ऑडिओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
Tuesday, November 17, 2020
माझे मन तुझे झाले..
Sunday, October 25, 2020
नवरात्र नात्यांचे: विजयादशमी!!..
Saturday, October 24, 2020
नवरात्र नात्यांचे: नववी माळ - लाडक्या 'लेकी'ची!!..
Friday, October 23, 2020
नवरात्र नात्यांचे: आठवी माळ - जिवलग 'मैत्रिणीची'!!..
Thursday, October 22, 2020
नवरात्र नात्यांचे: सातवी माळ - 'नणंदा-भावजयां'ची!!
Wednesday, October 21, 2020
नवरात्र नात्यांचे: सहावी माळ - मायेच्या सावलीची 'बहिणी'ची!!
Tuesday, October 20, 2020
नवरात्र नात्यांचे: पाचवी माळ - 'आजोळ समृद्ध करणाऱ्या नात्यां'ची!!
झुक झुक झुक करत आपल्या नात्यांची गाडी आता आजोळी येऊन थांबली.. आईच्या बरोबरीने आपल्यावर मायेची पाखरण करणारे कोणीतरी या जगात आहे, याची जाण देणारे हे ठिकाण.. शक्यतो आईच्या बाजूच्या नात्यांकडे म्हणजे काकापेक्षा मामा, आत्यापेक्षा मावशी, आजोळचे आजी-आबां यांच्याकडे आपला ओढा जास्ती असतो. ‘माय मरो मावशी उरो’ सारखी म्हण याची साक्ष देते. याचा अर्थ असा नाही की आईची काही किंमत नाही.. आईची जागा कोणीच भरून काढू शकत नाही.. पण तिच्यासारखे प्रेम देणारी, काळजी घेणारी एक व्यक्ती असते ती म्हणजे आपली 'मावशी'!
मावशी, जिच्यात आईचा भास असतो.. 'माँ के जैसी, ती मा-सी'!... जिच्याशी एक सुंदर भावनिक नाते असते.. बरेचदा आईला एखादी गोष्ट पटवायला मावशीच मदतीला येते.. “तू सांग ना तिला! ती आमचे नाही पण तुझे ऐकते” ही मस्केबाजी हमखास कामी येते.
मावशी या नात्याला वय नसतं.. 'काकू' म्हटलं तर “माझे काय वय झालेय का” किंवा न आवडल्याचा कटाक्ष असतो.. पण 'मावशी' म्हटलं तर चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतं.. आपण सहजपणे आईच्या मैत्रिणीला 'मावशी' तर मैत्रिणीच्या आईला 'काकू' म्हणतो..
खूपदा, दोन बहिणींच्या शिस्तीच्या कल्पना परस्परविरोधी पाहायला मिळतात.. त्यामुळे मावशीच्या घरी भाचरे कायमच खुश.. मावशी जर लहान असेल तर ती आईपेक्षा मॉडर्न किंवा मोकळ्या विचारांची वाटते तर आईपेक्षा मोठी असणारी जास्त शांत आणि प्रगल्भ.. काहीही असो पण हे नातं मात्र खास असतं..
नकळतपणे ती भाचरांची रोल मॉडेल बनते.. तिची फॅशन, कपड्याची स्टाईल, केसांची ठेवण असो वा तिच्या हातचा एखादा पदार्थ.. मनात कुठेतरी घर करून जातो..
अशी काही नाती असतात, जिथे आपण 'असे का वागतोय' याचा खुलासा करायची गरज पडत नाही.. त्या नात्यात एक नाते नक्की असते.. ते 'मावशी'चे!!
हे झालं मावशीचे कौतुक पण.. आजोळी आपले लाड करणारी, अजुनी एक व्यक्ती असते ती म्हणजे आपल्या लाडक्या मामाची मामी..
आपल्या बडबडगीतातील 'शिकरण खाऊ घालणारी', 'भाच्यांना पोरटी म्हणणारी'.. अशी ती, एका बंगाली बडबडगीतात तर चक्क मारकुटी आहे.. माझ्या एका बंगाली मैत्रिणीने माझ्या मुलीला ते गीत शिकवलं होतं..
ताय ताय ताय मामा र बारी जाय.. (टाळ्या टाळ्या टाळ्या मामाच्या गावाला जाउया)
मामा दिलो दूधो भातो, दुयरे बोशे खाय.. (मामा देईल दूध भात, अंगणात बसून खाउया)
मामी आयी दंडिया निये, (मामी आली काठी घेऊन)
पलाय पलाय पलाय... (पळा पळा पळा)
पण खरंच मामी अशी असते का?.. तिला असे व्हिलन का बरं केलं असेल? आई आणि आजी यांचं तिच्याशी असलेलं नातं? का त्यांची मामाबद्दलची असुरक्षितता?..
आईला माहेरपण देणारी, वन्स-ताई म्हणत मागंमागं असणारी, अडीअडचणीला लगेच धावून येणारी, कार्यात बॅकस्टेज सांभाळणारी.. मामी..
