Sunday, August 2, 2020

माझा लढा.. करोनाशी..

पहिला lockdown संपत असतानाच एके दिवशी सकाळी व्हाट्स अँप वर दीपकचे फॅन्सी PPE किट मधले फोटो, एअर प्युरिफायर लावून सज्ज असलेली OPD पहिली आणि रोजच्या कामाला लागले.. काम करता करता डोक्यात विचार आला, हे नक्की काय पहिले मी? दीपक अश्या ऍस्ट्रोनॉट किट मध्ये? कामात लक्ष लागेना.. म्हणून परत दिपकची पोस्ट नीट वाचली आणि लगेच त्याला मेसेज पाठवला.. सगळे ठीक आहे ना?.. काळजी घे.. पण डोक्यातून काही ते फोटोज जाईनात.. आता पहिल्यांदा COVID नामक मॉन्स्टर ची भीती वाटू लागली.. मग डोळ्यासमोर एक एक अत्पस्वकिय डॉक्टर्स, ह्या किट मध्ये दिसू लागले तशी अजुनी भीती, काळजी ह्यांनी मन घेरलं.. लांब असले कि जरा जास्तच जाणवते हेच खरे.. लगेच बाकीच्यांना फोन लावले.. त्यांचे ही त्यांच्या गरजे प्रमाणे OPD प्रोटोकॅल्स सेट करणे सुरु होते.. आपलं कोणी तरी अश्या परिस्थितीत स्वतःच्या जीवाशी खेळते आहे पाहून, न राहून ठणकावून विचारालेच.., "का सुरु केलीस OPD?, का रिस्क घेतो आहेस?, नाही काम केलेस तरी छान बसून खाशील इतके मिळवले आहेस ना?, दुसरे कोणी ..." आणि माझी मलाच लाज वाटली.. समोरून आवाज आला.., "दुसरे कोणी नाही म्हणून 'मी'.. असे नाही, हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे.. आणि मला हे मनापासून करायचे आहे.. ह्यात पैसे मिळवणे हा उद्द्येश आत्ता तरी नाही.." 'काळजी घे' म्हणून मी फोन बंद केला..

मग रोजच एक दोन चौकशीचे फोन होऊ लागले.. खूपदा VDO कॉल्सच.. शब्द बोलत नाहीत तेव्हा चेहरा बोलतो अशी आपली माझी समजूत.. आज OPD आहे का? किती पेशंट आहेत? Surgery आहे का? कोणत्या hospital ला?.. असे काही ठराविक मोजके प्रश्न.. समोरून अगदी शांतपणे माझ्या प्रश्नाची उत्तरे यायची.. आवाजात ना भीती, ना आपण कोणी ग्रेट आहोत ही भावना.. एकमेकांच्या डोळ्यात पाहून मूकपणेच आधार दिला जायचा.. कश्यापासून बनली आहेत ही माणसे? इतकी तठस्थ कशी राहू शकतात? भावना बोथट होतात का ह्यांच्या? परिणामांची कल्पना असताना, आपल्याला, आपल्या कुटुंबाला जीवाचा धोका असताना, हे काम करताना त्यांच्या मनात नेमकं काय सुरु असतं? मग ते हे सगळं चेहऱ्यावरून, शब्दातून का नाही व्यक्त करत?.. आता तर परिस्थिती अजुनी बिकट झाली आहे.. कोणत्याही डॉक्टरला कधी ही COVID सेंटर्स ना ड्युटी लागू शकते.. OPD, OTs बरोबर आता कम्पल्सरी आठ तासाची एक्सट्रा ड्युटी.. म्हणजे आता डायरेक्ट COVID च्या एरियात जाऊन लढायचे.. इतके सगळे करून पेशंटचे बरे वाईट झाले तर?? डॉक्टर ला ही वेगळी भीती आहेच.. अश्या परिस्थितीत सुद्धा ह्यांनी माणूसपण जपून ठेवले आहे.. हिपोक्रेटीक ओथ घेतलेले पांढऱ्या कोटातील हे मावळे अकर्मी योगीच.. नाही का?.. ह्या मावळ्यांचा मला सार्थ अभिमान वाटतो..

खरचं सात आठ महिन्यापूर्वी ह्यातील कित्त्येक गोष्टी आपल्याला माहिती ही नव्हत्या.. चायना, UK, America असा प्रवास करत, हा पाहुणा, कधी मुंबई, पुणे आणि आता चक्क आपल्या दारात उभा ठाकला कळालेच नाही.. सुरुवातीला lockdown ची मजा घेत dalgona coffee, नथीचा नखरा अशी वेगवेगळी challeges दिमाखात status वर झळकत होती, आता ती जागा boredom ने घेतली आहे.. सुरुवातीला प्रशासनाने घालून दिलेली chillout वाटणारी चौकट आता जाचक वाटू लागली आहे.. घालून दिलेल्या चौकटीत राहून new normशी जुळवून घेणाऱ्या, लहान मोठ्ठ्या शिलेदारांनी, ह्या चौकटी बाहेर जाऊन काम करणाऱ्या Front Line Heros, Warriors ना कधी टाळ्या तर कधी थाळ्या वाजवून, कधी दिवे उजळवून तर कधी पुष्पवृष्टी करून मानाची सलामी दिली.. त्यात ही एक वेगळा जोश, उत्साह, एकी पाहायला मिळाली.. पण आता सगळीकडे एक भीतीचे, नैराश्येचे सावट दिसते आहे..

