सलग दोन वर्ष हिमालयात मोहीम केल्यानं "आता ह्यावर्षी कुठं?" असा प्रश्न अनेकांनी विचारला.. पण अडीच महिने भारतात राहून, चांगलं चुंगलं खाऊन, दोन दोन लग्नात मिरवून, पूर्णपणे आऊट ऑफ शेप असणारी मी काय उत्तर देणार?.. 'अजुनी ठरतंय' असं मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेत होते..
आधीची मोहीम झाली कि लगेच पुढच्या मोहिमेचे विचार माझ्या डोक्यात घोळायला लागतात.. दोनदा हिमालय ट्रेक झाल्यानं आता काही तरी वेगळं करावं असं मनात होतं.. वेगळ्या देशात ट्रेकिंग, युरोप मध्ये सायकलिंग का अजुनी काही? अनेक पर्याय शोधणं, त्यांचा अभ्यास करणं सुरु होतं..
माझं हिमालयाशी एक नातं, एक कनेक्ट आहे.. तो सतत बोलावत असतो.. हे कदाचित माझ्या 'मानसरोवर'च्या आकर्षणामुळं ही असेल.. खरं तर मला कैलास मानसरोवरनं सोलो ट्रीपची सुरुवात करायची होती.. पण २०२० पासून चीननं कैलास मानसरोवर यात्रेवर बंदी आणल्यानं, सुरुवात EBC नं झाली.. आता चीननं बंदी उठवल्यानं ही यात्रा पुन्हा सुरु झालीय.. काय सांगावं चीनच्या मनाचं?.. मन पालटलं आणि परत बंदी आणली तर? त्याआधी 'मानसरोवर' करणं शहाणपणाचं..
फेब्रुवारी २०२४:
तर, मिडफेबच्या आसपास भारतातून परत आल्यावर, कैलास-मानसरोवरला जायचं पक्कं झालं.. लगेचच, माझी हिमालय ट्रेक आयोजक नीतीला संपर्क केला.. कैलास-मानसरोवर ही अध्यात्मिक, पवित्र जागा असल्यानं असा अनुभव मला ह्या ट्रेककडून अपेक्षित होता.. पण तिच्या itineraryतून मला तो मिळेल असं वाटलं नाही..
ईशा फौंडेशन कैलास-मानसरोवर यात्रा आयोजित करतात हे इनर इंजिनीरिंग कोर्सच्या वेळी कळालं होतं.. पण त्यांच्याकडं एक वर्ष आधीपासून रेजिस्ट्रेशन सुरु होतं.. जरा शाशंक मनानंच त्यांच्या साईट वर गेले आणि आहो आश्चर्यम..
ह्यावर्षीच्या शेवटच्या बॅचमध्ये माझं रेजिस्ट्रेशन झालं सुद्धा!.. १ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर..
रेजिस्ट्रेशन तर झालं पण त्यांच्याकडून पुढं १-२ आठवडे काहीच उत्तर आलं नाही..
मार्च २०२४:
१८ मार्च.. ई-मेल आली.. एका पोर्टल पेजवर जाऊन पुढच्या स्टेप्स पूर्ण करा..
पोर्टलवर ठळक अक्षरात पहिलंच वाक्य 'मेडिकल क्लीअरन्स' मिळाल्यावरच तुमची सीट कन्फर्म होईल.. आणि खाली भली मोठ्ठी लिस्ट.. ती पाहूनच गरगरायला लागलं.. गेल्या दोन ट्रेक्सना असलं काहीच करावं लागलं नव्हतं.. पैसे भरले आणि झालं.. इतकं सारं मेडिकल पेपर वर्क.. मेडिकल वेवर, पर्सनल मेडिकल इन्फॉर्मशन फॉर्म्स, फॅमिली मेडिकल हिस्टरी, डॉक्टरनं सही केलेलं फिटनेस सर्टिफिकेट, सगळ्या ब्लड टेस्ट्स, EKG, TMT (exercise EKG Test).. हे रिपोर्ट्स त्या पोर्टल वर अपलोड करायचे, त्यांचं डॉक्टर पॅनल ते टेस्ट्स रिपोर्ट्स पाहून क्लीअरन्स देणार.. आणि त्यावर तुम्ही जाणार का नाही ठरणार..
१८ मार्च.. ई-मेल आली.. एका पोर्टल पेजवर जाऊन पुढच्या स्टेप्स पूर्ण करा..
पोर्टलवर ठळक अक्षरात पहिलंच वाक्य 'मेडिकल क्लीअरन्स' मिळाल्यावरच तुमची सीट कन्फर्म होईल.. आणि खाली भली मोठ्ठी लिस्ट.. ती पाहूनच गरगरायला लागलं.. गेल्या दोन ट्रेक्सना असलं काहीच करावं लागलं नव्हतं.. पैसे भरले आणि झालं.. इतकं सारं मेडिकल पेपर वर्क.. मेडिकल वेवर, पर्सनल मेडिकल इन्फॉर्मशन फॉर्म्स, फॅमिली मेडिकल हिस्टरी, डॉक्टरनं सही केलेलं फिटनेस सर्टिफिकेट, सगळ्या ब्लड टेस्ट्स, EKG, TMT (exercise EKG Test).. हे रिपोर्ट्स त्या पोर्टल वर अपलोड करायचे, त्यांचं डॉक्टर पॅनल ते टेस्ट्स रिपोर्ट्स पाहून क्लीअरन्स देणार.. आणि त्यावर तुम्ही जाणार का नाही ठरणार..
