एकदाचा शनिवार, १८ मे उजाडला..
९ माणसे, १७ लहान मोठ्या बॅग्स अशी आमची वरात पोर्टलॅंडहुन सिऍटलला जायला निघाली..
९ माणसे, १७ लहान मोठ्या बॅग्स अशी आमची वरात पोर्टलॅंडहुन सिऍटलला जायला निघाली..
सिऍटलला अजुनी ५ जणं आम्हाला जॉईन झाले..
हुश्श!!! मिळेल तश्या टॅक्सी करत आमची पलटण प्रिन्सेस क्रूझच्या डॉकला पोचली..
भली मोठ्ठी शिप पाहून ऋचाच काय तिची आई सुद्धा आनंदानं वेडी झाली.. कधी एकदा चेक-इन प्रोसेस पूर्ण होते आणि शिपवर चढतो असं झालं होतं.. शेवटी न राहून मी आणि ऋचानं Pre-boarding केलंच.. :) दाराशीच Embarkment चं फोटोसेशन होतं... आमचे अतिआनंदी चेहरे पाहून "We love to see happy faces" अश्या कंमेंट्स नाही आल्या तरच नवल...
रूमवर वेलकम लेटर आमची वाट पाहत होते.. भरपूर ऑफर्स, क्युपॉन्स आणि बरंच काही होतं त्यात..
ऋचासाठी वेगळी फाइल ज्यात डे वाईस अॅक्टिव्हीटीजची माहिती, टीन लाउंज चे कार्ड.. लगेचच आमची स्वारी टीन लाउंज कडं.. Music Disk, Mini Movie Theather, Game Room.. काय नव्हतं तिथं? अलिबाबाची गुहा सापडल्याचा आनंद ऋचाच्या चेहऱ्यावर होता..
ऋचासाठी वेगळी फाइल ज्यात डे वाईस अॅक्टिव्हीटीजची माहिती, टीन लाउंज चे कार्ड.. लगेचच आमची स्वारी टीन लाउंज कडं.. Music Disk, Mini Movie Theather, Game Room.. काय नव्हतं तिथं? अलिबाबाची गुहा सापडल्याचा आनंद ऋचाच्या चेहऱ्यावर होता..
३५०० प्रवासी, १२०० कर्मचारी असलेलं हे रुबी शिप जगप्रसिद्ध टायटॅनिकच्या तुलनेत ३ पट मोठं होतं!!!
पहिले ५ मजले मुख्यत्वेकरून कर्मचाऱ्यांसाठी, फूड स्टोरेज ह्यासाठी..
६ आणि ७ व्या मजल्यांवर Muster Stations होती म्हणजे आपत्कालीन व्यवस्था.. पहिल्याच दिवशी आपत्कालीन परिस्थितीत लाईफ जॅकेट कसं घालायचं, आपत्कालीन बोटींवर कसं जायचं यांचा एक सराव झाला..
८ ते १४ व्या मजल्यांवर प्रवाशांच्या खोल्या.. त्यात 5 मुख्य प्रकार - Suite, Mini-Suite, Balcony, Ocean-View, आणि Interior.. नावाप्रमाणेच त्यांचं स्वरुप..
| Main Lobby |
१५व्या मजल्यावर रेस्टोरंट, स्विमिन्ग पूल्स, आऊटडोअर मूवी स्क्रिनिंग आणि ओपन डेक.. १७ व्या मजल्यावर जिम आणि स्पा.. १९ व्या मजल्यावर टेनिस कोर्ट आणि जॉगिंग ट्रॅक..
क्रूझ वरचं सर्वात आवडतं काम.. उदरभरण.. :) क्रूझवर जाऊन किमान ५ पाउंड तरी वजन वाढावं लागतं नाहीतर फाऊल असतो..
जेवण म्हणजे ब्रेकफास्ट - लंच - डिनर... हे सगळं क्रुझच्या रक्कमेत included असतं.. त्यातही दोन प्रकार असतात - Traditional Dining and Anytime Dining.. Traditional Dining ठराविक वेळा ठराविक ठिकाणी जेवण घेता येतं तर Anytime Dining नावाप्रमाणेच कधीही, कुठंही.. आम्ही Anytime Dining घेतलं होतं.. Traditional Dining हे ज्यांच्या जेवणाच्या वेळा अगदी ठरलेल्या असतात आणि ज्यांना Dress Code आवडतो त्यांच्यासाठी उत्तम.. आम्ही १-२ वेळा छान तयार होऊन फोटो सेशन करून आलो.. पण अगदी casual अवतारात, मित्र मैत्रिणी बरोबर दंगा करत Unlimited Buffet वर आडवा हात मारण्यात जी मजा येते ती बाकी कुठं नाही..