असो.. अश्याही वातावरणात आपण घरी safe राहू शकतो ते ह्या Front Line Heros मुळे.. त्यात अगदी डॉक्टर्स, समाजसेवक, प्रशासन, पोलीस खाते या पासून ते बँक कर्मचारी, वाणी, दूधवाला, पेपरवाला सगळे सगळे आले.. माझ्या शाळेच्या ही ग्रुप मध्ये दीपक, चारू, पत्की सारखे डॉक्टर्स, ground level वर काम करणारी सरपंच सुनीता भोपे, जगण्यातील व्हिटॅमिन M जपणारी म्हणजेच बँकेत जॉब करणारी ललिता खलाटे ह्या front line heros बरोबर रक्तदान शिबीरसारखे उपक्रम आयोजित करून खारीचा वाटा उचलणारा महादेव.. यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.. guys thank you so so much..  तुम्ही बाहेर काम करता म्हणून, आम्ही आखून दिलेल्या चौकटीत का असेना, घरी स्वस्थ राहू शकतो.. तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा.. I Love You... love you all... and Happy Friendship Day!!

ही कविता तुम्हा सर्वांसाठी..

माझा लढा..

दख्खनच्या मावळ्यांना अश्या लढ्याचे काही वाटतच नाही..
हर हर महादेव म्हटलं कि रक्त कसं उफाळून येतं आणि
मग गनिम काय आणि यम काय सपशेल हार मानून जातं...

पण आजचा हा लढा काही वेगळाच आहे..
हा लढा आहे तो मानवता जपण्याचा, संकटे परतवण्याचा
माणसे जगवण्याचा आणि शांतता राखण्याचा..
पावित्र्य राखण्यासाठी, जगावरल्या प्रीतीसाठी संगरात झोकून देण्याचा..

खरचं, हा लढा काही वेगळाच आहे..
हा लढा आहे तो त्या न दिसणाऱ्या करोनाशी, रोज नवनवीन मिळणाऱ्या माहितीशी..
दोन वेळच्या भाकरीशी आणि लहानग्यांच्या चेहऱ्यावरील अनेक प्रश्नांशी..
मोठ्यांच्या डोळ्यातील काळजीशी, हा लढा आहे स्वतःचाच स्वतःशी..

पण हा वेगळा लढा मी लढते आहे..
झाकून घेऊन स्वतःचा चेहरा, बुरखा मनावरचा फेडला..
स्वतःची तमा तर नव्हतीच पण काळजीला ही जागा नव्हती..
माझ्या कर्तव्याने मला निवडले होते, चिलखत घालून धाडले होते..
मग निघाले तडक लढायला, मानवतेला जपायला..
एकजुटीची मशाल हाती घेऊन, ह्या देशाचा मावळा होऊन...
ह्या देशाचा मावळा होऊन, हा लढा मी लढते आहे, हा लढा मी लढते आहे...



-मी मधुरा.. 

************************************************

Sunday, May 10, 2020

हरवलेला 'मे' महिना..

मे महिना माझा अत्यंत लाडका महिना!.. कदाचित अस्मादिकांचे ह्या भूतलावर ह्याच महिन्यात अवतरण झाल्याने ही असेल ☺️ 

संपूर्ण वर्षातील नावानं लहान पण कर्मानं महान असलेला हा महिना!!.. मराठी असो वा इंग्लिश, व्याकरणाच्या आणि अक्षरांच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर 'मे' महिना सर्वात लहान.. पण मज्जा-मस्ती, धम्माल करण्यासाठी 'मे' महिना म्हणजे पर्वणीच.. ना शाळा, ना अभ्यास, कितीही मस्ती करा, कितीही खेळा-बघडा, छोटं-मोठठं, हवं-नको ते सारं करा.. 

अमेरिकेत 'मे' महिन्याला म्हणावं तसं महत्व नसलं तरी, मला तो हव्याहव्याशा भूतकाळात घेवून जातो..  

साधारण ३० एप्रिलच्या आसपास प्रगतीपुस्तक हातात पडायचं.. पालकांना अपेक्षित गुण मिळवून दाखवले कि ते खूश.. त्यावेळी त्यांच्या अपेक्षाही फारश्या नसायच्या म्हणा.. मग काय?.. बाहेर भर दुपारचं रणरणतं ऊन असो किंवा रात्रीचं टप्पोरं चांदणं.. घरांत पाय ठरायचा नाही.. लगोरी, डबाईस पाईस, गोट्या, भोवरा, क्रिकेट, टिकरी, विटी-दांडू, लपंडाव असे कितीतरी खेळ खेळून पालकांच्या नाकात दम आणायचो.. 

दुपारच्या वेळी कोणाकडं तरी अड्डा जमवून पालकांच्या झोपेचं खोबरं करण्यात तर हातखंडाच!.. उन्हात बाहेर खेळायचं नाही हे त्यांचं फर्मान तंतोतंत पाळायचो त्यामुळं त्यांची बोलती बंद.. कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, सापशिडी, नवा व्यापार ह्या बैठ्या खेळाबरोबरच आवळे, चिंचा, कैऱ्या, अंगणात असलेली वाळवणं यांचा फडशा पाडण्यात दुपार जायची.. ज्याच्याकडं अड्डा जमायचा त्याच्या घरी रसना, सरबताचे असंख्य डाग आम्ही असल्याची साक्ष देत असत.. हे सगळं माहिती असून ह्याकडं कधी कानाडोळा करून तर कधी ओरडायचा नुसता आव आणून खाऊची सोय कोण्या काकूनं किंवा आईनं केलेली असायची.. बैठे खेळ न आवडणारी माझ्यासारखी मंडळी पुस्तकं वाचत तिथंच पडीक असायची..