वर्षभर भाचरांची वाट पाहणारी.. तुम्ही आलात कि घर कसं गोकुळ होतं म्हणणारी.. न्हाऊ माखू घालणारी, आवडीचा खाऊ करणारी... मामी..
एकीकडे उच्छाद मांडलाय नुसता म्हणणारी पण शांतता होताच कावरी बावरी होणारी, आंब्याच्या दोन कोयी भाचरासाठी बाजूला काढून ठेवणारी.. मामी..
भाची मोठ्ठी होत असताना नकळत दागिना देणारी, लग्नात 'मुलीला आणा' म्हणता क्षणी मामाच्या मागे उभी राहून डोळ्याला पदर लावणारी... मामी..
प्रेमाच्या विविध छटा असणारी मामी.. तुसी ग्रेट हो...
आजोळ समृद्ध करणाऱ्या मावशी आणि मामी तुम्हाला शतशः प्रणाम!!🙏
-मी मधुरा..
२१ ऑक्टोबर २०२०
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
Monday, October 19, 2020
नवरात्र नात्यांचे: चौथी माळ - 'काकू'ची!!
काकूच्या रूपात कधी आई भेटते, कधी मैत्रीण तर कधी मोठ्ठी बहीण.. चर्चा करायला, हट्ट करायला, रुसवा काढायला, अगदी चिडचिड व्यक्त करायला मिळालेलं हक्काचं आपलं माणूस असते 'काकू'.. माझ्या जडणघडणीत 'काकू' ह्या नात्याचा खूप मोठ्ठा वाटा आहे.. एकत्र कुटुंबामुळे 'काकू' कधी नाही असे झालेच नाही.. 'काकू' शिवाय मी माझे बालपण इमॅजिनच करू शकत नाही.. आजी-आबा, आई-बाबा, काका-काकू, आत्या ह्या सगळ्या नात्यांनी समृद्ध झालेलं बालपण आठवतं आणि भाग्यवान असल्याचं शिक्कामोर्तब होतं!
'काकू' हे नातं 'काकाची बायको काकू' ह्या पुरतं मर्यादित बिलकुल नाही.. आईच्या मैत्रिणी, बाबांच्या मित्रांच्या बायका, मित्र-मैत्रीणींच्या आया, एखादी मध्यमवयीन अनोळखी बाई सुद्धा 'काकू' ह्या नात्यात सामावून जाते.. ह्या 'काकू' जाणता अजाणता आपल्या मनावर, आपल्या विचारांवर छाप सोडून जातात.. नवनवीन गोष्टी करायला उद्युक्त करतात.. आपल्या प्रेरणास्रोत बनतात..
मावशी-आत्या ही नाती जितक्या सहजतेने आपण स्वीकारतो तितक्या सहजतेने 'काकू' हे नातं स्वीकारलं जात नाही.. कदाचित 'काकू' म्हटलं कि उगीचंच मोठठं झाल्या सारखं वाटतं.. लग्न झाल्यानंतर चिकटलेलं हे नातं जबाबदारीची जाणीव ही करून देतं.. कालची 'ताई' आज लग्न झाल्यावर एकदम 'काकू'च होऊन जाते.. शेजारची कॉलेजमध्ये जाणारी मुलगी, जेव्हा नवीन लग्न झालेल्या मुलीला, 'काकू' म्हणून संबोधते, तेव्हा तो काय हृदयद्रावक प्रसंग असेल, हे त्यातून गेल्याशिवाय नाही कळायचं..
त्याचबरोबर 'काकू' ह्या शब्दाशी असलेलं 'काकूबाई' हे जीवघेणं शब्दवलय... त्या मागचं हे कारण असू शकेल का?.. काकूबाई म्हटलं कि एक बावळट्ट ध्यान डोळ्यासमोर उभं राहतं.. आणि ह्या शब्दाबद्दल नकारात्मक भाव निर्माण होतो.. नात्याव्यतिरिक्त कोणी काकू म्हटलं कि "ऑंटी मत कहो ना.." हे बॅकग्राऊंड स्कोर सारखं वाजू लागतं.. "काकू नको ना म्हणू.. हवं तर मावशी म्हणं, आत्या म्हणं नाहीतर चक्क नावाने हाक मार.." असं म्हणावंसं वाटतं.. (डिस्क्लेमर: मला काकू म्हटलेलं आवडतं 😁)
मी तर आहे तुमच्या काकाची लाडकी
कोण म्हणे मोठ्ठी आई तर कोण म्हणे धाकटी
तुम्हा सगळ्या पुतण्यांशिवाय पडते मी एकटी
सांगावे वाटते ओरडून, माझ्यात ही वसते आई
माहिती आहे, आई आणि मी नाही सख्या बहिणी
भावकी निभावत निभावत बनतो मात्र पक्या मैत्रिणी
हवा आहे थोडा वेळ, थोडी मशागत आणि थोडं प्रेम
निभावून सारी नाती जिंकूया नात्यांचा बिगबॉस गेम
अश्या 'काकू' ह्या गोड नात्याला शतशः प्रणाम!! 🙏
-मी मधुरा..
