच असेल का ती अजुनी
डोळ्याने बोलणारी अन हसून लाजणारी
हवं ते मिळाल्यावर गिरकी घेऊन नाचणारी...
जशी आहेस तशी मला हवी आहेस
रुणझुणत्या पावलांनी, किणकिणत्या हातांनी
साथीने चालायला, स्वप्ने साकारायला तू मला हवी आहेस..
कॉलेज संपलं, जॉब सुरु झाले.. "तो" आणि "ती" आपल्या आयुष्यात स्थिरस्थावर झाले.. इतक्या वर्षात दोघांचे अनेक मित्रमैत्रिणी झाले पण तिला त्याच्या सारखा दुसरा "तो" आणि त्याला तिच्या सारखी दुसरी "ती" सापडलेच नाहीत.. धम्माल आयुष्य जगताना त्या खास व्यक्तीची कमी दोघांना जाणवत होती..
आज दोघेही जरा खुशीतच होते.. निमित्य, शाळेचा अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचं!.. शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना आलेल्या त्या आग्रहाच्या आमंत्रणाचं!.. लगेचच मित्र मैत्रिणींना फोन झाले.. दोन दिवस आधीच भेटायचं ही ठरलं.. आणि गावाबाहेरचं छान रिसॉर्ट ही बुक झालं.. "ती" येईल का? "तो" येईल का?.. "तो" जातो आहे तसे "ती" ही येईलच.. असा विचार त्याने केला.. तसाच तिने ही.. सळसळत्या उत्साहात दोघांची तयारी सुरु झाली..
भेटीचा दिवस उजाडला.. शाळेनंतर तब्बल आठ वर्षांनी सगळे एकत्र भेटणार.. शाळेत एकमेकांशी बोलायला बुजणारे मुलं मुली एकमेकांना भेटायला उत्सुक होते.. "तो" जरा लवकरच रिसॉर्टवर आला.. तो मित्रांना भेटत होता पण त्याची नजर "ती"ला शोधात होती.. तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात "ती" मात्र दिसत नव्हती.. तिच्याबद्दल विचारावे का कोणाला?.. येणार नसेल तर लगेच निघता ही येईल... हा विचार करत असतानाच मागून खळखळून हसण्याचा आवाज आला आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला.. दरदरून घाम आला.. त्याने मागे वळून पाहिलं.. हो.. तीच.., तीच होती "ती"!.. निळ्या सलवार कमीझ मध्ये.. दोन वेण्यांत बांधलेले तिचे काळे कुरळे केस आज वाऱ्यावर मोकळे उडत होते.. किती सुंदर दिसतेय.. तिच्याकडे नुसते बघत राहावंसं वाटतंय.. आज मात्र तिला सांगितलाच पाहिजे.. आज नाही तर परत कधीच नाही.. असा विचार त्याने केला.. इतक्यात "ती"ची भिरभिरती नजर त्याच्यावर पडली.. दोघांची नजर नजर झाली.. अगदी शाळेत व्हायची तशीच.. पण ह्यावेळी त्याच्या नजरेने तिच्या मनाचा खोलवर ठाव घेतला होता.. आणि ती किंचितशी लाजली.. कसला स्मार्ट दिसतोय हा!!.. उंचापुरा, मस्त कमावलेलं शरीर, छान ट्रीम केलेली फ्रेंच बिअर्ड.. आणि कॉन्फिडन्ट पण..
दिवसभर "तो" आणि "ती" एकमेकांचा अंदाज घेत, नजरेच्या टप्प्यात होते.. न जाणो कधी बोलायचा चांन्स मिळेल.. आणि तो चांन्स मिळाला.. संध्याकाळी भेटायचं ही ठरलं..

ह्या गोष्टीत पण आटपाट नगर आहे.. आणि ह्या नगरात आहेत आपल्या कथेचा नायक "तो" आणि नायिका "ती"...