लहान मोठ्ठी सगळी मुलं-मुली एकत्र खेळायचो.. कधी कधी मुलं-मुली अशी भांडण ही होत.. आमच्या मुलींचा भातुकलीचा खेळ मांडला जायचा.. बाहुला बाहुलीचं लग्न तर मोठ्ठा सोहाळा.. ह्यात मुलं पण उत्साहानं भाग घेत.. बाहुला-बाहुलीना नवीन कपडे शिवण्यापासून ते फराळाचं करणं, सजावट, मंगलाष्टका, वरात सगळं उत्साहानं केलं जायचं.. कधी एखादी आज्जी भरतकाम, विणकाम शिकवे.. 

पाच वाजले कि भाड्यानं सायकल घेऊन गावभर भटकणं हा तर आवडीचा उद्योग.. ज्यांना सायकल चालवता येत नाही त्यांना सायकल शिकवणं आणि बदल्यात कधी 'गारेगार' कधी 'कुल्फी' ही कमाई खूप मोठ्ठी वाटायची..

संध्याकाळी घरी आल्यावर आजी कंपल्सरी आंघोळ करायला लावायची.. दिवसभर उन्हात तापवलेल्या पाण्याने अंघोळ (झळोणी) केली कि उन्हाळा बघत नाही असं तिचं म्हणणं.. शिजवलेल्या कैरीचा गर आणि उन्हात तापवलेलं पाणी.. काय मस्त वाटायचं  अंघोळ करायला.. एकदम फ्रेश.. मग शुभंकरोती म्हणून झाली कि सगळ्या मुलांची एकत्र जेवणं.. आपलं ताट घेऊन अंगणात जमायचं, चांदण्यात गप्पा मारत जेवताना नावडीची भाजी सुद्धा कशी पोटात जायची ते कळायचं सुद्धा नाही.. उन्हाळ्यात संध्याकाळी हमखास दिवे जायचे.. सिनेमाच्या गोष्टी रंगून रंगून सांगितल्या जायच्या विथ म्युझीक...

अंगणात ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत गाद्या टाकून झोपणं हा आनंदाचा उच्च्यांक!.. बिनाका ऐकून झाली कि भुताखेतांच्या गोष्टीना सुरुवात व्हायची.. चांदण्या एकमेकांना जोडून आकार तयार करत कधी झोप लागायची कळायचंच नाही..

जेव्हा मी माझ्या मुलीला ऋचाला अशी धम्माल मे महिन्या ऐवजी जुलै-ऑगस्ट महिन्यात तिच्या उन्हाळी सुट्टीत करताना पाहते, मनसोक्त, अल्लड होऊन बागडताना पहाते, अभ्यासाचं किंवा कोणत्याही कलासचं टेन्शन न घेता सुट्टी घालवताना पहाते तेव्हा मला माझा हरवलेला मे महिना 'जुलै-ऑगस्ट' मध्ये सापडतो.. 

ऋचा ही जुलै-ऑगस्ट महिन्याची आतुरतेनं वाट पाहत असते.. कधी एकदा भारतात आजी-आबांकडं मिरजेला जाते.. तो मळा, ती नदी, ती विहीर, ते वडाचे झाड आणि मनात वर्षभर जपलेली नाती.. हे सगळं अनुभवायला ती आतुरलेली असते.

                                                                                                    
-मी मधुरा.. 

************************************************

Wednesday, April 29, 2020

Story of a Small Town Girl

I clearly remember that day, one of my best friends told me that we are going to have a Class of 93 reunion and invited me to the Whats App group. When I introduced my self in the group, someone from the group replied "is that you Paijamachhap?" That was the word for ‘small towners’ back then.. I was surprised and was amazed at the same time. After 25 years, I’m still carrying the same Paijamachhap image. Frankly it did not harm me or my self image now as it used to be before.. my first thought was really? And then wow he still remembers me and wants to catchup from where we left.. 

It wasn’t that easy back then. I went through lots of emotional breakdowns. Even when I was school going as a kid, I remember getting teased by my cousins, that might be unintentional and  might be just fun for them, but my brother and I were always a target. Initially I used to laugh at it.. but when it started happening every time we meet, it started bothering me. I started judging myself about the way I talk, how I dress, how I laugh, how I sit and list goes on and on and on. That time, I was not aware of the word bullying , or was not aware of teasing or bullying as bad or was not aware of standing against it.. I allowed them to tease me, thinking if I complain, they will think I am weak. When I overheard my aunt saying to my mom that you should seriously think of sending your kids to the city for a better future for them, it boosted my belief of being a small towner is a bad thing.


By the time, I went to the college, I started believing that I’m not smart, I’m not good enough to hangout with city folk. I was always worried about my image than my studies.. I used to drag myself to college.. always I felt like I don’t belong there .. everyday I experienced butterflies in my stomach. It was hard for me to face modern city girls as well as boys. Being in small town, I was never friends with boys. I used to take a different route to avoid them especially boys. The first two years of college was really hard on me. Learning in English Medium was another challenge as for my basic education was in Marathi. 


I did not have any friends to talk to and did not know anyone to seek a help. With all these difficulties, I don’t remember missing or bunking college. Sustaining in college and passing 12th grade was my aim. I guess, I had a fighter within me and it is still there!! I believe, everyone has a fighter with themselves but sometimes we fail to recognize that. 


