ये मोह मोह के धागे...
आज पुन्हा हे गाणं ऐकलं, निमित्य आपल्या लाडक्या पावसाचं...
आज सकाळपासूनच पाऊस भुरभुरतोय.. हवेत मस्त गारवाय.. आपली BetweenU&Me platlist लावलीय..
खिडकीशी बसून पाऊस पाहातीय.. हातात गरमगरम कॉफीचा मग..
इतक्यात,
ये मोह मोह के धागे.. गाणं सुरु झालं..
आणि
मन कसं गुंतत गेलं.. त्या नाजूक भावुक वेढ्यामध्ये, अगदी आपसूक...
हे धागे सोडवू तरी कसे?.. काही तुझ्या हातात आहेत आणि काही माझ्या.. एकमेकांना स्पर्श न करता सोडवणं तसं अशक्यच.. नाही का?.. तू तिथं दूरवर आणि मी इथं कुठंतरी.. दोन ध्रुवांवरचे आपण, तरी घट्ट विणले गेलेले.. एकमेकांमध्ये गुंतलेले.. काहीतरी अनामिक पण तरी अपूर्ण!
खरं तर तू भेटल्यापासून अपूर्ण असे काहीच वाटत नाही, पण तरी ही पूर्णत्वाची भावना नाही.. "तुझ्याशिवाय जगू शकणार नाही" ह्या बोथट वाक्यावर आता विश्वास ठेवावासा वाटतोय..

जगतो तर आहोतच आपण, आठवणींचे रंग भरत.. 'काश आप यहा होतें, तो जीने का मजा कोई और होता' असे म्हणत.. तुझा हात हातात घेऊन, बोटात बोटे गुंफून, तुला फील करत.. काहीही न बोलता बरेच काही सांगत..
ये मोह मोह के धागे
तेरी उगलियोंसे जा उलझे..
आठवत ही नाही मी कधी तुझ्या प्रेमात पडले.. जशी प्रेम ही भावना मनात आकार घ्यायला लागली, तेव्हापासून तूच तर त्याचं मूर्त रूप आहेस.. कोणी त्याला क्रश ही म्हणत असतील पण माझ्यासाठी ते प्रेमच होतं, आहे आणि असेल.. त्या भावनेचं पुढं काय? हे ही माहिती नव्हतं.. पण मी माझ्या भावनांशी प्रामाणिक मात्र नक्कीच होते.. त्या भावना मी मनापासून जगले.. मग ते तुझ्याकडं पाहणं असो किंवा तुझी बाजू घेऊन भांडणं.. तुझं केसांत बोटं घालून गणितं सोडवणं असो किंवा वर्गात उभं राहून प्रश्नांची उत्तरं देणं.. रोज शाळेत सायकल लावताना तुझी सायकल कुठं दिसते का हे पाहणं असो.. सगळं नुकतंच घडतंय असं वाटतंय.. तुझा तो गोंडस चेहरा समोर आला कि असंख्य आठवणी दाटून येतात..
कोई टोह टोह ना लागे.. हेच खरं..
कधी समजलंच नाही आपल्याला ह्या भावना, हे भावनिक गुंते कसे हाताळायचे.. आपण त्यात अडकत होतो, हो ना? तू माझ्यामध्ये अन मी तुझ्यामध्ये..
ह्या नात्याला तुझ्याकडून शिक्का मोहर्तब नसताना, ह्या नात्याला कसलंही भविष्य नाही हे लख्ख ठाऊक असताना, मी मात्र गुंततच गेले.. कशासाठी? का फक्त आकर्षण होतं? शारीरिक तर नसावं.. इतकी वर्षे तू नसताना ही, ती भावना तशीच टिकून आहे.. आपले रस्ते वेगवेगळे आहेत हे माहित असूनसुद्धा मी प्रेम करतच राहिले.. आज इतक्या दूर असून सुद्धा आपण एक आहोत.. एकदम घट्ट.. कदाचित निस्सीम, निरतेशीय प्रेम हेच कारण असावं..
किस तरह गिरह ये सुलझे..
ही गिरह, ही गाठ एकदम घट्ट आहे.. "we were destine to meet" असं तू म्हणतोस.. आत्तापर्यंतच्या आयुष्यात चढ उतार पाहून, तापून सुलाखून तयार झालेलो आपण, ह्याच वेळी एकमेकांना भेटणार असू... कसली विचित्र गाठ आहे ना ही, फक्त जन्माचीच नाही तर अगदी मृत्यूनंतर पुढं ही.. कारण 'काहीही विरून जात नाही' हा माझा विश्वास आहे.. आपण पुढं ही भेटूच.. आणि भेटतच राहू..

