पसारा आठवणींचा..
पसारा आहे हे मान्य केल्यावर मग पुढे काय?
त्याकडे दुर्लक्ष करणे किंवा तो नाहीच असे समजून वावरत रहाणे.. हे अगदी सोपे उत्तर, पण एका मर्यादेनंतर असे वागणे ही अवघड जाते.. मग तो आवरण्याचा प्रयत्न करणे किंवा तो नजरेसमोरुन नाहीसा करण्याचा प्रयत्न करणे इतकेच काय ते हातात राहते..
२००८ ला अमेरिकेतून इंग्लंडला काही वर्षांसाठी प्रोजेक्टवर जाताना मी ह्या दिव्यातून गेले आहे.. आणि 'गरजेपेक्षा जास्ती गोष्टी खरेदी करायच्या नाहीत, सोसासोसाने जमावायच्या नाहीत' हा कानाला खडा ही लावला होता.. पण काळापरत्वे, तो खडा कधी गळून पडला हे कळलेच नाही.. काही गोष्टी काढून टाकणे, फेकून देणे तेव्हाही जमले नव्हते.. मुख्यत्वे करून ज्यामागे काही आठवणी आहेत, ज्यात भावना गुंतल्या आहेत.. 'आठवणींचा हिंदोळा' असे लिहिलेले कित्येक बॉक्सेस (हो हो बॉक्सेस) आजही स्टोरेज मध्ये पडून आहेत.
सगळ्यात जास्त पसारा, गोंधळ असणारे, किंवा तो आहे असं कायमच वाटणारे ठिकाण म्हणजे आपले कपड्यांचे कपाट. जेथे इंडियन, एथिनिक, वेस्टर्न, इंडोवेस्टर्न दाटीवाटीने वर्षानुवर्षे नांदत असतात..
ह्याशिवाय साड्या.. 'साडी' आवडता पोशाख असल्याने हा तर वेगळाच चर्चेचा विषय आहे.. आईनी हौसेनी घेतलेली पहिली साडी, लग्नातला शालू (जो त्याच दिवशी पहिला आणि शेवटचा नेसला), आजीची नऊवार पासून ते माझे स्वतःचे कलेक्शन.. पेटीकोट, ब्लाउजेस.. त्याचेही आता दोन-तीन सेट. न होणारे, होणारे, नव्या स्टाईलचे. त्यात रेडिमेडचीही भर...
जीन्स, ट्राउझर्स, कॅप्रीज, टॉप्स, टी-शर्ट, ब्लाऊजेस, स्कर्ट्स, मिडीज, ट्युनिक्स, चुडीदार, सलवार, पतियाळा, लेगिन्ग्ज, कुर्ते, ओढण्या, स्टोल्स....
न होणारे, वजन कमी-जास्त होईल तेव्हा घालू म्हणून ठेवून दिलेले, आठवणीखातर ठेवलेले कपडे काढून टाकणे, जुन्या सवयीच्या, प्रेमाने घेतलेल्या, दिलेल्या वस्तु फ़ेकून देणे सोपे नाही.
मॅचिंग बॅग्स, पर्सेस, क्लचेस तसेच सँडल्स, चप्पल, बूट यांची गणती तर संपतच नाही..
तसेच दागिन्यांचेही.. सोन्याचांदीचे लग्नातले, काही कारणाने घेतलेले दागिने, प्रेशस-सेमी प्रेशस स्टोन्स, बरोबरच मॅचिंगची बीड्स, कॉस्च्युम ज्वेलरी.. वापरात नसले तरी कधीतरी लागेल म्हणून ठेवलेले, किंवा कोणीतरी दिले आहे म्हणून जपून ठेवलेले असे अनेक दागिने..
कधीतरी लागतील म्हणून जपून ठेवलेले रॅपिंग पेपर्स, गिफ्ट बॅग्स, गिफ्ट बॉक्सेस…
स्वयंपाकघरातील पसारा... स्वयंपाकाची भांडीकुंडी काही जुनी काही आधुनिक.. जुनी टाकवत नाहीत आणि नवीन भांड्यांचा मोह सुटत नाही.. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स तर रोज शेकडोने बाजारात येतात... येथे ही आठवणींचा पसारा आहेच.. लग्नातल्या रुखवतापासून ते पिढीजात चालत आलेल्या वस्तू मोठ्यांचा आशीर्वाद म्हणून किंवा आठवण म्हणून जपून ठेवल्या जातात..
फोटो, फोटो अल्बम्स, ग्रीटिंग कार्ड्स, लेटर्स, मेमो बुक्स, सुविनीर्स हे सगळे कसे टाकून द्यायचे?... खरंच हा पसारा आहे का? पसारा असला तरी मन हे मानायला तयार होत नाही.. मग 'आठवणींचा हिंदोळा' असे लेबल लावून एका छनाश्या बॉक्स मध्ये जपून ठेवले जाते..
म्हणूनच आठवणींचा पसारा सगळ्यात मोठा आणि त्या पसाऱ्याचा भारही...
आवरायचा प्रयत्न करतानाच कळत जातं आपल्या आवरण्या पलीकडचा आहे हा पसारा...
हा सगळा पसारा आपणच निर्माण केलेला आहे.. आपला पैसा, वेळ, उर्जा खर्च करुन जमा केलेला आहे.. या वस्तु ना धड गरजेच्या, ना धड अडगळीच्या, पण मनाला सुख देणाऱ्या नक्कीच असतात..
-मी मधुरा..
१ सप्टेंबर २०२०

No comments:
Post a Comment