२० ऑक्टोबर २०२०
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
Sunday, October 18, 2020
नवरात्र नात्यांचे: तिसरी माळ - 'आत्या'ची!!
'आत्या'बद्दल लहानपणापासून आपल्या मनात हळवा कप्पा असतो, नाही का?.. आजी-आबांनी आपल्याला सांगितलेले न संपणारे आत्या-बाबांचे किस्से, त्यांना आत्या भाचरात दिसलेले साम्य.. त्यामुळे 'आत्या' तर सतत आपल्या बरोबरच असते.. कधी त्यांना तुमच्यात आत्याची झलक दिसते.. कधी तुमचे हसू तिच्या सारखे असते, तर कधी तिच्या गालावरची खळी तुमच्या गालावर खुलते.. नाहीतरी असे म्हणतातच ना, 'खाण तशी माती आणि आत्या तशी भाची'.. भाची असो वा भाचा आत्यासारखं वागतात-बोलतात असं त्यांना वाटत असतंच.. आणि हाच दुवा ह्या दोन मनात, ह्या नात्यात दिसतो..
आत्याबाई ते आत्या, आत्या ते आत्ती, आत्ती ते आत्तू.. हा ह्या नात्याचा प्रवास फार गोजिरवाणा आहे.. आहो आत्याबाई मधला दरारा आत्तू म्हणताना होणाऱ्या क्यूटश्या चंबूने केव्हाच हद्दपार केला आहे..
आत्या हे नातं एका मुलीसाठी सासर-माहेर बांधणारं आहे.. आत्या-भाचीचे (भाचरांचे) हे नाते अनोखे आहे.. नाजूक भावनांच्या धाग्याने जोडलेले.. एकाच घरातील एक अनुभवी भूतकाळ तर एक आशादायी भविष्य!!
खूपदा 'आत्या' ह्या नात्याची तुलना 'मावशी' ह्या नात्याशी करून 'आत्या'ला थोडेसे लांब ठेवले जाते.. ह्या गोड नात्याला असं लांब का ठेवलं असेल? बाबांकडंच नातं म्हणून??.. आई आणि बाबा यापैकी आईला मिळालेलं जास्तीचं भावनिक महत्व.. आणि पर्यायानं आईकडच्या नात्यांची झालेली जपणूक.. की आत्या आणि आईचं एकाचवेळी माहेरी जाणं.. आणि त्यामुळे नकळत आलेला दुरावा?.. की आई आत्याचं असणारं नातं?.. हे नातं जपायला, जोपासायला आईचं मोठ्ठ योगदान लागत असावं.. जेव्हा आजूबाजूला असं दुरावलेलं आत्याचं नातं पाहिलं जातं, तेव्हा मनात हे विचार येऊन जातात..
असे तर नसेल?... आत्या ह्या व्यक्तिमत्वाचा एक दबदबा निर्माण केल्याने, ती धीरगंभीर, सागराप्रमाणे, वटवृक्षासारखी भासत असावी.. पायांना वाकून नमस्कार करावा तर आत्याला आणि खांद्यावर हात ठेवावा तर तो मावशीच्या.. हिरवागार निसर्ग पाहिला की मावशी आठवावी आणि धीरगंभीर निळं आकाश पाहिलं की आत्या.. मैत्रीचा हात पुढे करावा तो मावशीने आणि आशीर्वादासाठी हात उंचवावा तो आत्याने..
पण तरीही, प्रत्येक भाचीच्या हृदयामध्ये, तिच्या आत्याची खास अशी एक जागा असते.. कारण तिच्या आत्याची छबी तिच्यात असतेच असते.
-मी मधुरा..
१९ ऑक्टोबर २०२०
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Saturday, October 17, 2020
नवरात्र नात्यांचे: दुसरी माळ - ‘आजी’ची!!
Friday, October 16, 2020
नवरात्र नात्यांचे: पहिली माळ - 'मातृदेवते'ची!!
नेहमीच मला आई बद्दल लिहिताना शब्द तोटके वाटतात.. कोणाला तिच्यात अख्ख विश्व सामावलेलं दिसतं तर कोणी तिला देवत्व बहाल करतं तर कोणी आणखी काही.. पण शेवटी आई ही आईच असते.. तिला कोणत्याही एका साच्यात बसवता येत नाही.. प्रेमळ, महान, कर्तृत्ववान अशी विशेषणं ही आईला लावणं मला स्वतःला पटत नाही.. ही विशेषणं तिच्यातील एका स्त्रीसाठी असू शकतात पण आईसाठी नाहीत..
करुणा, माया, ममता, वात्सल्य ह्या भावना ज्याच्याठायी तो 'आईस्वरूप' जाणावा.. म्हणूच गुरु, विठोबा, ज्ञानोबा ह्यांना आपण 'माऊली' म्हणतो, आईस्वरूप मानतो..
