Wednesday, May 8, 2019

The Power of Peaceful Demonstration

८ मे २०१९..  
आज ऋच्याबरोबर एका रॅलीला गेले होते .. काय मस्त अनुभव होता!! 


इकडे अमेरिकेमध्ये सध्या स्कुल फंडिंग, शिक्षकांचे जॉब, त्यांचे पगार वाढ अश्या अनेक समस्या उदभवत आहेत. पुढच्या स्कूल इयर पासून ओरेगॉन मध्ये बऱ्याच शिक्षकांचे जॉब जाणार आहेत. त्यामुळे एका वर्गात मुलांची संख्या वाढणे, नर्स, कॉन्सिलर असा सपोर्टींग स्टाफ नसणे अश्या समस्या निर्माण होतील.. त्या विरोधात आजची रॅली होती.. 




#redfored (रेड फॉर एडही टॅग लाईन होती.. सगळे रेड कपड्यात चौकाचौकात सकाळी वाजल्या पासून हातात पोस्टर्स घेऊन उभे होते.. चौकात पण रस्त्यावर नाही.. बाजूला कॉर्नर ला.. ते ही एकदम शिस्तीत.. घोषणा नाहीत.. कि निंदा नालस्ती नाही.. येणाऱ्या जाणाऱ्या गाडयांना पाहून पोस्टर्स हलवणे.. हात हलवणे.. इतकी काय ती ऍक्शन होती.. 

आम्हा सपोर्टर्स ना पासून गाड्यांचे हॉर्न वाजत होते.. ते ही त्यांचा ह्या रॅली ला सपोर्ट असेल तर.. Honk if You Support असे पोस्टर ही होते.. 


सकाळी ते १० गावातल्या ठराविक चौकात आणि नंतर waterfront मैदानात ही रॅली झाली.. 


मला ह्यातील जाणवलेला बोनस म्हणजे ऋचा सारख्या young kids ना मिळालेली hope... 

The power of peaceful demonstration for causes they believe in.





ऋचाचा मला खूप अभिमान वाटतो कारण तिच्या शाळेतील शिक्षकांना सपोर्ट करायला तिने ग्रुप तयार केला.. -१० मुले यायला तयार झाली आणि ऐनवेळी ती त्यातील काही गळाली.. पण निराश होता ती रॅली ला गेली आणि तिच्या शिक्षकांच्या बाजूला ती तास उभी राहिली.. 




-मी मधुरा.. 

************************************************

Wednesday, April 10, 2019

आठवणी.. सुगंधी कुपीतल्या!!!

आठवणी.. सुगंधी कुपीतल्या!!!

नेस कॉफी संपल्यामुळे थोड्या नाराजीनेच कॉफीसाठी आधण ठेवले.. सकाळच्या प्रत्येक मिनिटाचा हिशोब मनात तयार झाला.. 'ह्या कॉफीमुळे आज उशीर होऊ नये' हा विचार करतच आवरायला घेतले.. अहाहा... काही वेळातच कॉफीचा मंद सुगंध दरवळू लागला.. किती ओळखीचा गंध होता तो!!.. आठवणींचे अनेक कप्पे अलगद उघडू लागले.. एका छोट्याश्या कप्यात लहानपणीची ती आठवण सापडली... "माझी आज्जी!!"... सकाळचे सगळे आवरून झाले कि तिचा कॉफी ब्रेक असायचा!! कॉफी ब्रेकची ना वेळ बदलली, ना चव.. मी तिच्या आवती-भोवती मांजरी सारखी घुटमळत असायची.. ह्याचवेळी काय ती १-२ घोट कॉफी ची चव चाखता यायची.. आज कॉफी पिताना वाटलं.. आजीचं बसली आहे शेजारी आणि म्हणते आहे, "अगं.. मी इथेच आहे, तुझ्यापाशी.. थोडा वेळ काढून मला भेटत जा.." मग ठरवलं.. दर रविवारी आजी सारखी जायफळ वेलदोडा घालून झक्क कॉफी प्यायची..

अशी अनेक गंधवलय आपल्याभोवती असतात .. सकाळी उठल्यावर आपण दात घासतो तेव्हा टूथपेस्टचा वास, राखुंडी वापरत असाल तर त्याचा वास, काहीजणांना मशेरी वापरायची सवय असते ती भाजताना येणारा वास, गॅसवर उकळणाऱ्या आलं घातलेल्या चहाचा वास, अंघोळीच्या साबणांचे-शांपुंचे वेगवेगळे वास, पावडर- बॉडीस्प्रेंचे आणि अत्तरांचे वास, कारमधल्या एअर फ्रेशनरचा वास असे किती प्रकारचे वास आपण घेत असतो...  पण बरेचदा हे सगळे वास नेहमीचेच झालेले असल्यामुळे त्यांची जाणीव आपल्याला होत नसावी... पण काही गंध-सुगंधाशी आपली भावनिक जोड असते... काही व्यक्ती, काही प्रसंग त्याच्याशी जोडले गेलेले असतात.. इंग्रजीत एक म्हण आहे .. "With the right music, either you forget everything or you remember everything!" तसंच या गंधांच्या बाबतीतही खरं आहे.. फक्त यात तुम्ही विसरत काहीच नाही, नुसतं आठवता आणि हरवून जाता अश्या एका जगात जे प्रत्येकाने आपल्यासाठी तयार केलेलं असतं..