During my 12th grade vacation, I joined my dad’s office. Everyday I used to go with my dad to his office and used to sit next to accountant, observing his work. That time I realized that actual work is way different than what they teach in college. One day, I asked my dad, why we weren't in the big city? If we had been in bigger city, I might have developed differently. Dad looked at me and said,”Yes, you might have gotten many more opportunities, but it depends upon how you utilize those. Its you, you develop yourself not the opportunities which develops you. Have you utilized all the opportunities that you have here?" And that was my miracle moment! Suddenly I started seeing things differently. I slowly started getting interested in work, started learning how to drive a car, joined a typing class too.. As I started doing things for me, it automatically started boosting my confidence. Then the next year, I was a totally different person from within. I started looking for opportunities in college. Joined ABVP, took Marathi literature as an optional subject.. then started writing down my emotions through journaling and poems. Now whole new world was opened for me.. found new friends who had the same interests as me.. The "small town girl" barrier faded away from my mind… it was it still out there, but I started accepting myself as who I was. By end of my last year of college I was BJP’s Taluka Youth President. The struggle was there too.. but now struggles became challenges and fear became excitement. The place where I questioned everything about myself, the place where I was not sure I was going to last even a year, but I thrived there, and became the person I am today. I even did my masters as well as my diploma in business management. That was one of the most proudest moments of my life. 


After my marriage, I came here in the US to accompany my husband… directly from small town to a developed country with one year of city living experience. I was so excited and I was very confident that I can handle anything in my life. First few weeks here were like magical dream. But soon, all my confidence and self belief shattered when I failed in my written driving test, twice. Just because I couldn’t understand the language. The lady there asked me whether I would like to have translator and I said no and took it as a challenge, and I passed the exam in my third attempt. I realized that sustaining here in this new territory, new continent was going to be more challenging than ever. Not just the new language but, new etiquettes, new society, and a new atmosphere.. 


I remember the day when I met one of my husband's colleague who was an American. I was scared to death, sweating like pig. When he saw me, he walked towards me, gave me a very promising hug and said welcome to the land of migrates.. the word" land of migrates" stuck in my mind. That was so true… People came from different continents and adjusted to their new life. Once again everything was clear. I started learning how to talk the colloquial language, started watching news, started following tv shows from where I could learn the etiquettes and the society in general. Started calling local restaurants to place and to cancel orders to see my progress. Then I did lots of volunteering at local libraries, food banks to mingle in my new society. Slowly I became one of them.


Its been 23 years now I’m here in USA. In those years, I experimented lot many things from joining school to working as a business assistant and as a tax consultant, from volunteering for different organizations to becoming a certified Yoga Teacher.


The “Small Town Girl” in me taught me valuable lessons of life. Now on social media I am known as madhura.kwd (KWD stands for Kurundwad) to stick to my roots that I came from and for those roots that kept me conquering new challenges. I will forever be in their debt. 




-मी मधुरा.. 

************************************************

Wednesday, March 25, 2020

माझी पाऊलवाट

शोधते आहे अशी एक पाऊलवाट, जी असावी 
स्वतःला दिसणारी अन् स्वत:मध्येच रमणारी
नागमोडी वळणांनी अनंतापर्यंत जाणारी….

शोधते आहे अशी एक पाऊलवाट, जेथे 
मुक्त भावनांचे गर्द निळे आकाश असावे
असंख्य स्वप्नांचे राजहंसी थवे दिसावे...  
सुप्त जाणिवांचा, नितळ मनाचा डोह असावा 
अन् स्व प्रतिमेत ही आश्वासक सोबतीचा भास व्हावा... 

शोधते आहे अशी एक पाऊलवाट, जेथे 
छेडता यावा स्वश्वासांचा सुरेल मल्हार 
थिरकावे मन होऊन स्वछंद, बेधुंद नृत्याविष्कार...
व्हावा परिसस्पर्श त्या मृदू भावनांना 
अन् झंकारावा रोमारोमात नाद गंधार तव स्मृतींचा...

शोधते आहे अशी एक पाऊलवाट, जेथे 
लकलकावेत आठवणींचे अनंत काजवे 
जादुई प्रकाशात विरून जावेत सारे रुसवे फुगवे... 
गरज न उरावी कोण्या सोबतीची
ओळख होता स्वतःचीच स्वतःशी...  

शोधते आहे अशी एक पाऊलवाट, जेथे 
अनुभवावे असे मुक्त, स्वानंदी क्षण 
अन् परतावे सुसज्ज होऊन जगण्या दैनंदिन जीवन…


-मी मधुरा..
२२ मार्च २०२०

Tuesday, November 12, 2019

ये मोह मोह के धागे...

ये मोह मोह के धागे... 

आज पुन्हा हे गाणं ऐकलं, निमित्य आपल्या लाडक्या पावसाचं... 

आज सकाळपासूनच पाऊस भुरभुरतोय.. हवेत मस्त गारवाय.. आपली BetweenU&Me platlist लावलीय.. 
खिडकीशी बसून पाऊस पाहातीय.. हातात गरमगरम कॉफीचा मग..
इतक्यात, 
ये मोह मोह के धागे..  गाणं सुरु झालं.. 
आणि
मन कसं गुंतत गेलं.. त्या नाजूक भावुक वेढ्यामध्ये, अगदी आपसूक...

