Sunday, June 2, 2019

*मधुरा’ज आर्क्* - Alaska Wilderness!! - Let's GO

लहानपणापासूनच मला समुद्र खूप आवडतो.. सुट्टीत कोकणात गेल्यावर तासंतास समुद्र किनारी बसून त्याला निरखणं हा माझा आवडता छंद... 'सिंदाबादच्या सफरी' वाचल्यानंतर तर त्याच्याबद्दलचं कुतूहल जास्तीच वाढलं.. सिंदाबाद सारखं सफरीवर जावं आणि समुद्राच्या पोटातील गुपितं शोधावीत असं वाटायचं..  कित्येकवेळा अश्या सफरीच्या दुनियेत मी हरवून जायची.. सुट्टीहून घरी परत येताना शंख, शिंपले ह्याचा खजिना नक्की बरोबर असायचा.. 'सिंदाबाद' कधी काळाच्या पडद्याआड गेला आणि त्याची जागा 'दुनियादारी' नं घेतली हे कळालंच नाही.. पण समुद्राबद्दलचं प्रेम मात्र कायम राहिलं.. 

समुद्रसफर करणं इतकं सोपं आहे हे मला इकडं अमेरिकेत आल्यावरच कळालं.. सुट्टीसाठी म्हणून समुद्रसफर (Cruise) करता येते हे कळाल्यावर माझ्यातला सिंदाबाद परत जागा झाला.. आपण दोघांनीच काय सफरीवर जायचं.. मोठ्ठा ग्रुप हवा - असं म्हणून नवऱ्यानं त्याला परत शांत झोपवलं.. :) पण अधून मधून तो मनात खळबळ माजवत असे.. 'Things To Do Before I Turn Fifty" ह्या मध्ये 'एक समुद्रसफर.. Cruise ' हे होतंच.. समुद्रसफर तर करायचीच.. पण कोणती?? 
कॅरेबियन आयलँड्स, युरोप ही झाली लोकप्रिय ठिकाणं.. पोर्टो रिको आणि युरोप पाहून झाल्यानं मला त्यात बिलकुल इंटरेस्ट नव्हता.. शाळेत भूगोल शिकत असताना अलास्का, नॉर्थ पोल ह्याबद्दल प्रचंड कुतूहल होतं.. बर्फाच्छादित प्रदेश, इग्लू, एस्किमो, पोलर बेअर.. त्यामुळं 'अलास्का'ची समुद्रसफर मनात पिंगा घालत होती.. 
प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते तेव्हाच ती घडते.. महेशच्या शाळेच्या मित्रांच्या गेट टुगेदर मध्ये अलास्का क्रूझचा विषय निघतो काय आणि ट्रिप ठरते काय.. अगदी स्वप्नवत वाटावं असं.. 


'१८ मे ते २५ मे - प्रिन्सेस क्रूझ - डेस्टिनेशन अलास्का'..
७ दिवासाची राऊंडट्रीप... 
सिऍटल - जुनेऊ - स्कॅगवे - केतचिकेन - व्हिक्टोरिया बी. सी. - सिऍटल ... विथ Inside Passage आणि Glacier Bay National Park.. 

.. आणि सहा फॅमिलीची बुकिंग्स झाली पण..  


ह्या ७ दिवसातील प्रत्येक टप्प्यात, दिवसा शिप डॉकला लागतं आणि रात्री उशिरा परत पुढच्या प्रवासासाठी निघतं.. दिवसभर त्या त्या ठिकाणची सफर (Excurtions) करायची.. ही Excurtions एकतर Princess कडून किंवा बाहेरून लोकल टूर कंपनी कडून बुक करता येतात.. आम्ही मोस्टली प्रिन्सेस कडूनच केली.. काही ठिकाणं अर्धा दिवस तर काही पूर्ण दिवस घालविण्यासारखी होती.. खूप Excursions असल्यानं, नेमकं काय करायचं? must do things कोणत्या? यासाठी आधी बरंच वाचन, online research केला.. अलास्काला जायचं तर main attraction was 'Glacier Walk'.. बाकी Rain Forest Hike, Float Boating, Exploring Wildlife हे तर होतंच.. आमच्या ग्रुप मध्ये ऋचा एकटीच Teen-ager असल्यानं तिच्या आवडीनुसार आमची Excurtions Book झाली..
   


-मी मधुरा.. 

************************************************

No comments:

Post a Comment