खरं तर मी 'Daddy's little Princess', 'पपा की परी'.. -आई काय असतेच- हे attitude.. पण आई ह्या नात्याची नजाकत मी आई झाल्यावरच मला कळाली.. जिला आयुष्यभर गृहीत धरले जाते, ती आई, असे गृहीत धरण्यात सुद्धा तिचे आईपण निभावत असते.. अश्यावेळी म्हणावसं वाटतं "किस मिट्टीकी बनी हो तुम माँ?"
मुलीला वाढवताना जेव्हा आईचेच शब्द तोंडातून बाहेर पडतात तेव्हा करेक्ट रस्त्यावर आहोत ही पावती मिळते 😊
"Why are you annoying?" ह्या प्रश्नाला ".. Beacuse I'm your Mom.." असे उत्तर देताना वेगळेच समाधान मिळते.. लहानपणी मी जेव्हा वैतागायचे, तेव्हा वाटायचं, एक दिवस 'आईची आई' व्हायला मिळायला पाहिजे..
ग.दि.मा. च्या भाषेत सांगायचे तर..
"आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई
नको बोलणी खारट आंबट, विटले मी विटले बाई"...
आईची आई झाले नाही पण आईसारखीच आई मात्र नक्कीच होते आहे.. 😁
अजुनी एका नात्याला ह्या माळेत मला गुंफायचय..
'अहों'ची मातृदेवता.. 'सासुबाईं'.. 'अहो आई' 'आमच्या आई'.. लग्नानंतरचं खास पण नाजूक असं नातं..
सासरच्या पद्धती, रिती-रिवाज, आवडी-निवडी शिकविणारी.. ते सारं अंगवळणी पडेपर्य॔त सांभाळून घेणारी.. अशी ही आई..
पण ह्या आईला वेगळीच भावनिक झालर आपसूक लागते.. कसं का होतं? सासूबाई 'अहो आई' असल्या तरी त्यांच्यात ही आई आहेच ना? त्या आई मागच्या 'अहो' ची 'अगं' करण्याचा हट्टाहास सोडला तर हे नातं, घट्ट नातं होऊ शकेल का?.. विचार करायला काय हरकत आहे?..
ज्या मनात वसते माया, त्या मनात असते आई!
अखंड वात्सल्याच्या पाझरात असते आई!
कावरा-बावरा होतो त्या जिवात असते आई!
त्या अंगाई गुणगुणणार्या स्वरात असते आई!
ते घर होते नंदनवन, ज्या घरात असते आई!
लहान पुन्हा मी व्हावे, आईच्या कुशीत शिरावे,
प्रेमाने चिंब भिजावे, जीवनी कृतकृत्य व्हावे..
खरंच, काही मोजक्याच जागा अशा असतात कि जिथं आपण कायम लहानच असतो!
आई, आमच्यासाठी केलेल्या सर्व कष्टांना, आमच्या कल्याणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांना प्रणाम!
आई, तुला कोटी कोटी प्रणाम!! 🙏
१७ ऑक्टोबर २०२०
Thursday, October 15, 2020
नवरात्र नात्यांचे..
उद्या पासून सुरु होणाऱ्या नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा!!
मग, झाली का तयारी? ह्यावर्षी काय पॅनडॅमिक आणि पावसामुळं भेटीगाठी, गरबा, दांडिया असे प्लॅन्स तर पाण्यातच गेलेत.. पण ह्यातून ही काहीतरी मार्ग निघेल अशी अशा करूया..
आत्तापर्यंत जसजशी आपली जीवनपद्धती बदलत गेली तसतशी सणवार साजरे करण्याची पद्धत पण बदलत गेली.. पूर्वी घरातील समया, दिवे लखलखयाला लागले कि समजायचे नवरात्र जवळ आले.. पण आता ते काम सोशल मीडिया करते.. नवरात्रीच्या नऊ रंगांची उधळण करत, गरबा दांडियांनी पर्सनल, फॅमिली कॅलेंडर्स भरू लागतात.. नऊ दिवसांचे उपवास करून वजन कसे कमी करता येईल ह्यावर चर्चा रंगतात.. परमार्थात थोडा स्वार्थ साधायचा प्रयत्न!!.. 😉.. आता नवरात्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन ही बदलतोय.. मंदिरात पाहिलेल्या, कथा पुराणात ऐकलेल्या देवींना खऱ्या आयुष्यात शोधण्याचा प्रयत्न सुखावणारा आहे.. जीवन समृद्ध करण्याऱ्या नात्यात ह्या शक्ती जोपासण्याचा दृष्टीकोन हे ह्या पॅनडॅमिकसाठी उत्तम उदाहरण..