हे धागे सोडवू तरी कसे?.. काही तुझ्या हातात आहेत आणि काही माझ्या.. एकमेकांना स्पर्श न करता सोडवणं तसं अशक्यच.. नाही का?.. तू तिथं दूरवर आणि मी इथं कुठंतरी.. दोन ध्रुवांवरचे आपण, तरी घट्ट विणले गेलेले.. एकमेकांमध्ये गुंतलेले.. काहीतरी अनामिक पण तरी अपूर्ण!

खरं तर तू भेटल्यापासून अपूर्ण असे काहीच वाटत नाही, पण तरी ही पूर्णत्वाची भावना नाही.. "तुझ्याशिवाय जगू शकणार नाही" ह्या बोथट वाक्यावर आता विश्वास ठेवावासा वाटतोय.. 
जगतो तर आहोतच आपण, आठवणींचे रंग भरत.. 'काश आप यहा होतें, तो जीने का मजा कोई और होता' असे म्हणत.. तुझा हात हातात घेऊन, बोटात बोटे गुंफून, तुला फील करत.. काहीही न बोलता बरेच काही सांगत..

ये मोह मोह के धागे
तेरी उगलियोंसे जा उलझे..

आठवत ही नाही मी कधी तुझ्या प्रेमात पडले.. जशी प्रेम ही भावना मनात आकार घ्यायला लागली, तेव्हापासून तूच तर त्याचं  मूर्त रूप आहेस.. कोणी त्याला क्रश ही म्हणत असतील पण माझ्यासाठी ते प्रेमच होतं, आहे आणि असेल.. त्या भावनेचं पुढं काय? हे ही माहिती नव्हतं.. पण मी माझ्या भावनांशी प्रामाणिक मात्र नक्कीच होते.. त्या भावना मी मनापासून जगले.. मग ते तुझ्याकडं पाहणं असो किंवा तुझी बाजू घेऊन भांडणं.. तुझं केसांत बोटं घालून गणितं सोडवणं असो किंवा वर्गात उभं राहून प्रश्नांची उत्तरं देणं.. रोज शाळेत सायकल लावताना तुझी सायकल कुठं दिसते का हे पाहणं असो.. सगळं नुकतंच घडतंय असं वाटतंय.. तुझा तो गोंडस चेहरा समोर आला कि असंख्य आठवणी दाटून येतात.. 

कोई टोह टोह ना लागे.. हेच खरं..

कधी समजलंच नाही आपल्याला ह्या भावना, हे भावनिक गुंते कसे हाताळायचे.. आपण त्यात अडकत होतो, हो ना?  तू माझ्यामध्ये अन मी तुझ्यामध्ये..

ह्या नात्याला तुझ्याकडून शिक्का मोहर्तब नसताना, ह्या नात्याला कसलंही भविष्य नाही हे लख्ख ठाऊक असताना, मी मात्र गुंततच गेले.. कशासाठी? का फक्त आकर्षण होतं? शारीरिक तर नसावं.. इतकी वर्षे तू नसताना ही, ती भावना तशीच  टिकून आहे.. आपले रस्ते वेगवेगळे आहेत हे माहित असूनसुद्धा मी प्रेम करतच राहिले.. आज इतक्या दूर असून सुद्धा आपण एक आहोत.. एकदम घट्ट.. कदाचित निस्सीम, निरतेशीय प्रेम हेच कारण असावं.. 

किस तरह गिरह ये सुलझे..

ही गिरह, ही गाठ एकदम घट्ट आहे.. "we were destine to meet" असं तू म्हणतोस.. आत्तापर्यंतच्या आयुष्यात चढ उतार पाहून, तापून सुलाखून तयार झालेलो आपण, ह्याच वेळी एकमेकांना भेटणार असू... कसली विचित्र गाठ आहे ना ही, फक्त जन्माचीच नाही तर अगदी मृत्यूनंतर पुढं ही.. कारण 'काहीही विरून जात नाही' हा माझा विश्वास आहे.. आपण पुढं ही भेटूच.. आणि भेटतच राहू..

है रोम रोम इकतारा बादलोंमे से गुजरे..

पाऊस आणि आपण दोघं... आपल्या सगळ्या भेटी ह्या अश्याच पावसातल्या.. चिंब भिजलेल्या.. उतरून आलेल्या आभाळाच्या साक्षीनं, साशंक मनानं, पहिल्यांदा हातात धरलेला हात, अजुनी रोम रोम फुलवतो.. वाटलंत तेव्हा, हाच तो क्षण मला साठवून ठेवायचाय, आयुष्यभर.. काय माहिती होतं कि ह्याच उतरून आलेल्या आभाळात, मीच पाऊस होऊन तुझ्यावर बरसत राहीन.. 

पहाटे पहाटे हातात हात गुंफून, ढगातून वाट काढत पाहिलेला सूर्योदय.. कापसाची दुलई टाकल्यासारखे ते ढग आणि त्या ढगांमध्ये एका शालीत गुरफटलेले तू आणि मी.. अहाहा..

तश्या तुझ्या रोमान्सच्या कल्पना जरा हटकेच.. गिफ्ट्स, चोकोलेट्स देणं तुला पटत नाही.. 'Rather, I will invest in memories' असं तुझं उत्तर.. 

तू होगा जरा पागल तुने मुझ को है चुना..