अक्षरशः तिन्ही त्रिकाळ लोक खाताना दिसायचे.. वेगवेगळ्या देशांमधले वेगवेगळे प्रकार.. ५-कोर्स मिल.. इंडियन फूड कॉर्नर पण होता.. मी व्हेजिटेरिअन असले तरी खाण्याचा काहीही प्रश्न आला नाही..
पहिल्याच रात्री समुद्राच्या रौद्र रूपाची छोटीशी झलक अनुभवायला मिळाली.. पॅसिफिक तसा रफ आहेच.. पण त्या रात्री लाटा इतक्या आक्रमक होत्या की स्वतःला बॅलन्स करणं ही जड जात होतं.. लाटांच्या आवाजानं झोप ही लागणं अशक्य होतं.. पहिल्याच दिवशी अशी हालत तर पुढचे ७ दिवस कसे काढणार हा पुसटसा विचार मनात येऊन गेलाच.. मोशन सिकनेसमुळं ऋचा पण टीन लाउंज मधून लवकर परतली.. दुसऱ्या दिवशी १०-११ वाजे पर्यंत सगळे नॉर्मल झालं..
रोज रात्री ८ वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमचा आराखडा असलेलं पत्रक रूमवर यायचं.. त्यात प्रोग्रॅम्स ची लिस्ट, त्यातील परफॉर्मर, टाइम, त्यांचं ड्युरेशन इत्तमभूत माहिती असायची.. Shopping, Spa स्पेशल ऑफर्स, सिनेमा टाईमिंग्स, दुसर्या दिवशीच्या Port विषयी माहिती ही असायची.. त्यामुळं दुसऱ्यादिवशीची रूपरेखा ठरवणं सोपं जायचं..
🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️
प्रि-बोर्ड करून, रूम पाहून, एकंदरीत शिपचा अंदाज आल्यावर सुरुवातीची एक्साइटमेंट हळू हळू कमी व्हायला लागली.. खरंच शिपवर आहे ही जाणीव खूप सुखद होती... ऋचा बरोबर लहान मुली सारखी शिपभर नुसती बाघडत होते.. कधी एकदा डेकवर जाते आणि ३६० डिग्री मध्ये परिसर पहाते असं झालं होतं.. पण Emergency Run झाल्याशिवाय डेक वर जाण्यास सक्त मनाई होती..
Initial Formalities पूर्ण झाल्यावर पहिली पावलं डेककडं वळाली... डेक वर पोचले तेव्हा काही मिनिटंच शिप सुटण्यासाठी राहिली होती.. हात पसरून एक खोल श्वास घेतला.. कॅप्टननं हॉर्न वाजवून निघण्याचा इशारा दिला.. आणि हात आपोआपच टाटा करण्यासाठी उचलला गेला.. माझं मलाच हसू आलं.. कोणाला टाटा करत होते? माझी सगळी लोक तर शिपवरच होती.. मग खूप वेळ मी तिथं तशीच उभी होते.. मनातल्या मनात किनाऱ्याला बाय बाय करत.. परत कधी किनारा दिसेल माहिती नव्हतं.. निदान किमान पुढचे ४० तास तरी नाही..!!
डेकवर पार्टी माहोल होता.. मुझिक, ड्रिंकस, डान्स.. धम्माल सुरु होती.. ह्या सगळ्या गडबडीत मी एकटीच डेकवर उभी होते.. माझा सगळा ग्रुप अजुनी मला भेटलाच नव्हता.. ऋचा सुद्धा कधीची पूल मध्ये डुंबत होती.. पण हा एकटेपणा हवाहवासा ही वाटत होता..
जेवण झाल्यावर लगेचच सगळे आपापल्या रूम मध्ये गेले.. आज सगळेच दमले होते बहुतेक.. मी ही दमले होतेच कि.. सकाळी लवकर पोर्टलॅंडहून ट्रेननं निघून सिएटलला आलो.. गेले दोन दिवस चार फॅमिलीज घरी होत्या..