प्रत्येकाच्या आयुष्यात उलथापालथ करणाऱ्या २०२० चा मी जेव्हा विचार करते, तेव्हा वाटतं, खरचं ह्या वर्षाने आपल्याला काय दिलं?... भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या २०२० ने खरचं काय शिकवलं? ह्यावर बऱ्याच लोकांची बरीच मते, बरेच विचार असतील ही.. पण 'उन्नीस-बीस' मधला फरक ह्या वर्षाने दाखवून दिला हे मात्र नक्की! 😁
माझ्यासाठी सांगायचे झाले तर, सोशल डिस्टंसिन्ग शिकवत याने जशी माझीच माझ्याशी ओळख करून दिली तशीच नात्यांची वीण पण घट्ट विणून दिली.. बिझी रुटीनमुळे, जिओग्राफिकल डिस्टन्समुळे धूसर झालेली नाती 'zoom' मुळे चमकायला लागली.. 'छोड आये हम वो गलिया...' हे खोटे ठरवत 'वो गलिया' परत नव्यानं उजळू लागल्या.. मित्र मैत्रिणीबरोबर, नातेवाईकांबरोबर तेथं फेरफटका होऊ लागला.. त्यांच्या बरोबरच्या मीटिंग्सनी कॅलेंडर्स भरू लागली.. मावसभावाचा लग्नाचा २५वा वाढदिवस, मावशीचा ८०वा वाढदिवस ते भाचीचा साखरपुडा, शाळा कॉलेजच्या मैत्रिणींबरोबर मासिक गाठीभेटी, गेट टुगेदर्स.. इतक्या वर्षात मागे पडलेलली नाती नव्याने बहरू लागली.. 'ह्या pandemic मध्ये आपण एकटे नाही'.. 'बहारे फिर भी आयेगी'... 'this shall pass'.. हा कॉन्फिडन्स ह्या नात्यांकडून नक्कीच मिळाला, मिळतो आहे..
म्हणूनच ह्या नात्यांचा, रोजच्या जीवनातील देवींच्या ह्या रूपाचा उत्सव नवरात्रीत साजरा करूया.. रोज एका नात्याची माळ नव्याने गुंफूया..
तर मग भेटूया पुढचे नऊ दिवस रोज एका नात्याबरोबर..
-मी मधुरा..
१६ ऑक्टोबर २०२०
Friday, September 11, 2020
वाइल्ड फायर डायरीज...
सोमवार, ७ सप्टेंबर..
सकाळचे ९: वादळाचा अलर्ट.. आज संध्याकापासून २० MPH ने वारे वाहू लागतील आणि मंगळवार पर्यंत ४० MPH वेगाने वाहतील..
अतुलकडून सियाटलहून लवकरच निघालो.. पोर्टलॅंड जसं जवळ येत गेलं तसं वातावरण एकदम ढगाळ जाणवू लागलं.. 'अरे वाह, खूप दिवसाने आज पाऊस पडणार तर..' संपूर्ण उन्हाळा कोरडाच गेला.. खरं तर उन्हाळ्यात थोडा पाऊस होतो.. ह्यावेळी स्प्रिंग मध्ये सुद्धा तसा पाऊस झालाच नाही..
3 pm: घरी पोचलो.. गाडीतून खाली उतरलो.. पण हवा काही फ्रेश वाटेना.. धुराचा वास येत होता.. काही तरी झाले असेल...
6 pm: मैत्रिणीचा मेसेज.. 'माऊंट हूड' ला आग लागली आहे.. सगळे ट्रेल्स बंद केले आहेत.. ओह्ह म्हणजे मगाशी जो धूर जाणवला तो त्या आगीचा होता तर..
लगेचच दुसऱ्या मैत्रिणीचा मेसेज.. 'आम्ही तिकडेच होतो.. पण 'माऊंट हूड' च्या दुसऱ्या साईड ला.. खूप वाईट परिस्थिती आहे.. आणि माऊंट जेफर्सन फॉरेस्टला सुद्धा आग लागली आहे..
बापरे!!! काय चालले आहे हे? इतक्या जवळ वणवा पेटलेला कधीच ऐकला नव्हता.. COVID झाले.. Black Lives Matter झाले.. आता Fire?? कोठे नेवून ठेवले आहे माझे ओरेगॉन? least expected thing is Fire.. तशी २ वर्षांपूर्वी Multnomah Falls पाशी एका मूर्ख माणसाच्या हलगर्जीपणामुळे आग लागली होती.. पण भरपूर पाऊस, पाणी, वनसमृद्धीने नटलेल्या ह्या Emerald State मध्ये अशी नैसर्गिक आपत्ती.. विश्वासच बसत नाही.. Mudslides, Earthquakes, Flooding हे कॉमन आहे पण FIRE??! :(
मंगळवार, ८ सप्टेंबर...
रात्रभर वाऱ्याचा आवाज येत होता.. सकाळचे ८ वाजले तरी अजुनी सूर्याचे दर्शन नव्हते.. रस्तावर झाडाची पाने इतस्ततः विखुरलेली मात्र दिसत होती.. दिवसभर अधून मधून धुराचे लोट दिसत होते..
5 pm: अचानक अधून मधून दिसणाऱ्या धुराच्या लोटांनी आता स्वच्छ निळे आकाश व्यापायाला सुरुवात केली आहे.. इथून ७०-७५ मैलावर असणारी Lincoln City ला सावधतेचा इशारा दिलाय.. म्हणजे अगदी जवळच.. सुजाता, शिल्पा याचे Vacation House.. आमचे हक्काचे Beach House.. सगळे डोळ्यासमोर दिसते आहे..