एप्रिल २०२४:
१४ एप्रिल.. ब्लड वर्क झालं.. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले पण.. पण HbA1C ६.७.. भारतात जाताना ६.३ होतं ते आता ६.७.. 😭
पर्सनल चेकप.. @डॉक्टर्स ऑफिस.. गेल्या गेल्या वजन घेतलं.. १६६ पाउंड.. ७५ किलो पेक्षा ही जास्त..😳
१४ एप्रिल.. ब्लड वर्क झालं.. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले पण.. पण HbA1C ६.७.. भारतात जाताना ६.३ होतं ते आता ६.७.. 😭
पर्सनल चेकप.. @डॉक्टर्स ऑफिस.. गेल्या गेल्या वजन घेतलं.. १६६ पाउंड.. ७५ किलो पेक्षा ही जास्त..😳
भारतात जाऊन आल्यावर वाढलेल्या ग्लुकोज लेव्हल्स आणि वाढलेलं हे ३ किलो वजन.. डोळ्यांत टचकन पाणी आलं.. माझ्या हातात जे काही होतं ते सगळं करून सुद्धा वजनाचा आलेख चढताच होता.. त्यात आता डायबिटीस..
ह्यावर डॉक्टरचं म्हणणं "इतकी निराश नको होऊ.. HbA1C ६.७ कडं धोक्याचा इशारा म्हणून पाहू.. लगेच गोळीची गरज नाही.. आपण तीन महिन्याचा डायबेटिस प्रोग्राम करून टेस्ट रिपीट करू आणि ठरवू पुढं काय करायचं.." तिच्या ह्या आशावादी बोलण्यानं थोडं हायस वाटलं..
२०१३ मध्ये थायरॉईड डिटेक्ट झालं तेव्हाच वजन ६५ किलो आणि आता २०२४ मध्ये ७५.५.. गेल्या ११ वर्षात साधारण ११ किलो.. ज्यामुळं मी आता ओबीस कॅटॅगरीत आले.. थायरॉईड + ओबीस + डायबिटीस = जीवघेणं समीकरण.. नशिबानं EKG नॉर्मल होता..
२५ एप्रिल: ईशा फौंडेशन कडून ई-मेल.. त्यांच्या डॉक्टर्स पॅनलनं पुढच्या आठ आठवड्यात किमान ५ किलो वजन कमी करायचं, HbA1C ६ वर आणायचं आणि TMT आवश्यक असल्याचं सांगितलं.. ही ई-मेल वाचून पूर्णपणे निराश झाले.. इतकी वर्ष इतके प्रयत्न करून पण एक औन्स वजन कमी झालं नाही, आता आठ आठवड्यात कसं कमी होणार??.. त्यांना ह्यापूर्वी अश्याच वजनावर EBC, अन्नपूर्णा ट्रेक केल्याचं आणि हे ही मी करू शकेन असं सांगून पटवायचा प्रयत्न ही केला.. पण त्यांचे उत्तर 'नथिंग डूइंग.. रेडूस द वेट'..
असं म्हणतात की कैलास मानसरोवर यात्रा प्रत्येकाला वेगळा अनुभव, वेगळी शिकवण देते.. माझ्यासाठी ही सुरुवात यात्रेच्या प्रयोजनापासूनच झालीय.. अध्यात्मिक अनुभव, शिकवण घेण्याआधी स्वतःला सिद्ध कर, जिद्दीनं चिकाटीनं वजन कमी कर आणि मग ये..
आत्तापर्यंत वाढत्या वजनामुळं योगाभ्यासावर पाणी सोडलं असलं तरी ट्रेकिंग, हायकिंग,मॅरेथॉन, रेसेस अश्या ऍक्टिव्हिटीज करू शकत होते.. पण आज वजनामुळं जर ह्या ऍक्टिव्हिटीज करण्यात अडथळा निर्माण करणार असेल तर.. छे.. छे.. डोकं सुन्न झालं.. नो होप्स.. नुसता अंधार..
थायरॉईड + ओबीस + डायबिटीस = जीवघेणं समीकरण आहेच..
ब्लेम करायला आज ही खूप काही आहे.. ब्लेम करून तेवढ्यापुरतं बरं वाटेल.. पण माझी भीती, जबाबदारी कशी कमी होईल?.. पूर्वी वजनाचा संबंध 'माझं दिसणं', 'माझं व्यक्तिमत्व' ह्या बाह्यांगापुरता होता, आता तो चांगलं आयुष्य जगण्याशी आलाय.. तब्बेतीशी आलाय..
दोन दिवस खूप चिडचिड झाली, हेल्पलेस वाटलं, स्वतःवर राग राग केला, रडून झालं..
डॉक्टरनं सांगितलेला डायबेटिस प्रोग्राम जून शिवाय सुरु होणार नव्हता..
आता?.. पुढं काय करायचं?.. काय करू शकते?.. माझ्या नियंत्रणात आणि नियंत्रणाबाहेर काय आहे?..
समोर दोनच ऑपशन्स होते..
एकतर हे सगळं स्वीकारून आयुष्य जगायचं.. 'मानसरोवर'चं स्वप्न सोडून द्यायचं..
नाहीतर त्यांनी दिलेलं आठ आठवड्याचं आव्हान स्वीकारायचं.. होऊन होऊन काय होईल? वजन कमी नाही होणार.. मानसरोवर नाही होणार.. पण प्रयत्न केल्याचं समाधान तरी असेल.. आणि वजन कमी झालंच तर.. unlimited possibilities.. हा विचार सुखावणारा आहे..
आता नकारात्मक विचार बाजूला सारून, नव्या उमेदीनं, पूर्ण अभ्यास करून, तयारीनं हे आव्हान मी स्विकारायचं ठरवलंय..
(to be continued...)
-मी मधुरा..
************************************************
No comments:
Post a Comment