२२ मार्च २०२०
Wednesday, March 25, 2020
माझी पाऊलवाट
२२ मार्च २०२०
Tuesday, November 12, 2019
ये मोह मोह के धागे...
आज पुन्हा हे गाणं ऐकलं, निमित्य आपल्या लाडक्या पावसाचं...
हे धागे सोडवू तरी कसे?.. काही तुझ्या हातात आहेत आणि काही माझ्या.. एकमेकांना स्पर्श न करता सोडवणं तसं अशक्यच.. नाही का?.. तू तिथं दूरवर आणि मी इथं कुठंतरी.. दोन ध्रुवांवरचे आपण, तरी घट्ट विणले गेलेले.. एकमेकांमध्ये गुंतलेले.. काहीतरी अनामिक पण तरी अपूर्ण!
खरं तर तू भेटल्यापासून अपूर्ण असे काहीच वाटत नाही, पण तरी ही पूर्णत्वाची भावना नाही.. "तुझ्याशिवाय जगू शकणार नाही" ह्या बोथट वाक्यावर आता विश्वास ठेवावासा वाटतोय..
ये मोह मोह के धागे
तेरी उगलियोंसे जा उलझे..
आठवत ही नाही मी कधी तुझ्या प्रेमात पडले.. जशी प्रेम ही भावना मनात आकार घ्यायला लागली, तेव्हापासून तूच तर त्याचं मूर्त रूप आहेस.. कोणी त्याला क्रश ही म्हणत असतील पण माझ्यासाठी ते प्रेमच होतं, आहे आणि असेल.. त्या भावनेचं पुढं काय? हे ही माहिती नव्हतं.. पण मी माझ्या भावनांशी प्रामाणिक मात्र नक्कीच होते.. त्या भावना मी मनापासून जगले.. मग ते तुझ्याकडं पाहणं असो किंवा तुझी बाजू घेऊन भांडणं.. तुझं केसांत बोटं घालून गणितं सोडवणं असो किंवा वर्गात उभं राहून प्रश्नांची उत्तरं देणं.. रोज शाळेत सायकल लावताना तुझी सायकल कुठं दिसते का हे पाहणं असो.. सगळं नुकतंच घडतंय असं वाटतंय.. तुझा तो गोंडस चेहरा समोर आला कि असंख्य आठवणी दाटून येतात..
कोई टोह टोह ना लागे.. हेच खरं..
कधी समजलंच नाही आपल्याला ह्या भावना, हे भावनिक गुंते कसे हाताळायचे.. आपण त्यात अडकत होतो, हो ना? तू माझ्यामध्ये अन मी तुझ्यामध्ये..
ह्या नात्याला तुझ्याकडून शिक्का मोहर्तब नसताना, ह्या नात्याला कसलंही भविष्य नाही हे लख्ख ठाऊक असताना, मी मात्र गुंततच गेले.. कशासाठी? का फक्त आकर्षण होतं? शारीरिक तर नसावं.. इतकी वर्षे तू नसताना ही, ती भावना तशीच टिकून आहे.. आपले रस्ते वेगवेगळे आहेत हे माहित असूनसुद्धा मी प्रेम करतच राहिले.. आज इतक्या दूर असून सुद्धा आपण एक आहोत.. एकदम घट्ट.. कदाचित निस्सीम, निरतेशीय प्रेम हेच कारण असावं..
किस तरह गिरह ये सुलझे..
ही गिरह, ही गाठ एकदम घट्ट आहे.. "we were destine to meet" असं तू म्हणतोस.. आत्तापर्यंतच्या आयुष्यात चढ उतार पाहून, तापून सुलाखून तयार झालेलो आपण, ह्याच वेळी एकमेकांना भेटणार असू... कसली विचित्र गाठ आहे ना ही, फक्त जन्माचीच नाही तर अगदी मृत्यूनंतर पुढं ही.. कारण 'काहीही विरून जात नाही' हा माझा विश्वास आहे.. आपण पुढं ही भेटूच.. आणि भेटतच राहू..
है रोम रोम इकतारा बादलोंमे से गुजरे..