जसजश्या बातम्या येत आहेत तसतशी काळजी पेक्षा भिती जाणवत आहे.. कोरडी हवा, वाऱ्याचा जोर ह्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे.. fire fighters ह्या परिस्थितीतून बाहेर पडायला लोकांना मदत करत आहेत.. Hoping for relief for those are suffering..
हा सूर्य आहे.. खराब हवेमुळे गुलाबी दिसतो आहे.. |
8 pm: Evacuating Woodburn.. म्हणजे आता फक्त ३० मैलावर...
ओरेगॉन बरोबर कॅलिफोर्निया मध्ये पण आगीचा धुमाकूळ सुरु आहे.. बापरे आता वॉशिंग्टनचा पण काही भाग..
बुधवार, ९ सप्टेंबर..
What a day today!
आजही दिवसभर सूर्याचे दर्शन नाही.. वाऱ्याचा जोर वाढतो आहे.. समुद्र किनाऱ्यावरून दिशा बदलून तो आता आत शिरतो आहे.. Hagg Lake परिसरात लागलेली आग आता इथूनही दिसते आहे..
Devil has arrived... |
घरी बसून बातम्या ऐकून, कल्पना करूनच थकून जायला होते आहे.. पण हे काही मैलावर राहणाऱ्या लोकांपेक्षा नक्कीच सुसह्य आहे.. लोक evacuate होत आहेत, स्वतःची घरे सोडून दुसरीकडे राहायला जात आहेत.. गायींना पण सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आले आहे.. Okay.. ओरेगॉनमध्ये Tillamook नामक Cheese, Icecream आणि Milkproduct ची फॅक्टरी असल्याने गोपालन हा मोठ्ठा व्यवसाय आहे..
2020 च्या अथक नाटकातील हे आणखी एक दृश्य..
7 pm: आजूबाजूच्या लोकांनी पॅकिंग सुरु केले आहे.. कधी घर सोडून जावे लागेल काही सांगता येत नाही.. किती कठीण आहे.. काय घेऊन जायचे आणि काय ठेवून जायचे.. आत्ता ह्या क्षणाला सगळेच महत्वाचे वाटते आहे.. जायचे तर कोठे जायचे? ग्रुपवर उलटसुलट चर्चा सुरु आहे.. पासपोर्ट आणि लिगल डॉक्युमेंट्स तरी नक्कीच..
Newburg ला पण फायर.. इथून दुसऱ्या दिशेला २५ मैलावर..
Lake Oswego.. Level 1 Alert.. फक्त १० मैल... आता मात्र पॅकिंगचा विचार केलाच पाहिजे.. वाऱ्याचा जोर थांबला आहे.. त्यामुळे आज रात्र कशी जाते ती पाहून उद्या सकाळी ठरवू..
गुरुवार, १० सप्टेंबर...
आजचा दिवस धुराचे पांगरून (smoke blanket) घेऊन उजाडला.. दाट धुराच्या ढगांमुळे अंधारून आले होते.. वारा एकदम शांत होता.. त्यामुळे सगळीकडे धुराचा वास, जळालेल्या लाकडांचा वास भरून राहिला होता.. एरवी मला हा धुराचा वास खूप आवडतो.. शेकोटी पेटलेला.. लहानपणच्या रम्य आठवणी जागा करतो.. पण आज तोच वास नकोसा वाटत आहे..
दिवसभर एअर क्वालिटी खूपच वाईट आहे.. त्यामुळे डोळे खाजणे, नाकातून पाणी येणे असे साईड इफेक्ट्स ही.. अजुनी २ दिवस अशीच हवा असेल म्हणे.. त्यामुळे बाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे..
Portland is #1 at Poor Air Quality |

सोमवार-शुक्रवार असे दिसले पोर्टलॅंड रेडीफ कडून साभार |
त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे आता हा आगीचा भस्मासुर शांत झाला आहे.
Let's hope no surprises rest of the year...
निराश ना होना,
कमजोर तेरा वक्त हैं, तू नही...
वक्त फिर आयेगा...
क्या पता, तुझे हसायेगा या रुलायेगा?
जीना हैं तो इस पल को ही जी ले...
क्योंकि, इस पल को, अगले पल तक
वक्त भी नही रोक पायेगा...
-मी मधुरा..
Friday, September 4, 2020
मिनिमलिझम आणि मी ५...
आजूबाजूच्या पसाऱ्याचा, अडगळीचा, विचार करताना मागे Opra ह्या talk show मध्ये ऐकलेली मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल आठवली.. आणि मग शोधाशोध सुरु झाली.. मिनिमलिझम हे सूत्र किती वेगवेगळ्या पातळ्यांवर, सखोलतेनं आणि सहजतेनं आपल्या रोजच्या आयुष्यात सामावून घेता येऊ शकतं हे त्यातूनच लक्षात येत गेलं.