"तो" हुशार, चुणचुणीत, सगळ्यांच्या गळ्यातला ताईत.. त्यामुळे थोडासा 'मी शहाणा' असे समजणारा..
आणि "ती" गोबऱ्या गालांची, काळ्या-कुरळ्या, लांब केसांची, स्वतःच्याच भावविश्वात रमणारी..
"तो" तसा जगनमित्र, पण "ती" मोजक्याच चार मैत्रिणींच्या टोळक्यात राहणारी...
दोघांचे जग एकदम वेगळे पण तरी एकमेकांच्या समांतर जाणारे.. बालपणीचा काळ सुखाचा असे काहीसे गेलेले बालपण.. दोघं एकाच गावात लहानाची मोठ्ठी झाली..
एकाच शाळेत जात असली तरी वर्ग मात्र दोघांचे वेगळे.. खाकी चड्डी पांढरा शर्ट मधला "तो" मुलांच्या वर्गात तर निळा स्कर्ट पांढरा ब्लाउज मधली "ती" मुलींच्या.. अव्वा इश्य करायच्या वयात मात्र दोघे एका वर्गात आले.. नुकतंच मुसुरड फुटलेल्या त्याची आणि वयात आलेल्या तिची एका नवीन जगाशी ओळख होऊ लागली...
... आणि एकेदिवशी, दोघांची नजराजर होण्याचं निमित्य काय झालं आणि एका अगांतुक पाहुण्याचं दोघांच्या मनात आगमन ही झालं.. हृदयात धडधड वाढली, डोक्यात घंटी वाजली आणि डोळ्यांत दोन बदाम ही आले.. त्याला "ती" आणि तिला "तो" आज काही वेगळेचं भासले.. एकमेकांना चोरून पाहण्याचा मग सिलसिलाच सुरु झाला.. मनातल्या मनात संवाद ही घडू लागला..
ती:
मनाला भुलवणारी, सतत हवी हवीशी वाटणारी
मित्रांच्या कधी अलीकडून कधी पलीकडून
भरभिरणारी, मला शोधणारी तुझी नजर..
प्रेम बीम म्हणतात ते हेच आहे का रे..
शाळा सुटल्यानंतर नजरेनंच बाय म्हणण्यासाठी
रेंगाळणारी तुझी पाऊलं आणि गेलासच तर
सायकलने मागे येऊन मारलेली एखादी चक्कर..
प्रेम बीम म्हणतात ते हेच आहे का रे..
परत भेटल्यावर आपसूक येणारे ओळखीचे एक स्माईल
आणि डोळे बंद करून घेतलेला एक दीर्घ श्वास
तुला सामावून घेण्यासाठी, तुला साठवून ठेवण्यासाठी...
प्रेम बीम म्हणतात ते हेच आहे का रे??..
तो:
प्रेम कश्याला म्हणतात मलाही माहिती नाही. पण वेडे, खूप काही बदललं आहे तुझ्यामुळे....
ओठावरच्या शब्दांना अर्थ समजला तुझ्यामुळे

मनातील गाण्यांना सूर सापडला तुझ्यामुळे
नयनातील स्वप्नांत रंग भरले तुझ्यामुळे
अबोल रात्रींना चंद्र लाभला तुझ्यामुळे
वेडा झालोय तुझ्यासाठी..
तहानभूक विसरलोय तुझ्यासाठी..
काहीही करेन तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी....
असं वाटणं, सतत तुझाच विचार करणं, म्हणजे प्रेम असेल तर हो मी नक्कीच प्रेमात आहे...
💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
वर्गातल्या नजरा नजरीचे हे खेळ आता शाळेत, शाळेबाहेर ही घडू लागले.. एकमेकांचे टाईम टेबल आपसूकच पक्के झाले.. क्लासला, शाळेला जाण्यायेण्याची वेळ दोघे साधू लागले.. एकमेकांना पहिल्या शिवाय जगणे अशक्य वाटू लागले..
नुसते सूचक बघत राहतेस
मग व्यक्त का होत नाहीस?
