Congratulations!! you are on my list. now you can not back out.. आज योगा टीचर्स ट्रैनिंगसाठी रजिस्टर केले त्यावेळी डिना, आमची योगा ट्रेनर म्हणाली.. क्षणभर वाटले अजुनी थोडे दिवस थांबायला हवे होते का? खूप घाई तर नाही ना केली? तेवढ्यात ती म्हणाली, I know your abilities and I believe, you will be a good yoga teacher one day . काय माहिती तिने माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचले हि असतील. पण तिच्या बोलण्याने एकदम धीर आला. आपल्या सगळ्यांनाच असे अनुभव येत असतात. 'माझा विश्वास आहे तू हे करू शकशील' 'तू कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत' 'होऊन होऊन काय होणार आहे, आधी कर तर' अश्या वाक्यांनी, अश्या बोलण्यानी किती धीर मिळतो ना? एकदम दहा हत्तीचे बळ मिळते.
मी योगा टीचर ट्रिंनिंग करावं हि महेश आणि ऋचा दोघांची पण खूप इच्छा होती. माझे योगा वरचे प्रेम त्यांच्या हि नजरेतून चुकले नव्हते. तशी मी शाळेत असताना योगासने करायचे. शाळेत त्याची प्रात्येक्षिक करून दाखवायचे. पण मध्यंतरीच्या काळात योगा करणे पूर्णपणे थांबले. २०११ मध्ये डिना (माझी योगा गुरु) मुळे माझी योगाशी नव्याने ओळख झाली आणि योगा माझ्या जीवनाचा अतूट हिस्सा झाला. योगा करता करता त्याचे शात्रोक्त ट्रिंनिंग घ्यावे का असा विचार मनात डोकावू लागला. पण त्यासाठी लागणाऱ्या कंमिटमेन्टला मी तयार आहे असे मला वाटत नव्हते. दोनशे तास मला ह्या ट्रैनिंगसाठी द्यावे लागणार होते. दहा संपूर्ण शनिवार रविवार, त्या चार महिन्यातली प्रत्येक बुधवार संध्याकाळ शिवाय दररोज योगा क्लास, थेअरी अभ्यास... संपूर्ण चार महिने फक्त योगा.. त्यात ऋचाचे स्विम शेड्युल, तिच्या इतर ऍक्टिव्हिटी.. हे सगळे कसे मॅनेज होणार? पण महेश आणि ऋचा ने 'तू कर, सगळे व्यवस्थित होईल'.. 'आपण सगळे मिळून येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढू' हा विश्वास दिला आणि मी हे शिवधनुष्य पेलायला तयार झाले.. आपल्यावर विश्वास दाखवणारी व्यक्ती सोबत असेल तर कोणताही विचार हा नुसता विचार रहात नाही. (मी ह्या विश्वासाचे काय केले हे येत्या चार महिन्यात कळेलच)... आज जरी हा विश्वास देणारे डिना, महेश, ऋचा असले तरी असा विश्वास देणारी व्यक्ती प्रसंगानुरूप बदलत असते.
काही गोष्टी आपण मैत्रिणींशी बोलतो, तर काही भावा बहिणींशी, तर काही आई बाबांशी!.. कोणती गोष्ट कोणाशी बोलावी हे आपल्याला पक्के माहिती असते. खूपदा निर्णय झालेला असतो पण तो आपल्याला त्या व्यक्तीशी बोलताना पडताळून पाहायचे असते, त्या व्यक्तीच्या नजरेतून बरोबर आहे कि नाही जाणून घ्यायचे असते. खूपदा बोलता बोलताच प्रश्नाची उत्तरे मिळत जातात, गुंता सुटत जातो पण काही वेळा तो प्रश्न, तो गुंता सुटत नाही अश्यावेळी ते ऐकण्यासाठी, बोलण्यासाठी कोणीतरी आहे, ती व्यक्ती आपलायसाठी वेळ देते आहे हे खूप महत्वाचे वाटते... कधी तो विश्वास अगदी अनोळखी व्यक्तीकडून पण मिळतो. एखाद्या दुकानात जावे, एखादा ड्रेस आवडावा, तो आपल्याला चांगला दिसेल का म्हणून अंगाला लावून पाहावा आणि कोणीतरी चटकन 'it looks good on you' असे म्हणून जावे..
तसेच खूपदा आपले अंदाज चुकतात, घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात, वाटते आता आयुष्यात काहीच राहिले नाही.. मग तेव्हा कुणीतरी हवं असतं आपल्याला सांगणारं, समजावणारं, कि "सर्व काही ठीक होईल." जेव्हा आजू बाजूला फक्त क्रिटिसाईझ करणारेच दिसतात तेव्हा आपल्या चुका पोटात घालून, आपल्याला साथ देणारे कोणीतरी हवे असते..
फक्त सुखात किंवा दुःखात नाही तर नेहमीच आपलायला "असं कोणीतरी हवं असतं"....
-मी मधुरा...
१२ सप्टेंबर २०१७

No comments:
Post a Comment