हे मी मला म्हणायला पाहिजे, 'मै हूँ थोडी पागल मैने तुझको हैं चुना..'  कारण मी तर बेस्टचाय.. माझी तर मी अशीही फेवरेट आहेच पण तुला 'मी आवडते' म्हणून माझ्यावर जरा जास्तीच प्रेम करू लागलीय.. 'तू मला पडलेलं आणि साकार झालेलं सुंदर स्वप्न आहेस..' आपण दोघं ही तसे वेडेच.. वेडे काय ठार वेडे म्हणायला पण हरकत नाही.. ह्या वेडेपणात पण शहाणपणा आहे, हो ना?

कैसे अनसुना तूने सब सुना..

मी तुला कधी काही सांगितलेच नाही.. तसं काही सांगायची वेळ पण आली नाही.. सोशल मीडिया वर तुला दिलेल्या कंमेंट मधून, झालेल्या चाट मधून, मला असलेला तुझ्याबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर, तुला कळवा असं मात्र वाटायचं.. वाटा वेगळ्या झाल्या होत्या तरी गुंतलेले धागे, मन अजुनी शाबूताय.. नात्याला भविष्य नव्हतं तरी तू माझ्या आयुष्यातून कधीच गेला नव्हतास..

आत्ता भेटल्यानंतर, तू जेव्हा डोळ्यांत खोलवर पाहिलंस तेव्हा आपल्या नात्याला भविष्य असूही शकतं याचा मी विचार करायला लागले.. हे अदृश्य, तुझे आणि माझे गुंफलेले धागे, तुला दिसायला लागले.. आपल्यामध्ये काहीतरी अनामिक आहे, हे तुला मला कळत होतं पण त्या अनामिकतेला शब्दरूप तू दिलेस..

तू दिनसा है मै रात, आ ना दोनो मिल जाये शामों की तरहा..

दोन वेगवेगळ्या ध्रुवावरचे आपण केवळ काही वेळासाठी एकत्र येतो.. जसं तिन्हीसांजेला किंवा पहाटेला दिवस आणि रात्र एकत्र येतात.. पण त्यानंतर काय? एकतर दिवसाला संपून जावं लागतं, किंवा रात्रीला.. दोघांनाही दोघांचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून एकाचवेळी सोबत चालता येतच नाही.. आठवत? तू म्हणायचास "तुझ्यावर प्रेम करायला मला तुझी in kind गरज नाही.." मला खूप आश्चर्य वाटायचे, कसं काय हा नेहमी in mind प्रेम करू शकेल? स्पर्शाची गरज नाही का वाटणार?

विरहाच्या जाणिवेनं कातर झालेले असताना, तू माझा हात अलगद हातात घेतलास आणि म्हणालास “कितीही दूर गेलीस तरी कायम माझ्यापशीच असशील.. मी स्वत:ला तुझ्यापासून तोडू शकणार नाही.. तू माझ्या अस्तित्वाचा एक भाग आहेस..” आणि मी अजूनच तुझ्यात गुंतत राहिले.. तुझ्यापासून इतकं दूर येऊन सुद्धा अजुनी तुझ्या मध्येच मला शोधत असते.. हेच गुंतून राहणं जगण्याचा भाग झालंय.. and I am loving this...

ये मोहमोहके धागे
तेरी उंगलियोंसे जा उलझे!



-मी मधुरा.. 

************************************************

Sunday, August 4, 2019

Happy Friendship Day!!


मैत्री म्हणजे... 
एकत्र खेळलेली भातुकली.. बाहुला बाहुलींचे लावलेले लग्न.. 
चिमणीच्या दातांनी वाटलेला खाऊ.. 

मैत्री म्हणजे... 
शाळेचा पार..  मिळून खाल्लेला डबा .. कैरीच्या फोडीवरून झालेले भांडण.. 

मैत्री म्हणजे... 
मैत्रिणीसह बुडवलेला तास, १कचोरी, २ सामोसे,  आणि बिलावरून झालेला वाद ... 

मैत्री म्हणजे... 
एक धुंद संध्याकाळ.. १ टेबल ... मैत्रीणींचा अड्डा आणि कटिंग चहा.. ...  

मैत्री म्हणजे... 
मैत्रिणीचे घर... हलकासा पाऊस... भजी... आणि खूप खूप गप्पा ...

मैत्री म्हणजे... 
१ कार... ४ जिवलग मैत्रिणी ... आणि एक मोकळा पहाडी रस्ता... 

मैत्री म्हणजे... 
फोन उचलताच पडणारी मैत्रिणीची गोड शिवी.. सॉरी म्हटल्यावर अजून एक शिवी ... आणि खळखळून हसणे...

मैत्री म्हणजे... 
मैत्रीणीचा एक मेसेज.. अंधुक झालेल्‍या काही ओल्या आठवणी आणि डोळ्यातले पाणी ...

मैत्री म्हणजे... 
भेटण्याचा ठरलेला दिवस.. अतिवृष्टी ... आणि मित्रमैत्रिणी बरोबर जुने क्षण नव्याने जगण्यासाठी केलेला आटापीटा...

Thank you Friends for enriching my Life!! 

Happy Friendship day!!



-मी मधुरा.. 

************************************************

Wednesday, June 5, 2019

*मधुरा’ज आर्क्* - Alaska Wilderness!! - Excursions

सकाळी १० च्या सुमारास शिप डॉकला लागायची.. मग excursions... 
संध्याकाळी पाच-सहाच्या सुमारास बोर्डिंग सुरु व्हायचं आणि सातच्या सुमारास शिप डिपार्ट व्हायची.. असं साधारण रोजचं रुटीन.. 
रोज सकाळी सात-साडे सातला मित्रांचा अड्डा जमायचा.. जिम मग ब्रेकफास्ट.. मग तयार होऊन त्या दिवशीची excursions.. ऋचा बरोबर असल्यानं आमची excursions बाकी मित्रमंडळींपेक्षा वेगळी होती..  