मी बोलायची वाट पाहतेस
तू काहीच का बोलत नाहीस?
माझ्यावर प्रेम करतेस हे
माझे मन जाणतेस तर
प्रेमाला हाक देत का नाहीस?
आता सोडशील ना नुसतं
तुझं हे पाहणं अन लाजणं?
हातात हात देऊन माझ्या
आवडेल ना तुला सोबतीनं जगणं?
ती:
मनातलं सारं मनातच राहतं
अन ओठांवर फक्त हसू उमटतं
पण, भावना कळल्या आहेत ना रे तुला?
मग, तेवढ समजून घे ना जरा मला
सांग ना, अशी कशी मी हाक देऊ?
जगाची रीत, मनातील प्रीत
ह्यांचा ही विचार करायला हवा मला
सगळेच कसे रे शब्दातून सांगू तुला
लाजले बुजले तरी, अपेक्षा आहे मला
लाजले बुजले तरी, अपेक्षा आहे मला
तू काहीतरी सांगण्याची, तू बोलावण्याची
खरं तर आतुर आहे तुला प्रतिसाद देण्यासाठी
वाट पाहते आहे तुझी, सोबतीने चालण्यासाठी...
खरं तर आतुर आहे तुला प्रतिसाद देण्यासाठी
वाट पाहते आहे तुझी, सोबतीने चालण्यासाठी...
💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
मनातले असे संवाद मनातच होत राहिले.. दोघांच्या ओठांवर ते कधी आलेच नाहीत.. भावनांची मनातील कोंडी कशी फोडायची हे, ना तिला कळत होतं ना त्याला.. हळूहळू नजरेची देवाणघेवाण, एकमेकांचे अस्तित्व सवयीचं झालं.. नजरेच्या बोलाचालीत, मोहक धुंदीत दिवस मात्र भराभर सरत होते..
ती:
ब्रेकअप व्हायला, आधी जुळायला तर हवेना
मग हे काय होतंय मला, काहीच कसं कळेना
जेवण जाईना, झोप येईना, कशातच मन रमेना
कोणाशी बोलवेना, घरी जावेना, आयुष्यात रसच वाटेना
रोज तुला पाहून, नव्याने प्रेमात पडायला मन नाही म्हणेना
पेपर कोरा टाकून, मैत्रिणींशी भांडून रागाचा सौदा काही पटेना
दुःखाचं आभाळ फुटलं तरी मळभ काही हटेना
प्रेमाचे बीज खोलवर रुजलं तरी अंकुर काही फुटेना
मग हे काय होतंय मला, काहीच कसं कळेना
ब्रेकअप झाला तरी मन कसं मानेना, मन कसं मानेना..
बघता बघता दहावीचे वर्ष उजाडलं.. अभ्यासाचं, बोर्डाच्या परिक्षेचं वारं वाहू लागलं.. "तो" तर हुशार आणि जिद्दी.. कसलीच अपेक्षा नसलेली "ती" ही आता अभ्यासाला लागली.. नजरानजर होत होती.. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकतच होती.. "तो" मात्र स्वतःच्या धुंदीत होता.. नजरेने तिला काही तरी सांगायचा प्रयत्न करत होता.. तिच्या मनाची घालमेल त्याच्या ठावी ही नव्हती..
तो:
का छळतेस तू मला अशी?
बसलो असा अभ्यासाला की,
रुंजी घालत फिरत असतेस अवतीभोवती..
अन तुझ्या टपोऱ्या डोळ्यात निराळेच विश्व दिसू लागतं..
तिथे असतं माझं राज्य, ज्याचा असतो मी राजा अन तू राणी..
दिवसभर हातात हात गुंफून आपण मग बागडत राहतो,
कधी नदीकाठी तर कधी बागेत रममाण होतो...
तुझ्या निरर्थ बडबडीत वेळ कसा जातो कळतच नाही..
पुस्तकाचं पान उलटायचं मग भान ही रहात नाही..