पाऊस आणि आपण दोघं... आपल्या सगळ्या भेटी ह्या अश्याच पावसातल्या.. चिंब भिजलेल्या.. उतरून आलेल्या आभाळाच्या साक्षीनं, साशंक मनानं, पहिल्यांदा हातात धरलेला हात, अजुनी रोम रोम फुलवतो.. वाटलंत तेव्हा, हाच तो क्षण मला साठवून ठेवायचाय, आयुष्यभर.. काय माहिती होतं कि ह्याच उतरून आलेल्या आभाळात, मीच पाऊस होऊन तुझ्यावर बरसत राहीन..
पहाटे पहाटे हातात हात गुंफून, ढगातून वाट काढत पाहिलेला सूर्योदय.. कापसाची दुलई टाकल्यासारखे ते ढग आणि त्या ढगांमध्ये एका शालीत गुरफटलेले तू आणि मी.. अहाहा..
तश्या तुझ्या रोमान्सच्या कल्पना जरा हटकेच.. गिफ्ट्स, चोकोलेट्स देणं तुला पटत नाही.. 'Rather, I will invest in memories' असं तुझं उत्तर..
तू होगा जरा पागल तुने मुझ को है चुना..
हे मी मला म्हणायला पाहिजे, 'मै हूँ थोडी पागल मैने तुझको हैं चुना..' कारण मी तर बेस्टचाय.. माझी तर मी अशीही फेवरेट आहेच पण तुला 'मी आवडते' म्हणून माझ्यावर जरा जास्तीच प्रेम करू लागलीय.. 'तू मला पडलेलं आणि साकार झालेलं सुंदर स्वप्न आहेस..' आपण दोघं ही तसे वेडेच.. वेडे काय ठार वेडे म्हणायला पण हरकत नाही.. ह्या वेडेपणात पण शहाणपणा आहे, हो ना?
कैसे अनसुना तूने सब सुना..
मी तुला कधी काही सांगितलेच नाही.. तसं काही सांगायची वेळ पण आली नाही.. सोशल मीडिया वर तुला दिलेल्या कंमेंट मधून, झालेल्या चाट मधून, मला असलेला तुझ्याबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर, तुला कळवा असं मात्र वाटायचं.. वाटा वेगळ्या झाल्या होत्या तरी गुंतलेले धागे, मन अजुनी शाबूताय.. नात्याला भविष्य नव्हतं तरी तू माझ्या आयुष्यातून कधीच गेला नव्हतास..
आत्ता भेटल्यानंतर, तू जेव्हा डोळ्यांत खोलवर पाहिलंस तेव्हा आपल्या नात्याला भविष्य असूही शकतं याचा मी विचार करायला लागले.. हे अदृश्य, तुझे आणि माझे गुंफलेले धागे, तुला दिसायला लागले.. आपल्यामध्ये काहीतरी अनामिक आहे, हे तुला मला कळत होतं पण त्या अनामिकतेला शब्दरूप तू दिलेस..
तू दिनसा है मै रात, आ ना दोनो मिल जाये शामों की तरहा..
विरहाच्या जाणिवेनं कातर झालेले असताना, तू माझा हात अलगद हातात घेतलास आणि म्हणालास “कितीही दूर गेलीस तरी कायम माझ्यापशीच असशील.. मी स्वत:ला तुझ्यापासून तोडू शकणार नाही.. तू माझ्या अस्तित्वाचा एक भाग आहेस..” आणि मी अजूनच तुझ्यात गुंतत राहिले.. तुझ्यापासून इतकं दूर येऊन सुद्धा अजुनी तुझ्या मध्येच मला शोधत असते.. हेच गुंतून राहणं जगण्याचा भाग झालंय.. and I am loving this...
ये मोहमोहके धागे
तेरी उंगलियोंसे जा उलझे!
Sunday, August 4, 2019
Happy Friendship Day!!
Wednesday, June 5, 2019
*मधुरा’ज आर्क्* - Alaska Wilderness!! - Excursions
संध्याकाळी पाच-सहाच्या सुमारास बोर्डिंग सुरु व्हायचं आणि सातच्या सुमारास शिप डिपार्ट व्हायची.. असं साधारण रोजचं रुटीन..
रोज सकाळी सात-साडे सातला मित्रांचा अड्डा जमायचा.. जिम मग ब्रेकफास्ट.. मग तयार होऊन त्या दिवशीची excursions.. ऋचा बरोबर असल्यानं आमची excursions बाकी मित्रमंडळींपेक्षा वेगळी होती..
