सकाळी १० च्या सुमारास शिप डॉकला लागायची.. मग excursions...
संध्याकाळी पाच-सहाच्या सुमारास बोर्डिंग सुरु व्हायचं आणि सातच्या सुमारास शिप डिपार्ट व्हायची.. असं साधारण रोजचं रुटीन..
रोज सकाळी सात-साडे सातला मित्रांचा अड्डा जमायचा.. जिम मग ब्रेकफास्ट.. मग तयार होऊन त्या दिवशीची excursions.. ऋचा बरोबर असल्यानं आमची excursions बाकी मित्रमंडळींपेक्षा वेगळी होती..
संध्याकाळी पाच-सहाच्या सुमारास बोर्डिंग सुरु व्हायचं आणि सातच्या सुमारास शिप डिपार्ट व्हायची.. असं साधारण रोजचं रुटीन..
रोज सकाळी सात-साडे सातला मित्रांचा अड्डा जमायचा.. जिम मग ब्रेकफास्ट.. मग तयार होऊन त्या दिवशीची excursions.. ऋचा बरोबर असल्यानं आमची excursions बाकी मित्रमंडळींपेक्षा वेगळी होती..
सोमवार, २०मे - जुनेऊ:
अलास्का म्हटलं कि ग्लेशिअर्स!!!.. आणि नुसते ग्लेशिअर्स पाहताच येत नाहीतर तर त्यावर चालता ही येत, हे National Geographic Channel वर पाहिलं होतं.. त्यामुळं Glacier Walk was most awaiting experience..
फर्स्ट स्टॉप जुनेऊ... ग्लेशियर वॉक... आमचं स्वागत करायला आमचा टूर गाईड जुनेऊ डॉक वर हातात फलक घेऊन उभा होता.. अर्धा तासाच्या ड्राईव्ह नंतर आम्ही त्याच्या avialtion land वरील छोटेखानी ऑफिस मध्ये पोचलो.. गेल्या गेल्या त्याच्या टीमनं आम्हाला बूट्स, कोट्स, ग्लोव्हस घालून जवळ जवळ एक्सिमोच केलं :) ..
अलास्का म्हटलं कि ग्लेशिअर्स!!!.. आणि नुसते ग्लेशिअर्स पाहताच येत नाहीतर तर त्यावर चालता ही येत, हे National Geographic Channel वर पाहिलं होतं.. त्यामुळं Glacier Walk was most awaiting experience..
फर्स्ट स्टॉप जुनेऊ... ग्लेशियर वॉक... आमचं स्वागत करायला आमचा टूर गाईड जुनेऊ डॉक वर हातात फलक घेऊन उभा होता.. अर्धा तासाच्या ड्राईव्ह नंतर आम्ही त्याच्या avialtion land वरील छोटेखानी ऑफिस मध्ये पोचलो.. गेल्या गेल्या त्याच्या टीमनं आम्हाला बूट्स, कोट्स, ग्लोव्हस घालून जवळ जवळ एक्सिमोच केलं :) ..
अडीच तासाच्या आमच्या टूर मध्ये हेलिकॉप्टरनं आजूबाजूचा परिसर, काही untouched ग्लेशियर्स पाहून Hubbard Glacier वर वॉक असा प्लॅन होता.. डोळे फाडून फाडून ते सौंदर्य पाहत होतो.. फोटो काढायचं भान ही राहिलं नाही.. काय काय capture करणार? each and every frame was photogenic!! ग्लॅशिअरवर पहिलं पाऊल टाकताना नील आर्मस्ट्रॉग झाल्यासारखं वाटलं :) .. चार पावलं चालल्यावर कसं चालायचं ह्याचा अंदाज आला..
जवळून ग्लॅशिअर मधील इंद्रधनू रंग खूप मोहक दिसत होते..
अलास्कामध्ये ह्या घसरगाडीची वर्षातून एकदा मोठ्ठी रेस असते.. १४ कुत्री (अलास्कीअन हस्की) एका टीम मध्ये असतात ज्यांना बर्फावरून ९३८ मैल अंतर कटायचं असतं..