छळू नकोस राणी तू मला अशी
संपवून अभ्यास परत येईन तुझ्यापाशी..
💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
प्रिलिम झाली.. सेंड ऑफ चा दिवस ही उजाडला..
आज "तो" आणि "ती" जीवाची होणारी घालमेल लपवत होते.. नजरेच्या कोपऱ्यातून एकमेकांचा अंदाज घेत होते.. व्यक्त होण्यासाठी धडपडत होते.. कारण आज नंतर कदाचित परत ते कधी भेटणार नव्हते..
ती:
प्रेमात तुझ्या पडताना, तुला प्रेमात पाडायचं राहूनच गेलं..
जीवाची घालमेल जपताना, हवं ते सांगायचं राहूनच गेलं..
डोळ्यात तुझ्या मला शोधताना, नजरेनं बोलायचं राहूनच गेलं..
सांगेन तुला कधीतरी म्हणताना, विषय काढायचं राहूनच गेलं..
तू हो म्हणशील का नाही? खरं तर विचारायचं राहूनच गेलं..
परत कधी भेटू माहित नसताना ही, बाय म्हणायचं राहून गेलं..
त्या दिवशी ही तू जाताना, तुला अडवायचं राहूनच गेलं..
प्रेमात तुझ्या पडताना, तुला प्रेमात पाडायचं राहूनच गेलं..
तुला प्रेमात पाडायचं राहूनच गेलं..
तुला प्रेमात पाडायचं राहूनच गेलं..
ओठावर आलेले शब्द तसेच सांडून गेले
डोळ्यात दाटलेले भाव तिथेच विरून गेले
चंद्र तारे तोडून द्यावेत असं मनात यायचं
पण हे शक्य नाही लगेच ध्यानात यायचं
मग मी माझी इच्छा फुलावरच भगवायचो
पण ते फुल ही पुस्तकातच सुकून जायचं
सगळी तयारी, सगळी हिम्मत नेहमी अशीच फुकट गेली
तिच्यासाठी असलेला हळवा कप्पा ती न पाहताच निघून गेली..
ती:
मन खूप भिजलंय तुझ्या आठवणीत
काही तरी अडलंय माझ्या पापणीत...
तू फक्त एकदा भेटून जा
डोळ्यात अडलेल्या तुझ्या आठवणींना
तेवढी वाट दाखवून जा..
💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
परीक्षा झाली.. रिझल्ट लागला..
पण आज सुद्धा "तो" तिला नाही दिसला.. मन खट्टू झालं.. जड मनानेच मैत्रिणींबरोबर सेलिब्रेशन झालं..
तो:
गेली असेल का "ती" रिझल्ट आणायला? गेलो असतो तर भेटलो असतो शेवटचं तिला.. रिझल्ट घ्यायला का नाही गेलो हे कळेल का तिला? खूप अस्वस्थ आहे मी हे जाणवेल का तिला?...
मार्क्स कमी पडल्याचं सल खूप मोठठंय.. Good for Nothing ही जाणीव जीव घेतीय माझा.. "ती"ला पाहायचंय, "ती"ला भेटायचंय... त्यानं तरी मन शांत होतंय का पाहायचंय..
मार्क्स कमी पडल्याचं सल खूप मोठठंय.. Good for Nothing ही जाणीव जीव घेतीय माझा.. "ती"ला पाहायचंय, "ती"ला भेटायचंय... त्यानं तरी मन शांत होतंय का पाहायचंय..
शब्दांवाटे नाही तरी डोळ्यांवाटे वाहून जातंय..
छोट्या भेटी, आठवणीतील असंख्य गोष्टी
विखुरलेल्या क्षणांमध्ये मन तुला धुंडाळतंय
शब्दांवाटे नाही तरी डोळ्यांवाटे वाहून जातंय..
तुझा दरवळ, तुझा श्वास, सगळीकडे तुझाच भास
कोसळणाऱ्या पावसामध्ये तुझ्या संगे मन कसं चिंब होतंय
शब्दांवाटे नाही तरी डोळ्यांवाटे वाहून जातंय..
💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
"तो" आणि "ती... आणि यांच्या आयुष्याचा नवा टप्पा.. नवं कॉलेज, नवी आव्हानं, नवीन मित्र मैत्रिणी, नवी स्वप्नं.. सगळंच नवं.. पण दोघांची वेगळी अशी दोन नवीन विश्व..
पुढच्या शिक्षणासाठी त्यानं गाव सोडलं.. अभ्यास, नवीन जबाबदाऱ्या वाढल्या तसं त्याचं गावात येणं कमी झालं..
"तो" कधीतरी दिसेल ही आस मनी ठेवून "ती" तिच्या स्वप्नाचं नवीन अवकाश शोधू लागली..
दोघांचं विश्व पार बदलून गेलं..
ती:
दोन फाटे कधी फुटले काही कळलंच नाही
एका रस्त्यावरून जाताना, अचानक जाणवलं
कोणत्या तरी वळणावर आपलं काहीतरी हरवलं...
ते वळण ही आता दिसेनासं झालंय जिथं
वाटतंय आता, काहीतरी चुकलंच एकमेकांना समजून घेताना...
नव्या दिशा, नव्या आशा, नवे सोबती मिळाले
नवे अनुभव घेताना, पण आठवण येते त्या जुन्या वळणाची
जेथे आपण भेटलो होतो, एकमेकांत गुंतलेले होतो...
कधी कधी प्रश्न पडतो मला,
येत असेल का तुला, माझी ही आठवण इतरांसोबत जगताना?
💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
आपापल्या विश्वात दोघंही रुळले असले तरी त्याने तिला आणि तिने त्याला मनाच्या हळव्या कुपीत जपून ठेवले होते. शेवटी त्या अल्लड भावनांचे, अवखळ प्रेमाचे दोघं सोबती होते..
ती:

अव्यक्त भावनांचा खेळ
आज ही येथे रंगतो
अस्तित्व निर्जीव असले तरी
भाव स्पर्श तुझा सांगतो
पाहिलेलं प्रत्येक स्वप्न
आज ही हा मला दावतो
उन्मळून पडलेल्या मनात
तुझेच नाव नांदतं!
तो:
तिच्या आठवणींचा सुगंधी रेशमी रुमाल हृदयाच्या कप्यात मी लपवून ठेवलाय.. अस्वस्थ झालो कि अलगद बाहेर काढून तिला श्वासात भरून घेतो.. आणि जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे सगळं जग एकदम बदलून जातं..
खरंच कशी असेल "ती"? पूर्वी होती तशीच का काळानुसार बदलली असेल?
अशीच असेल का ती अजुनी
स्वतःत रमणारी, इतरांना जपणारी
आनंद झाला कि खळखळून हसणारी..
अशीच असेल का ती अजुनी
थोडी समजुतदार, थोडी भांडणारी
लहान सहान कारणावरून रुसून बसणारी...
अशीच असेल का ती अजुनी
डोळ्याने बोलणारी अन हसून लाजणारी
हवं ते मिळाल्यावर गिरकी घेऊन नाचणारी...
जशी आहेस तशी मला हवी आहेस
रुणझुणत्या पावलांनी, किणकिणत्या हातांनी
साथीने चालायला, स्वप्ने साकारायला तू मला हवी आहेस..
💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
कॉलेज संपलं, जॉब सुरु झाले.. "तो" आणि "ती" आपल्या आयुष्यात स्थिरस्थावर झाले.. इतक्या वर्षात दोघांचे अनेक मित्रमैत्रिणी झाले पण तिला त्याच्या सारखा दुसरा "तो" आणि त्याला तिच्या सारखी दुसरी "ती" सापडलेच नाहीत.. धम्माल आयुष्य जगताना त्या खास व्यक्तीची कमी दोघांना जाणवत होती..
