उद्या पासून सुरु होणाऱ्या नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा!!
मग, झाली का तयारी? ह्यावर्षी काय पॅनडॅमिक आणि पावसामुळं भेटीगाठी, गरबा, दांडिया असे प्लॅन्स तर पाण्यातच गेलेत.. पण ह्यातून ही काहीतरी मार्ग निघेल अशी अशा करूया..
आत्तापर्यंत जसजशी आपली जीवनपद्धती बदलत गेली तसतशी सणवार साजरे करण्याची पद्धत पण बदलत गेली.. पूर्वी घरातील समया, दिवे लखलखयाला लागले कि समजायचे नवरात्र जवळ आले.. पण आता ते काम सोशल मीडिया करते.. नवरात्रीच्या नऊ रंगांची उधळण करत, गरबा दांडियांनी पर्सनल, फॅमिली कॅलेंडर्स भरू लागतात.. नऊ दिवसांचे उपवास करून वजन कसे कमी करता येईल ह्यावर चर्चा रंगतात.. परमार्थात थोडा स्वार्थ साधायचा प्रयत्न!!.. 😉.. आता नवरात्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन ही बदलतोय.. मंदिरात पाहिलेल्या, कथा पुराणात ऐकलेल्या देवींना खऱ्या आयुष्यात शोधण्याचा प्रयत्न सुखावणारा आहे.. जीवन समृद्ध करण्याऱ्या नात्यात ह्या शक्ती जोपासण्याचा दृष्टीकोन हे ह्या पॅनडॅमिकसाठी उत्तम उदाहरण..
प्रत्येकाच्या आयुष्यात उलथापालथ करणाऱ्या २०२० चा मी जेव्हा विचार करते, तेव्हा वाटतं, खरचं ह्या वर्षाने आपल्याला काय दिलं?... भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या २०२० ने खरचं काय शिकवलं? ह्यावर बऱ्याच लोकांची बरीच मते, बरेच विचार असतील ही.. पण 'उन्नीस-बीस' मधला फरक ह्या वर्षाने दाखवून दिला हे मात्र नक्की! 😁
माझ्यासाठी सांगायचे झाले तर, सोशल डिस्टंसिन्ग शिकवत याने जशी माझीच माझ्याशी ओळख करून दिली तशीच नात्यांची वीण पण घट्ट विणून दिली.. बिझी रुटीनमुळे, जिओग्राफिकल डिस्टन्समुळे धूसर झालेली नाती 'zoom' मुळे चमकायला लागली.. 'छोड आये हम वो गलिया...' हे खोटे ठरवत 'वो गलिया' परत नव्यानं उजळू लागल्या.. मित्र मैत्रिणीबरोबर, नातेवाईकांबरोबर तेथं फेरफटका होऊ लागला.. त्यांच्या बरोबरच्या मीटिंग्सनी कॅलेंडर्स भरू लागली.. मावसभावाचा लग्नाचा २५वा वाढदिवस, मावशीचा ८०वा वाढदिवस ते भाचीचा साखरपुडा, शाळा कॉलेजच्या मैत्रिणींबरोबर मासिक गाठीभेटी, गेट टुगेदर्स.. इतक्या वर्षात मागे पडलेलली नाती नव्याने बहरू लागली.. 'ह्या pandemic मध्ये आपण एकटे नाही'.. 'बहारे फिर भी आयेगी'... 'this shall pass'.. हा कॉन्फिडन्स ह्या नात्यांकडून नक्कीच मिळाला, मिळतो आहे..
म्हणूनच ह्या नात्यांचा, रोजच्या जीवनातील देवींच्या ह्या रूपाचा उत्सव नवरात्रीत साजरा करूया.. रोज एका नात्याची माळ नव्याने गुंफूया..
तर मग भेटूया पुढचे नऊ दिवस रोज एका नात्याबरोबर..
-मी मधुरा..
१६ ऑक्टोबर २०२०
No comments:
Post a Comment