फोन वर बाबा नुसतं जरी म्हणाले कि बागेत फुले काढतो आहे तर वेगवेगळ्या वासांची लयलूट होताना दिसते.. सोनचाफा, गुलाब, मोगरा, सोनटक्का, जाई, जुई, अनंत यासारख्या सुवासिक फुलांचे वास तर आहेतच पण तगर, जास्वंद फुलांचा मंद वास, तुळस दुर्वा बेल सुद्धा स्वतःचा म्हणून एक वेगळा वास.. एकदम कसे प्रसन्न वाटते...

देवघर म्हटले कि फुलांच्या सुगंधांच्या जोडीला अष्टगंध, चंदन, धूप, उद, कपूर, उदबत्त्या यांचे वास.. आरती, मंत्रपुष्प, घंटानाद....

विंटर मध्ये फायर प्लेस सुरु केल्यावर लहानपणीच्या सकाळची आठवण होते.. पाणी तापवण्यासाठी आमच्याकडे चूल पेटवली जायची.. त्यात नारळाच्या करवंट्या, सोडणं, बाकी लाकूडफाटा वापरला जायचा.. त्याचा एक छान सुगंध वातावरणात भरून जायचा.. त्या चुलीच्या शेजारी शेकत बसलेली आजी कधी त्यात रताळी, कांदे, ओल्या शेंगा, ओला हरभरा टाकून भाजायची.. अहाहा तोंडाला पाणी सुटलं...

स्वयंपाकघर म्हणजे तर अनंत प्रकारच्या सुगंधांचं माहेरघरच!

समुद्र म्हटलं कि बीचवरचा सुखद गारवा, चाटचे येणारे वास, लाटांचा आवाज, ओल्या मऊ वाळूचा पायाला झालेला स्पर्श...

नवीन वह्या-पुस्तकांचे वास... जे आपल्याला शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण नेहमी करून देतात... आजकाल किंडल च्या, ऑन लाईन पुस्तकांच्या जगात नवीन पुस्तकांचा हा वास एखाद्या कुपीतच ठेवावा लागेल..

पहिला पाऊस!!!  No doubt पहिल्या पावसाला एक सुगंध असतो... त्याचा स्वतःचा असा एक सुगंध.. पाऊस पडल्यावर येणाऱ्या मातीचा सुगंधापेक्षा वेगळा.. मनात जपलेल्या त्या पावसाचा सुगंध.. मग तो एकट्याने भिजलेला असेल किंवा मित्र मैत्रिणीबरोबर केलेल्या पावसाळी सहलीचा असेल किंवा जोडीदाराबरोबरचे रोमँटिक औटींग असेल... प्रत्येक वर्षी परत परत त्या जादुई पावसाची आठवण करून देतो..  मुसळधार पडणाऱ्या पावसाचा सुगंध परत वेगळा जाणवतो.. एखाद्या अनुभव संपन्न व्यक्तिमत्वासारखा.. जुन्या पाण्यासारखा... थोडा शेवाळी वास असणाऱ्या या पावसापुढे आणि त्याच्या आवाजापुढे आपल्याला आपल्या मनातलही ऐकू येत नाही..

अजून एक वास म्हणजे आपल्या घराचा वास!... हो, प्रत्येक घराला स्वतःचा असा वास असतो!... "I am home…" हे फीलिंगच निम्मा थकवा घालवून टाकते.. ! बाहेर ८-१० अगदी १५ दिवस बरं वाटतं पण आपल्या घरात आल्यावर जे सुख मिळतं त्याची तुलनाच होऊ शकत नाही.. आईकडे गेल्यावर मनसोक्त घराचा वास घेतला कि मन एकदम रिचार्ज होऊन जाते..

आणि माझा सगळ्यात जवळचा, आवडता वास म्हणजे लहान बाळाच्या अंगाचा वास!... अंघोळ घातलेल्या, बेबी पावडर लावलेल्या अंगाचा, वेखंड पावडर लावलेल्या डोक्याचा वास!.. मातृत्वाचा सन्मान करणारा वास.. तो आठवला कि आठवतात ते मंतरलेले दिवस.. आणि जागवलेल्या रात्री!! .. :-)

आपल्या रोजच्या, धकाधकीच्या जीवनात अश्या लहानसहान गोष्टीतून, आठवणीतून आनंद घेता आला तर जगणं कसं 'जीवनगाणं' होऊन जातं.



-मी मधुरा.. 

************************************************

Friday, March 8, 2019

Happy Women's Day!!!