आज दोघेही जरा खुशीतच होते.. निमित्य, शाळेचा अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचं!.. शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना आलेल्या त्या आग्रहाच्या आमंत्रणाचं!.. लगेचच मित्र मैत्रिणींना फोन झाले.. दोन दिवस आधीच भेटायचं ही ठरलं.. आणि गावाबाहेरचं छान रिसॉर्ट ही बुक झालं.. "ती" येईल का? "तो" येईल का?.. "तो" जातो आहे तसे "ती" ही येईलच.. असा विचार त्याने केला.. तसाच तिने ही.. सळसळत्या उत्साहात दोघांची तयारी सुरु झाली..
भेटीचा दिवस उजाडला.. शाळेनंतर तब्बल आठ वर्षांनी सगळे एकत्र भेटणार.. शाळेत एकमेकांशी बोलायला बुजणारे मुलं मुली एकमेकांना भेटायला उत्सुक होते.. "तो" जरा लवकरच रिसॉर्टवर आला.. तो मित्रांना भेटत होता पण त्याची नजर "ती"ला शोधात होती.. तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात "ती" मात्र दिसत नव्हती.. तिच्याबद्दल विचारावे का कोणाला?.. येणार नसेल तर लगेच निघता ही येईल... हा विचार करत असतानाच मागून खळखळून हसण्याचा आवाज आला आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला.. दरदरून घाम आला.. त्याने मागे वळून पाहिलं.. हो.. तीच.., तीच होती "ती"!.. निळ्या सलवार कमीझ मध्ये.. दोन वेण्यांत बांधलेले तिचे काळे कुरळे केस आज वाऱ्यावर मोकळे उडत होते.. किती सुंदर दिसतेय.. तिच्याकडे नुसते बघत राहावंसं वाटतंय.. आज मात्र तिला सांगितलाच पाहिजे.. आज नाही तर परत कधीच नाही.. असा विचार त्याने केला.. इतक्यात "ती"ची भिरभिरती नजर त्याच्यावर पडली.. दोघांची नजर नजर झाली.. अगदी शाळेत व्हायची तशीच.. पण ह्यावेळी त्याच्या नजरेने तिच्या मनाचा खोलवर ठाव घेतला होता.. आणि ती किंचितशी लाजली.. कसला स्मार्ट दिसतोय हा!!.. उंचापुरा, मस्त कमावलेलं शरीर, छान ट्रीम केलेली फ्रेंच बिअर्ड.. आणि कॉन्फिडन्ट पण..
दिवसभर "तो" आणि "ती" एकमेकांचा अंदाज घेत, नजरेच्या टप्प्यात होते.. न जाणो कधी बोलायचा चांन्स मिळेल.. आणि तो चांन्स मिळाला.. संध्याकाळी भेटायचं ही ठरलं..
ती संध्याकाळ
अंधार भरून येताना, तुझ्या सोबतीत फुललेली
अगदी ताजी ताजी मोकळी खळाळ
एका निवांत वेळी गाडीत तू-मी
भावना शब्दात सांगायच्या जुळवा जुळवीत मी
बहरानं फुललेलं आभाळ, तुझ्या मनात झुकलेलं
दोघांचं एकमेकांत, काही हरवतं गुंतत चालेलेलं
ते तुझे माझे रुपेरी क्षण, ती अंधारलेली संध्याकाळ,
अजुनी रुणझुणते, तुझ्या डोळ्यातील रंग हिंदळते
सहवासाचा सुगंध दरवळते, मन माझे हुरहुरत राहते
तुला परत परत भेटण्यासाठी, तुझी होण्यासाठी.....
इतक्या वर्षानंतर, अव्यक्त भावनांनी व्यक्त प्रेमाचा सोहळा साजरा केला.. त्यात "तो" आणि "ती" आनंदाने न्हाऊन गेले.. हात हातात घेऊन सहजीवनाची स्वप्नं पहात थोडे विसावले....
-मी मधुरा..
No comments:
Post a Comment