रात्री बेडवर नुसतीच पडून होते.. लाटांच्या आवाजानं असेल किंवा ऋचा एकटीच टीन लाऊंज मध्ये आहे ह्या विचारानं असेल पण झोपच लागत नव्हती.. १ च्या सुमारास ऋचा आल्यावर डोळा लागला..
रविवार, १९ मे..
मध्येच कधीतरी जाग आली.. बाहेर पाहिलं तर छान केशरी छटा आभाळात होती.. घडाळ्यात पाहिलं तर ४ वाजत होते.. इतक्या लवकर सूर्योदय!! धावत वरती डेक वर गेले.. अप्रतिम केशरी रंगाची उधळण करत सूर्य उगवत होता.. असा केशरी रंग आणि त्याच रंगातील विविधता ह्यापूर्वी कधीच पाहिली नव्हती.. १५-२० मिनिटाचा तो सोहळा डोळे दिपवून गेला.. मग काय पुढचे ७ दिवस रोज सकाळी ४ वाजता डेक वर येऊन बसायचा नियमच झाला.. पण असा सूर्योदय परत कधीच दिसला नाही..
खास सूर्योदय पाहायला डेकवर येणारी माझ्या सारखी २-४ वेडी माणसे भेटायची.. मानेनं किंवा नजरेनंच एकमेकांना ओळख दाखवली जायची.. न बोलता.. वातावरणातील ती शांतता भंग न करण्याची खबरदारी घेतली जायची.. मूकपणानं ते मोहक सौंदर्य आत खोलवर साठवून घेतलं जायचं.. हवेत गारवा वाढायला लागला कि आतमध्ये येऊन कॉफीच्या कपाबरोबर परत तंद्री लागायची.. सकाळचे ते स्वतःबरोबर घालवलेले १-२ तास खूप एनर्जेटिक असायचे..
सिऍटल-जुनेऊ हा प्रवासाचा पहिला टप्पा सर्वात मोठ्ठा म्हणजे ४० तासाचा होता.. सुरुवातीला ह्या ४४ तासांचं थोडं टेन्शन आलं होतं.. मित्रांचा मोठ्ठा ग्रुप असल्यानं गप्पाटप्पांमध्ये मज्जाच येईल ही खात्री होतीच.. पण ह्या दोन दिवसात शिपवर भरपूर कार्यक्रम आयोजित केले होते.. फॅशन शो, कॅप्टन्स डिनर हे मुख्यत्वानं नोंदवावेसे..
संध्याकाळी कॅप्टन्स डिनर म्हणजेच फॉर्मल नाईट... फॉर्मलवेअर हा ड्रेस कोड.. कॅप्टन ह्यावेळी स्वतःबद्दल, शिप बद्दल माहिती सांगतो.. शॅंपेन पिरॅमिड इव्हेंट हा पण मस्त एक्सपेरियन्स होता.. कपलनं एकत्र जाऊन कॅप्टन बरोबर शॅम्पेन ग्लासीसच्या पिरॅमिड मध्ये ओतायची.. नंतर सर्वाना शाम्पेन सर्व्ह केली जाते..
जागोजागी प्रोफेशनल फोटोग्राफरचे फोटोबूथ होते... वेगवेगळ्या पोझेस मध्ये फोटो काढून घेणं ही एक ऍक्टिव्हिटी झाली होती.. :)
क्रूझवर इतकं काय काय करण्यासारखं होतं कि कधी दिवस उजाडायचा आणि मावळायचा हेच कळायचं नाही.. रोज दिवसभर काही ना काही प्रोग्रॅम असायचेच.. मुझिक शो, मॅजिक शो, टॉक शो, कॉमेडी शो, आर्ट एक्सिबिशन्स, केरिओकी, बिंगो, मुव्हीज, सिंगिंग कॉम्पिटिशन वगैरे वगैरे... प्रत्येकाला त्याच्या आवडीप्रमाणं काही ना काही तरी करता येत होतं..
गेले ३० तास शिप मध्ये आहोत हे जाणवलं पण नाही.. आता उद्या सकाळी ११ च्या सुमारास शिप डॉक ला लागणार..
-मी मधुरा..
************************************************
No comments:
Post a Comment