तोच चंद्रमा नभात...
मानवी मनाला चंद्राची आणि त्यांच्या कलांची असलेली ओढ अगदी पुरातन काळापासून दिसून येते.. 'चंद्र हवा मज' ह्या रामाच्या बालहट्टापासून आणि चंद्रावर पहिलेवहिले पाऊल उमटविणा-या नील आर्मस्ट्राँगपासून ते समस्त कवी आणि लेखकांपर्यंत, सगळ्यांनाच ह्या शीतल चंद्राने जणू भुरळ घातली आहे.. हजारो लाखो वेळा या कवींनी, लेखकांनी चंद्राला बोलावून, चांदण्या तारे फुलवून, रात्री धुंद करून आपल्याला स्वप्ने पाहायला शिकवली तर कधी त्याला भाकरीची उपमा देऊन सामाजिक आर्थिक परिस्थितीचा आरसा दाखवला.. कधी मनोविश्लेषण करताना चंद्राच्या कलांशी थेट संबंध लावला तर कधी भरती-ओहोटीत दोन प्रेमीयुगलचा..
पण तरी ही चंद्राच्या मुलायम, शीतल, शांत स्पर्शातला प्रेमभाव आपल्याला जास्ती भावतो.. मग, बहिणीला त्याच्यात आपला लाडका भाऊ दिसतो तर मुलांना त्यांचा ‘मामा’.. कधी तो 'मेरे भैय्या को संदेसा पहुंचाना रे, चंदा तेरी ज्योत बढे'.. असं म्हणणाऱ्या बहिणीचा तो संदेशवाहक होतो तर कधी 'चंदा मामा मेरे द्वार आना, ले के किरणों के हार आना'...असं म्हणणाऱ्या भाचरांसाठी भेटवस्तू ही आणतो..
कधी प्रेमिकेला त्याच्यात आपला प्रियकर दिसतो तर कधी प्रियकराला प्रेमिका.. प्रेमात एरव्ही तिसरा, कबाब में हड्डी असला तरी, 'चंद्र आहे साक्षीला' म्हणत कधी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात तर कधी त्याच्याच पुढे 'ओ रात के मुसाफिर, चंदा ज़रा बता दे, मेरा क़ुसूर क्या है, तू फैसला सुना दे' असे गाऱ्हाणे मांडले जाते.. 'चंदा रे चंदा रे, कभी तो ज़मीं पर आ, बैठेंगे, बातें करेंगे' असे म्हणत कधी तो एकाकीपणाचा सोबती ही होतो..
कवी लेखकांच्या अंगाखांद्यावर खेळणारा हा चंद्र, आपल्या आयुष्याचा, आपल्या भावविश्वासाचा एक भागच.. ठायी ठायी भरून उरलेला.. प्रेम करायला, प्रेम निभावायला, आपल्याला हवी असते ती चंद्राची सोबत..
खूप दिवसांनी भेटलेल्या प्रियकरात मग तिला चंद्रच दिसतो..
तुम आये तो आया मुझे याद
गली में आज चाँद निकला
जाने कितने दिनों के बाद
गली में आज चाँद निकला
आनंदाने मोहरलेल्या प्रेमिकाला पाहून दुनियेचा फेरफटका मारणाऱ्या चंद्रालाच तो विचारता झाला..
मैंने पूछा चाँद से के देखा है कहीं
मेरे यार सा हसीन
चाँद ने कहा, चाँदनी की कसम
नहीं, नहीं, नहीं..
आणि तिच्या सौंदर्याची तुलना चंद्राशीच करायची गुस्ताखी ही करून बसला..
चौदवीं का चाँद हो या आफ़ताब हो
जो भी हो तुम ख़ुदा की क़सम, लाजवाब हो..
खरं तर प्रेमिका इतकी सुंदर आहे कि चंद्राला ही तिचा हेवा वाटावा...
चाँद आहें भरेगा
फूल दिल थाम लेंगे
हुस्न की बात चली तो
सब तेरा नाम लेंगे
प्रियकराच्या येण्यानं ही रात्र, हा समा कसा जादुई झालाय.. हे सगळं खूप हवंहवंसं वाटतंय.. 'रुक जा रात, ठहर जा रे चंदा' असं म्हणत ती चंद्राला थांबण्याची आर्जव करतीय.. आणि रेंगाळत चालण्याची मनधरणी ही..
धीरे धीरे चल चाँद गगन में
अरे धीरे धीरे चल चाँद गगन में
कहीं ढल ना जाये रात, टूट ना जायें सपने
अरे धीरे धीरे चल चाँद गगन में
अशी गोड मनधरणी करणारी प्रेमिका त्याला चंद्रासम दिसतीय.. अरे हे काय?.. "एक रात में दो दो चाँद खिले, एक घुंघट में, एक बदरी में".. हे ऐकून ती गोडशी लाजली अन तो बावरला...
चाँद सा मुखड़ा क्यों शरमाया
आँख मिली और दिल घाबराया
काल रात्री काय घडले म्हणून उद्या चर्चा होईल.. ते काहीही असो आज तरी..
वह चाँद खिला वह तारे हांसे
यह रात अजब मतवारी है
समझने वाले समझ गए हैं
न समझे वह अनाडी हैं..
चंद्राची प्रत्येक कला ही मोहक आणि किती ही आपल्या भावविश्वाच्या जवळ जाणारी असली तरी खरा चंद्रोत्सव फुलतो, रंगतो, भावतो, स्मरतो तो कोजागरी पौर्णिमेलाच.. 'शारद सुंदर चंदेरी राती' आटवलेल्या केशरदुधात दिसणारा तोच चंद्र नवीन जागृतीचे, वैभवाचे, आनंदाचे रूप लेवून सोळा कलांनी फुलून येतो.. असा हा चंद्र प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या यामिनी सोबत सदैव राहो हीच सदिच्छा!!
कोजागिरीच्या चांदणभर शुभेच्छा!!
-मी मधुरा..
१९ ऑक्टोबर २०२१
No comments:
Post a Comment