Happy Women's Day!!!💞
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
ज्याच्या असण्यामुळे महिलादिन साजरा करण्याला महत्व आहे 'असा तो'.. त्याला पण महिला दिनाच्या अनेक शुभेच्छा!! 

असा तो..
जो मला प्रोत्साहन देतो
जो मला चांगली वागणुक देतो
जो मला अनेक गोष्टीत मदत करतो
कारण 'तो' मला समजावून घेतो!!
असा तो..
ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे
ज्याच्याबद्दल मला खूप आदर वाटतो
ज्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो
कारण 'तो' माझ्या सदैव पाठीशी असतो!! 
'असा तो' कोणी 'एक' व्यक्ती नसून माझ्या आयुष्यात आलेला 'तो' प्रत्येक पुरुष आहे ज्यांच्यामुळे माझं जीवन सोप्पं, सुसह्य आणि समृद्ध झालंय!! 
मुलगी, बहीण, मैत्रीण, बायको आणि सून अश्या एकाच वेळी विविध भूमिका साकारताना एक स्त्री म्हणून ज्यांच्यामुळे मानाने जगता येतंय त्या सर्व पुरुषांचं खूप कौतुक आणि खूप खूप आभार!! तुमच्या असण्यामुळेच माझं असणं आहे!!! 
Thanks for always being there..!! 💖





-मी मधुरा.. 

************************************************

Thursday, February 7, 2019

I love ME!!

💕I Love ME! 💕






Yes! I love ME.. मै आपनी फेव्हरेट हूं ... I’m my favorite...  I believe that if I love myself first, everything else will fall in place.. I believe that, how you treat yourself sets the standard for others to treat you.. So, Love yourself first.. and be true to yourself..

I love myself and l’m proud of everything I do.. even my mistakes.. my mistake means I’m trying.. I try to forgive myself even though forgiving others is easier than forgiving myself..

I love ME…  I’m proud of who I’m... I don’t care  how others think of me.. I know I’m not perfect but I love my perfectly imperfect version of myself.. I feel confident under my own skin… thats why I’m beautiful.. 

I love ME.. so I trust myself to make best decisions for ME… I love myself enough to take the actions required for my happiness, loosen the bad ties of the past and to move on..

I love ME… I love talking to myself.. sometimes thats the only intelligent conversation I could have.. no one else understands me better than I do..

I love ME… because I’m ME.. I want to be ME.. the TRUE ME!! .. as they say, Original is worth more than someone else’s copy..  

I love ME more… When I say I love me more, that does not mean I love me more than someone else... that means I love me more than any problems, any obstacles, any situations in my life.. so I can easily concur them.. 

In this month of Love, Challenge Yourself for Self Love.. Happy Self Loving Everyone!!! 



-मी मधुरा.. 

************************************************

Thursday, January 10, 2019

Happy New Year 2019

Happy New Year Everyone!!!
3rd Jan 2019
Abu Dhabi 

2018 has been awesome year for me.. became certified Yoga Teacher.. travelled twice halfway through the Glob.. made new friends along the way... high school reunion.. and so on... All those travels with limited weight and baggage made me think of why do we carry so much stuff with us?.. is that really needed?...  Light weight travel is definitely on my radar.. :-) If we think life journey is a trip, what baggage are we carrying?.. how long are we carrying them?.. do these bags still serve the purpose?.. and most importantly who packed these bags for us?.. do we need to repack them?.. and that exactly is my 2019's (and future years) resolution.. want to travel light in every coming years, so I can use my energy wisely..

My Yoga Teacher told me a story of two Zen monks, who were walking along a country road that had become extremely muddy after heavy rains.. Near a village, they met a young woman who was trying to cross the road..  but the mud was so deep.. so she asked the monks if they could help her cross to the road. 

The two monks glanced at one another because they had taken vows not to touch a woman.Then, without a word, the older monk picked up the woman, carried her across the road, set her down at the safe place and carried on with his 
journey. The younger monk couldn’t believe what had just happened. Five hours later, finally the younger monk blurted out “As monks, we are not permitted to touch a woman, then how could you carry that woman on your shoulders?”

The older monk looked at him and replied, “I set her down on the road while ago, why are you still carrying her?”

This simple Zen story has a beautiful message about living in the present moment. How often do we carry around past hurts, grudges, fears, exceptions, guilts, disappointments, angers, believes???.. Everyone of us has our so called "Baggage" to sort and eventually let go of... so we can step into the expression of who we are.. step into true version of ourselves. Sometimes our baggage can feel fairly heavy.. but thats okay only when you know how to sort and when to let that go.. 




We need to take a look at our precious cargo space.. Considering whether we are carrying around something that doesn’t belong to us... Are we living according to someone else’s belief systems rather than living with our true self? The more we carry around other people’s baggage and live our life through the lens of someone else’s beliefs, the more we loose sight of ourself...  Focus on our own baggage and put everyone else’s down. As we do so.. we will discover more space for our own dreams and a broader understanding of it..  



Let’s step into 2019 with light baggage!! 





-मी मधुरा.. 

************************************************