आम्ही ह्या अलास्कीअन हस्कीच्या ट्रैनिंग कॅम्प साईट ला जाऊन ह्या घसरगाडीचा अनुभव घेतला.. ही घसरगडी बर्फात नव्हती तर रोड वर होती.. एकदम वेगळा अनुभव होता..
🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️
जेव्हा संपूर्ण दिवस क्रूझिंग असेल त्या दिवशी ब्रेकफास्ट नंतर फ्रेश होऊन एखादा शो पाहून परत अड्डा जमायाचा.. पत्ते, गप्पा, डान्स काही ना काही सुरु असायचं.. लंचला गेलो कि दुपारचा चहा घेऊन रूम वर परत.. अश्यावेळी, मला रेस्टोरेंटच्या पिक्चर विंडोतुन समुद्राकडं पाहात बसायला आवडायचं.. डॉल्फिन्स, व्हेल्स, सी लायन्स, ऑटर काही ना काही दिसायचं..
नुसतं बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना निहाळयाला, त्यांचा अभ्यास करायला ही मजा येते.. आमच्या शिपवर मोस्टली ६०+ एज ग्रुप होता.. कपल्स पेक्षा फॅमिली, मैत्रिणींचा ग्रुप, कोणाचे माईल स्टोन बर्थडे, ऍनिव्हर्सरी, ग्रॅड्युएशन सेलीब्रेट करायला आलेली लोकं जास्ती पाहिली.. आमच्या बरोबर ८० वर्षाच्या आसपास असलेलं एक यंग कपल होतं ज्यांनी १००+ प्रिंसेस क्रूसेस केल्या होत्या आणि ७००+ दिवस शिप वर घालवले होते..
🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️
बुधवार, २२ मे - ग्लेशियर नॅशनल पार्क:
नॅशनल पार्क जे आम्ही शिप मधूनच पाहणार होतो.. 'बोटीतूनच ग्लेशिअर्स दिसणार' ह्या व्यतिरिक्त काहीही अंदाज बांधता येत नव्हता.. ऑलरेडी ग्लेशिअर वॉक केल्यामुळं ग्लेशिअर कसं असतं हे माहिती होतं.. (पण त्या वरून बांधलेला अंदाज सपशेल चुकणार आहे ह्याची कल्पना नव्हती)...
ग्लेशिअर्स पाहणं हा एक सोहळा होता.. आदल्या दिवशी, किती वाजता आम्ही पार्क मध्ये एंटर होणार, किती वाजता पहिलं ग्लेशिअर पाहणार, किती वेळ शिप तिथं थांबणार सगळे डिटेल्स अनाऊन्स होत होते.. रूम वर मॅप, ग्लेशिअर्स माहिती पत्रक ही आलं होतं.. दिवसभर शिप वर ग्लेशिअर्स संबंधी शो सुरु होते..
सकाळी ६ वाजता शिप पार्क मध्ये एंटर होईल आणि पार्क रेंजर्स अधिक माहिती देण्यासाठी शिपवर येतील... मग काय, पहाटे सूर्योदयापासून डेकवर गेलेली मी तिकडंच रमले.. ६ चे ७ झाले ७ चे ८ तरी ग्लेशिअर्स दिसेनात.. सगळीकडं नुसते पाणीच पाणी.. शेवटी वैतागून रूम वर आले.. Princess TV वर लाइव्ह अनाऊसमेन्ट सुरु होती.. १० वाजता पहिले ग्लेशिअर दिसणार.. 'Margerie Glacier'.. मग परत तयार होऊन.. वेल पॅक.. डेक वर.. चांगली जागा पकडायला..
तिकडं ऑलरेडी लोकांनी गर्दी केली होती.. पण तरी आम्ही जागा मिळवण्यात यशस्वी झालो.. गर्दीत घुसून जागा पकडायची सवय अमेरिकेत २२ वर्षे राहून सुद्धा शाबूत होती.. याचा अनुभव आला :) ..