अलास्का म्हटलं कि ग्लेशिअर्स!!!.. आणि नुसते ग्लेशिअर्स पाहताच येत नाहीतर तर त्यावर चालता ही येत, हे National Geographic Channel वर पाहिलं होतं.. त्यामुळं Glacier Walk was most awaiting experience..
फर्स्ट स्टॉप जुनेऊ... ग्लेशियर वॉक... आमचं स्वागत करायला आमचा टूर गाईड जुनेऊ डॉक वर हातात फलक घेऊन उभा होता.. अर्धा तासाच्या ड्राईव्ह नंतर आम्ही त्याच्या avialtion land वरील छोटेखानी ऑफिस मध्ये पोचलो.. गेल्या गेल्या त्याच्या टीमनं आम्हाला बूट्स, कोट्स, ग्लोव्हस घालून जवळ जवळ एक्सिमोच केलं :) ..
Tuesday, June 4, 2019
*मधुरा’ज आर्क्* - Alaska Wilderness!! - On The Cruise
९ माणसे, १७ लहान मोठ्या बॅग्स अशी आमची वरात पोर्टलॅंडहुन सिऍटलला जायला निघाली..
ऋचासाठी वेगळी फाइल ज्यात डे वाईस अॅक्टिव्हीटीजची माहिती, टीन लाउंज चे कार्ड.. लगेचच आमची स्वारी टीन लाउंज कडं.. Music Disk, Mini Movie Theather, Game Room.. काय नव्हतं तिथं? अलिबाबाची गुहा सापडल्याचा आनंद ऋचाच्या चेहऱ्यावर होता..
| Main Lobby |
१५व्या मजल्यावर रेस्टोरंट, स्विमिन्ग पूल्स, आऊटडोअर मूवी स्क्रिनिंग आणि ओपन डेक.. १७ व्या मजल्यावर जिम आणि स्पा.. १९ व्या मजल्यावर टेनिस कोर्ट आणि जॉगिंग ट्रॅक..
Sunday, June 2, 2019
*मधुरा’ज आर्क्* - Alaska Wilderness!! - Let's GO
Wednesday, May 8, 2019
The Power of Peaceful Demonstration
इकडे अमेरिकेमध्ये सध्या स्कुल फंडिंग, शिक्षकांचे जॉब, त्यांचे पगार वाढ अश्या अनेक समस्या उदभवत आहेत. पुढच्या स्कूल इयर पासून ओरेगॉन मध्ये बऱ्याच शिक्षकांचे जॉब जाणार आहेत. त्यामुळे एका वर्गात मुलांची संख्या वाढणे, नर्स, कॉन्सिलर असा सपोर्टींग स्टाफ नसणे अश्या समस्या निर्माण होतील.. त्या विरोधात आजची रॅली होती..
#redfored (रेड फॉर एड) ही टॅग लाईन होती.. सगळे रेड कपड्यात चौकाचौकात सकाळी ८ वाजल्या पासून हातात पोस्टर्स घेऊन उभे होते.. चौकात पण रस्त्यावर नाही.. बाजूला कॉर्नर ला.. ते ही एकदम शिस्तीत.. घोषणा नाहीत.. कि निंदा नालस्ती नाही.. येणाऱ्या जाणाऱ्या गाडयांना पाहून पोस्टर्स हलवणे.. हात हलवणे.. इतकी काय ती ऍक्शन होती..
आम्हा सपोर्टर्स ना पासून गाड्यांचे हॉर्न वाजत होते.. ते ही त्यांचा ह्या रॅली ला सपोर्ट असेल तर.. Honk if You Support असे पोस्टर ही होते..
सकाळी ८ ते १० गावातल्या ठराविक चौकात आणि नंतर waterfront मैदानात ही रॅली झाली..
मला ह्यातील जाणवलेला बोनस म्हणजे ऋचा सारख्या young kids ना मिळालेली hope...
The power of peaceful demonstration for causes they believe in.
ऋचाचा मला खूप अभिमान वाटतो कारण तिच्या शाळेतील शिक्षकांना सपोर्ट करायला तिने ग्रुप तयार केला.. ८-१० मुले यायला तयार झाली आणि ऐनवेळी ती त्यातील काही गळाली.. पण निराश न होता ती रॅली ला गेली आणि तिच्या शिक्षकांच्या बाजूला ती २ तास उभी राहिली..