है रोम रोम इकतारा बादलोंमे से गुजरे..
पाऊस आणि आपण दोघं... आपल्या सगळ्या भेटी ह्या अश्याच पावसातल्या.. चिंब भिजलेल्या.. उतरून आलेल्या आभाळाच्या साक्षीनं, साशंक मनानं, पहिल्यांदा हातात धरलेला हात, अजुनी रोम रोम फुलवतो.. वाटलंत तेव्हा, हाच तो क्षण मला साठवून ठेवायचाय, आयुष्यभर.. काय माहिती होतं कि ह्याच उतरून आलेल्या आभाळात, मीच पाऊस होऊन तुझ्यावर बरसत राहीन..
पहाटे पहाटे हातात हात गुंफून, ढगातून वाट काढत पाहिलेला सूर्योदय.. कापसाची दुलई टाकल्यासारखे ते ढग आणि त्या ढगांमध्ये एका शालीत गुरफटलेले तू आणि मी.. अहाहा..
तश्या तुझ्या रोमान्सच्या कल्पना जरा हटकेच.. गिफ्ट्स, चोकोलेट्स देणं तुला पटत नाही.. 'Rather, I will invest in memories' असं तुझं उत्तर..
तू होगा जरा पागल तुने मुझ को है चुना..
हे मी मला म्हणायला पाहिजे, 'मै हूँ थोडी पागल मैने तुझको हैं चुना..' कारण मी तर बेस्टचाय.. माझी तर मी अशीही फेवरेट आहेच पण तुला 'मी आवडते' म्हणून माझ्यावर जरा जास्तीच प्रेम करू लागलीय.. 'तू मला पडलेलं आणि साकार झालेलं सुंदर स्वप्न आहेस..' आपण दोघं ही तसे वेडेच.. वेडे काय ठार वेडे म्हणायला पण हरकत नाही.. ह्या वेडेपणात पण शहाणपणा आहे, हो ना?
कैसे अनसुना तूने सब सुना..
मी तुला कधी काही सांगितलेच नाही.. तसं काही सांगायची वेळ पण आली नाही.. सोशल मीडिया वर तुला दिलेल्या कंमेंट मधून, झालेल्या चाट मधून, मला असलेला तुझ्याबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर, तुला कळवा असं मात्र वाटायचं.. वाटा वेगळ्या झाल्या होत्या तरी गुंतलेले धागे, मन अजुनी शाबूताय.. नात्याला भविष्य नव्हतं तरी तू माझ्या आयुष्यातून कधीच गेला नव्हतास..
आत्ता भेटल्यानंतर, तू जेव्हा डोळ्यांत खोलवर पाहिलंस तेव्हा आपल्या नात्याला भविष्य असूही शकतं याचा मी विचार करायला लागले.. हे अदृश्य, तुझे आणि माझे गुंफलेले धागे, तुला दिसायला लागले.. आपल्यामध्ये काहीतरी अनामिक आहे, हे तुला मला कळत होतं पण त्या अनामिकतेला शब्दरूप तू दिलेस..
तू दिनसा है मै रात, आ ना दोनो मिल जाये शामों की तरहा..
दोन वेगवेगळ्या ध्रुवावरचे आपण केवळ काही वेळासाठी एकत्र येतो.. जसं तिन्हीसांजेला किंवा पहाटेला दिवस आणि रात्र एकत्र येतात.. पण त्यानंतर काय? एकतर दिवसाला संपून जावं लागतं, किंवा रात्रीला.. दोघांनाही दोघांचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून एकाचवेळी सोबत चालता येतच नाही.. आठवत? तू म्हणायचास "तुझ्यावर प्रेम करायला मला तुझी in kind गरज नाही.." मला खूप आश्चर्य वाटायचे, कसं काय हा नेहमी in mind प्रेम करू शकेल? स्पर्शाची गरज नाही का वाटणार?
विरहाच्या जाणिवेनं कातर झालेले असताना, तू माझा हात अलगद हातात घेतलास आणि म्हणालास “कितीही दूर गेलीस तरी कायम माझ्यापशीच असशील.. मी स्वत:ला तुझ्यापासून तोडू शकणार नाही.. तू माझ्या अस्तित्वाचा एक भाग आहेस..” आणि मी अजूनच तुझ्यात गुंतत राहिले.. तुझ्यापासून इतकं दूर येऊन सुद्धा अजुनी तुझ्या मध्येच मला शोधत असते.. हेच गुंतून राहणं जगण्याचा भाग झालंय.. and I am loving this...
ये मोहमोहके धागे
तेरी उंगलियोंसे जा उलझे!

-मी मधुरा..
************************************************