ग्लेशिअर्स चं पहिलं दर्शन.. शब्दातीत आहे.. ते याची देही याची डोळा पहायलाच पाहिजे.. निसर्गाच्या चमत्कारापुढे धन्य व्हायला होतं.. किती ही पाहिलं तरी डोळ्याचं पारणं फिटत नव्हतं..
.. आणि जो काही नजारा होता.. डोळ्यांत न मावणारा... एकटक त्या ग्लेशिअर कडं पाहात होतो.. त्यातील रंग, खुबी सगळं सगळं नीट पाहता येत होतं..
.. आणि अचानक बर्फाचा एक भाग समुद्रात कोसळला काही कळायच्या आत दुसरा.. आणि नंतर एक आवाज.. काळजात चर्र झाले.. आणि मग पाण्यात पडलेल्या बर्फाच्या इतर लाद्यांकडं लक्ष गेलं.. वाटलं हा पण तरी कधी ग्लेशिअर्सचाच भाग असेल..
एकूण आम्ही तीन ग्लेशिअर्स पाहणार होतो.. पहिलं 'Margerie Glacier' जितक्या जवळून पाहता आलं तशी बाकीची दोन 'Johns Hopkins Glacier' आणि 'Lamplugh Glacier' नाही पाहता आली..
ह्या ग्लेशिअर्स चं रक्षण करण्याकरता दिवसातून दोनच शिप ह्या एरियात येऊ शकतात.. आणि ते ही ठराविक अंतरावरूनच पाहावी लागतात..
गुरुवार, २३ मे - केतचिकेन:
पॅसिफिक ओशन वाइल्ड लाइफ पाहायला मोटर फ्लोट बोटनं जाणार.. ओशन वाईल्ड लाईफ किती दिसतंय ह्यापेक्षा ओशन मध्ये फ्लोटबोट experience हा उद्देश होता..
शुक्रवार, २४ मे - व्हिक्टोरिया बी.सी. : बुचार्ड गार्डन..
आता परतीचा प्रवास.. सिएटलला परत जाताना कॅनेडियन बॉर्डर मधून जाणार होतो.. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया भागातून..
संध्याकाळी बुचार्ड गार्डनला पोचलो..
शनिवार, २५ मे - सिऍटल:
सकाळी उजाडता उजाडता सिऍटल... :( मग बाकी ग्रुप कॅनडाला जाईल आणि आम्ही पोर्टलॅंडला..
सुट्टी संपणार, क्रूझ मधलं पँपेरिंग संपणार ह्या बरोबर मित्र-मैत्रिणींना सोडायचं हा विचार ही नकोसा वाटत होता.. सर्वानाच ते जाणवत होतं.. पार्टींग नेहमीच त्रासदायक असतं हे खरं.. पण लवकरच एक दीड महिन्यात परत भारतात भेटूच.. हा विचार खूप सुखावह होता..
एकूण ट्रिप खूपच छान झाली.. Hats off to the Management!!!.. शिपचं व्यवस्थापन हे क्लिष्ट, गुंतागुंतीचं असावं हे पदोपदी जाणवत होतं.. प्रत्येक स्टाफ मग तो स्टुवर्ड असो वा मॅनेजर, बटलर असो वा सर्व्हर, इन्फॉर्मशन डेस्क असो वा स्टोअर किपर सगळे एकदम हसतमुख, मदतगार, कष्टाळू होते.. Behind-the-Scenes ह्या टूर मध्ये शिप मॅनेजमेंट कसं केलं जातं हे पाहायला मिळतं, पण वेळेअभावी ते स्किप करावं लागलं..
ह्या समुद्र-राजकन्येबरोबरचे हे राजेशाही थाटातील ७ दिवस कसे गेले तेच कळलं नाही.. right from embarkment to dis-embarkment... शिप सोडताना भावनिक व्हायला झालं हे नक्की..
आता पुढची क्रूझ कोणती??..
-मी मधुरा..
************************************************