सोमवार, २०मे - जुनेऊ: 
अलास्का म्हटलं कि ग्लेशिअर्स!!!.. आणि नुसते ग्लेशिअर्स पाहताच येत नाहीतर तर त्यावर चालता ही येत, हे National Geographic Channel वर पाहिलं होतं.. त्यामुळं  Glacier Walk was most awaiting experience.. 

फर्स्ट स्टॉप जुनेऊ... ग्लेशियर वॉक... आमचं स्वागत करायला आमचा टूर गाईड जुनेऊ डॉक वर हातात फलक घेऊन उभा होता.. अर्धा तासाच्या ड्राईव्ह नंतर आम्ही त्याच्या avialtion land वरील छोटेखानी ऑफिस मध्ये पोचलो.. गेल्या गेल्या त्याच्या टीमनं आम्हाला बूट्स, कोट्स, ग्लोव्हस घालून जवळ जवळ एक्सिमोच केलं :) .. 

अडीच तासाच्या आमच्या टूर मध्ये हेलिकॉप्टरनं आजूबाजूचा परिसर, काही untouched ग्लेशियर्स पाहून Hubbard Glacier वर वॉक असा प्लॅन होता.. डोळे फाडून फाडून ते सौंदर्य पाहत होतो.. फोटो काढायचं भान ही राहिलं नाही.. काय काय capture करणार? each and every frame was photogenic!! ग्लॅशिअरवर पहिलं पाऊल टाकताना नील आर्मस्ट्रॉग झाल्यासारखं वाटलं :) .. चार पावलं चालल्यावर कसं चालायचं ह्याचा अंदाज आला.. 

जवळून ग्लॅशिअर मधील इंद्रधनू रंग खूप मोहक दिसत होते.. 




मंगळवार, २१ मे - स्कॅगवे: 



आज दोन Excursions 
होती.. सकाळी रेन फॉरेस्ट हाईक आणि दुपारी डॉग स्लेडींग.. 




🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️



आजचं मेन अट्रॅक्शन 'डॉग स्लेडींग.. कुत्रांची घसरगाडी.. 
अलास्कामध्ये ह्या घसरगाडीची वर्षातून एकदा मोठ्ठी रेस असते.. १४ कुत्री (अलास्कीअन हस्की) एका टीम मध्ये असतात ज्यांना बर्फावरून ९३८ मैल अंतर कटायचं असतं.. 
आम्ही ह्या अलास्कीअन हस्कीच्या ट्रैनिंग कॅम्प साईट ला जाऊन ह्या घसरगाडीचा अनुभव घेतला.. ही घसरगडी बर्फात नव्हती तर रोड वर होती.. एकदम वेगळा अनुभव होता.. 







🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️
   
जेव्हा संपूर्ण दिवस क्रूझिंग असेल त्या दिवशी ब्रेकफास्ट नंतर फ्रेश होऊन एखादा शो पाहून परत अड्डा जमायाचा.. पत्ते, गप्पा, डान्स काही ना काही सुरु असायचं.. लंचला गेलो कि दुपारचा चहा घेऊन रूम वर परत.. अश्यावेळी, मला रेस्टोरेंटच्या पिक्चर विंडोतुन समुद्राकडं पाहात बसायला आवडायचं.. डॉल्फिन्स, व्हेल्स, सी लायन्स, ऑटर काही ना काही दिसायचं.. 


नुसतं बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना निहाळयाला, त्यांचा अभ्यास करायला ही मजा येते.. आमच्या शिपवर मोस्टली ६०+ एज ग्रुप होता.. कपल्स पेक्षा फॅमिली, मैत्रिणींचा ग्रुप, कोणाचे माईल स्टोन बर्थडे, ऍनिव्हर्सरी, ग्रॅड्युएशन सेलीब्रेट करायला आलेली लोकं जास्ती पाहिली.. आमच्या बरोबर ८० वर्षाच्या आसपास असलेलं एक यंग कपल होतं ज्यांनी १००+ प्रिंसेस क्रूसेस केल्या होत्या आणि ७००+ दिवस शिप वर घालवले होते.. 

🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️🛳️


बुधवार, २२ मे - ग्लेशियर नॅशनल पार्क: 
नॅशनल पार्क जे आम्ही शिप मधूनच पाहणार होतो.. 'बोटीतूनच ग्लेशिअर्स दिसणार' ह्या व्यतिरिक्त काहीही अंदाज बांधता येत नव्हता.. ऑलरेडी ग्लेशिअर वॉक केल्यामुळं  ग्लेशिअर कसं असतं हे माहिती होतं.. (पण त्या वरून बांधलेला अंदाज सपशेल चुकणार आहे ह्याची कल्पना नव्हती)... 
ग्लेशिअर्स पाहणं हा एक सोहळा होता.. आदल्या दिवशी, किती वाजता आम्ही पार्क मध्ये एंटर होणार, किती वाजता पहिलं ग्लेशिअर पाहणार, किती वेळ शिप तिथं थांबणार सगळे डिटेल्स अनाऊन्स होत होते.. रूम वर मॅप, ग्लेशिअर्स माहिती पत्रक ही आलं होतं.. दिवसभर शिप वर ग्लेशिअर्स संबंधी शो सुरु होते.. 

सकाळी ६ वाजता शिप पार्क मध्ये एंटर होईल आणि पार्क रेंजर्स अधिक माहिती देण्यासाठी शिपवर येतील... मग काय, पहाटे सूर्योदयापासून डेकवर गेलेली मी तिकडंच रमले.. ६ चे ७ झाले ७ चे ८ तरी ग्लेशिअर्स दिसेनात.. सगळीकडं नुसते पाणीच पाणी.. शेवटी वैतागून रूम वर आले.. Princess TV वर लाइव्ह अनाऊसमेन्ट सुरु होती.. १० वाजता पहिले ग्लेशिअर दिसणार.. 'Margerie Glacier'.. मग परत तयार होऊन.. वेल पॅक.. डेक वर.. चांगली जागा पकडायला.. 


तिकडं ऑलरेडी लोकांनी गर्दी केली होती.. पण तरी आम्ही जागा मिळवण्यात यशस्वी झालो.. गर्दीत घुसून जागा पकडायची सवय अमेरिकेत २२ वर्षे राहून सुद्धा शाबूत होती.. याचा अनुभव आला :) ..


ग्लेशिअर्स चं पहिलं दर्शन.. शब्दातीत आहे.. ते याची देही याची डोळा पहायलाच पाहिजे.. निसर्गाच्या चमत्कारापुढे धन्य व्हायला होतं.. किती ही पाहिलं तरी डोळ्याचं पारणं  फिटत नव्हतं.. 



गर्दीमुळं संपूर्ण ग्लेशिअर पाहता येत नव्हतं.. मग गर्दीत कोणीतरी म्हणालं बाल्कनी रूम मधून छान दिसतं.. आमच्या सगळ्यांच्या तर बाल्कनी रूम्स होत्या.. मग धावत पाहत रूम गाठली.. 

.. आणि जो काही नजारा होता.. डोळ्यांत न मावणारा... एकटक त्या ग्लेशिअर कडं पाहात होतो.. त्यातील रंग, खुबी सगळं सगळं नीट पाहता येत होतं.. 


.. आणि अचानक बर्फाचा एक भाग समुद्रात कोसळला काही कळायच्या आत दुसरा.. आणि नंतर एक आवाज.. काळजात चर्र झाले.. आणि मग पाण्यात पडलेल्या बर्फाच्या इतर लाद्यांकडं लक्ष गेलं.. वाटलं हा पण तरी कधी ग्लेशिअर्सचाच भाग असेल.. 



एकूण आम्ही तीन ग्लेशिअर्स पाहणार होतो.. पहिलं 'Margerie Glacier' जितक्या जवळून पाहता आलं तशी बाकीची दोन 'Johns Hopkins Glacier' आणि 'Lamplugh Glacier' नाही पाहता आली.. 

ह्या ग्लेशिअर्स चं  रक्षण करण्याकरता दिवसातून दोनच शिप ह्या एरियात येऊ शकतात.. आणि ते ही ठराविक अंतरावरूनच पाहावी लागतात.. 






गुरुवार, २३ मे - केतचिकेन: 
पॅसिफिक ओशन वाइल्ड लाइफ पाहायला मोटर फ्लोट बोटनं जाणार.. ओशन वाईल्ड लाईफ किती दिसतंय ह्यापेक्षा ओशन मध्ये फ्लोटबोट experience हा उद्देश होता.. 




शुक्रवार, २४ मे - व्हिक्टोरिया बी.सी. :  बुचार्ड गार्डन.. 
आता परतीचा प्रवास.. सिएटलला परत जाताना कॅनेडियन बॉर्डर मधून जाणार होतो.. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया भागातून..  
संध्याकाळी बुचार्ड गार्डनला पोचलो..




शनिवार, २५ मे - सिऍटल: 
सकाळी उजाडता उजाडता सिऍटल... :( मग बाकी ग्रुप कॅनडाला जाईल आणि आम्ही पोर्टलॅंडला.. 
सुट्टी संपणार, क्रूझ मधलं पँपेरिंग संपणार ह्या बरोबर मित्र-मैत्रिणींना सोडायचं हा विचार ही नकोसा वाटत होता.. सर्वानाच ते जाणवत होतं.. पार्टींग नेहमीच त्रासदायक असतं हे खरं.. पण लवकरच एक दीड महिन्यात परत भारतात भेटूच.. हा विचार खूप सुखावह होता.. 

एकूण ट्रिप खूपच छान झाली.. Hats off to the Management!!!.. शिपचं व्यवस्थापन हे क्लिष्ट, गुंतागुंतीचं असावं हे पदोपदी जाणवत होतं.. प्रत्येक स्टाफ मग तो स्टुवर्ड असो वा मॅनेजर, बटलर असो वा सर्व्हर, इन्फॉर्मशन डेस्क असो वा स्टोअर किपर सगळे एकदम हसतमुख, मदतगार, कष्टाळू होते.. Behind-the-Scenes ह्या टूर मध्ये शिप मॅनेजमेंट कसं केलं जातं हे पाहायला मिळतं, पण वेळेअभावी ते स्किप करावं लागलं.. 

ह्या समुद्र-राजकन्येबरोबरचे हे राजेशाही थाटातील ७ दिवस कसे गेले तेच कळलं नाही.. right from embarkment to dis-embarkment... शिप सोडताना भावनिक व्हायला झालं हे नक्की.. 

आता पुढची क्रूझ कोणती??.. 



-मी मधुरा.. 

************************************************