"उतू नको, मातु नको" ही आजी-आई ने दिलेली शिकवण ह्यापेक्षा काही वेगळी नव्हती.. कोणत्याही भारतीय व्यक्तीला काटकसर, पुनर्वापर, कमीतकमी वस्तुंचा संचय, साधी रहाणी या मिनिमलिझमच्या मुलभूत संकल्पना काही वेगळ्या नाहीत..
'अती समृद्धता आणि अभाव ही राहणीमानामधली दरी सांधण्याचे सामर्थ्य मिनिमलिझम विचारसरणीतच आहे'.. हे ओळखूनच महात्मा गांधींनी साधेपणा आणि कमीत कमी जीवनावश्यक वस्तूंचा वापर ही जीवन पद्धती स्वतः अंगीकारून केवळ भौतिकच नाही तर मानसिक, वैचारिक मिनिमलिझमचा पाया घालून दिला... तो आजच्या सर्व मिनिमलिझमचा आदर्श आहे असे मला वाटते.
मृत्यूनंतर महात्मा गांधींच्या खाजगी मालमत्तेमध्ये, त्यांचे रोजच्या वापरातले घड्याळ, चष्मा, चपला आणि जेवणाचा वाडगा इतक्याच गोष्टींचा समावेश होता.. ही गोष्ट त्यांच्या वागणुकीतला आणि विचारांमधला साधेपणा सिद्ध करायला पुरेशी आहे.. 'अल्टीमेट मिनिमलिस्ट' म्हणून महात्मा गांधींचे नाव अनेक आधुनिक मिनिमलिस्ट आदराने घेतात ते त्याकरताच..
'भौतिक जीवन, भौतिक वस्तू नाशवंत आहेत त्यामुळे त्याचा मोह टाळला तर अनेक दु:खांमधून सुटका होऊ शकते' ही बुद्धाची विचारसरणी मिनिमलिझमच्या जवळ नेणारी आहे.. आणि हीच विचारसरणी झेन तत्त्वज्ञानाचा मूळ स्त्रोत पण आहे.
कोणताही बदल हा कधीच सोपा नसतो. जीवन पद्धतीचा तर नक्कीच नाही..
अडथळे, पसारा, अडगळ आपणच निर्माण केलेले असतात, ते दूर सारणं, आवरुन ठेवणं आणि मोकळा, स्वच्छ अवकाश आपल्या सभोवताली निर्माण करणं हे ही आपल्याच हातात असतं.. पसारा किंवा अडगळ होण्याचं, साठण्याचं एकमेव कारण म्हणजे ’लेट गो’ करण्याची, नको असलेलं सहजतेनं सोडून देण्याची अक्षमता. त्यात कधी भावनिकता आड येते तर कधी आठवणी तर कधी भविष्याची सोय.. आपला आळशीपणा, हलगर्जीपणा किंवा बेफिकिरी हे ही कारण असू शकते.. तेव्हा करणे शोधत बसण्यापेक्षा, 'उठा आणि फ़ेकून द्या, किंवा रिसायकल करा..'
पसारा आवरताना, एखादी वस्तू नको आहे हे कसे ठरवायचे? त्याचा निकष कसा लावायचा?
१. काय फेकायचं आहे हे ठरवता येत नसेल तर काय ठेवायचं याचा विचार आधी करायचा. त्या वस्तूकरता जागा निर्माण करायची.
२. अजून एक पद्धत म्हणजे चार खोक्यांवर नावं लिहायची - ठेवणे, टाकून देणे, गरजूला देणे, नंतर ठरवणे. अर्थात ’ठेवणे’ ह्या खोक्यात जास्त वस्तु भरल्या गेल्या तर मात्र ही पद्धत आपल्याकरिता नाही ;-)
३. एक सोपी पण काहीशी वेळखाऊ पद्धत म्हणजे रोज एक वस्तू टाकून द्यायची किंवा देऊन टाकायची.
सगळे कपडे, पुस्तकं, वस्तू वेगवेगळे करून एक एक कपडा, पुस्तक, वस्तू हातात घेऊन, निरखून खालील प्रश्न स्वतःला विचारायचे..
तुम्हाला खरंच ती हवी आहे का?
त्याचा वापर रेग्युलरली केला जातो का?
त्या वस्तूकडे पाहिल्यावर मनात आनंदाची भावना निर्माण होते का?
अजुनी अशी वस्तू किंवा ह्यासारखी दुसरी वस्तू आहे का?
नसेल तर असलेल्यातील दुसरे काही वापरू शकतो का?
खूप महागडी आहे म्हणून ती टाकवत नाही का?
कोणीतरी दिलेली भेट, आठवण आहे का? त्यात भावना गुंतल्या आहेत का?
असुदे कधी गरज पडली तर.. असे वाटते का?
दुसऱ्या कोणाला ह्या वस्तूचा चांगला उपयोग होईल का?
जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी स्वतःसाठी करता तेव्हा ठराविक मर्यादेपर्यंत त्याचे अवलंबन करणे शक्य वाटते.. पण जेव्हा संपूर्ण कुटुंबाचा विचार केला जातो तेव्हा सगळ्यांना ह्या सूत्रात बांधणे शक्य होईल का? प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, मानसिकता वेगळी असते.. नाहीतर पसारा परवडला अशी परिस्थिती व्हायची.. :-)
मिनिमलिझम वर अभ्यास केल्यावर, माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि, कितीही कपाटे आवरली, नव्या वस्तूंच्या खरेदीवर संयम ठेवला, अडगळ दूर करण्याचे सर्व उपाय योजले तरी मुळात जोवर हे विचार आपल्यात रुजत नाहीत, तोवर हे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत.. बदल हा नेहमी आतून बाहेर व्हायला हवा.. विचार बदलले कि आचारात बदल नक्कीच होतो..
'गरजा आणि इच्छा या मधला नेमका फरक ओळखून साधेपणाने, तणावरहित जीवन जगणे'.. हा पण मिनिमलिझम च नाही का?
ह्या वर्षा अखेरपर्यंत घरातील पसारा आवरेन म्हणते.. बघू कसे काय जमते ते..
-मी मधुरा..
४ सप्टेंबर २०२०
मिनिमलिझम आणि मी ४...
क्लटरफ़्री, पसारामुक्त जीवन पद्धती म्हणजे मिनिमलिझम.. साधेपणाने जगण्याचे एक सूत्र..
मिनिमलिझम किंवा मिनिमलिस्ट जीवन पद्धतीचे अवलंबन म्हणजे कमीतकमी, अत्यावश्यक गरजेच्या, स्वत:ला महत्वाच्या वाटणा-या वस्तुंसोबत जगणे.. एका साध्या, मिनिमलिस्ट जीवन पद्धतीकडे घेऊन जाणारी ही वाट, प्रत्येकाची वेगळी...
आयुष्य जास्तीत जास्त सोपेपणाने जगणे, कमीत कमी वस्तु वापरणे, गरजेपुरतेच जमवणे आणि कोणत्याही ताण तणावाशिवाय आनंदात जगणे हा विचार वाचताना कितीही आकर्षक, हवासा वाटला तरी प्रत्यक्षात अंगीकारणे तसे कठीणच.. पण हे अंगीकारून, "मिनिमलिझम" जीवन पद्धतीचा प्रसार करणारा अमेरिकेचा "जोशुआ बेकर" विरळाच.. त्याच्या ह्या “द मिनिमलिस्ट” चळवळीची सुरुवात झाली ती, त्याने घरातला, गराज मधला ओसंडून वहाणारा पसारा, वस्तुंची अडगळ आवरायला काढली त्या दिवशी.. ड्राइव्हवे वरचा प्रचंड मोठा ढिगारा पाहून जोशुआचा म्हातारा शेजारी त्याला सहज म्हणाला, “खरंच तुला या इतक्या गोष्टींची गरज होती का?” या प्रश्नाचे उत्तर शोधताना जोशुआचे पुढचे आयुष्य बदलून गेलं.. आणि मग जोशुआने नुसती अडगळच नाही तर घरातल्या इतरही अनेक वस्तु डोनेट, रिसायकल करायला सुरुवात केली. यातूनच कमीतकमी वस्तुंसोबत जगण्याची, मिनिमलिस्ट जीवन पद्धती त्याला सापडली आणि मग मिनिमलिस्ट ब्लॉगर्स चळवळ सुरु झाली..
’मिनिमलिझम’ म्हणजे सर्वसंगपरित्याग नाही किंवा कोणतेही आधुनिक फॅड ही नाही. त्याकरिता कोणत्याही गोष्टीचा त्याग करणं, कोणत्याही बंधनात अडकवून घेणं अपेक्षित नाही. ही एक पर्यायी जीवनपद्धती आहे. व्यक्तिगणिक त्याला रोजच्या जगण्याला लागणाऱ्या आवश्यक गोष्टी बदलत असतात. काहीजणांना स्वत:चं घर, कार, टीव्हीसेट या गोष्टी आवश्यक वाटू शकतात तर काही जणांना अनावश्यक.. प्रत्येकालाच एका साचेबद्ध पद्धतीने ही जीवनपद्धती स्वीकारणे कितपत शक्य आहे? जोशुआच्या भाषेत "मिनिमलिझम" जीवन पद्धती म्हणजे “शंभरहून कमी गोष्टींसोबत जगणं”.. रोज ठरवून काही गोष्टी कमी केल्या, नवीन वस्तु आणण्यापेक्षा आहेत त्यांचाच नवा उपयोग शोधून काढला तर हे ध्येय बघता बघता साध्य होऊ शकतं.
"जगताना मुक्तपणा, मोकळेपणा जाणवायला हवा" हे मिनिमलिस्ट जीवन पद्धतीचे मुख्य सूत्र... भिती, असुरक्षितता, स्पर्धा, काळजी, तणाव यापासून मुक्ती... अपराधभाव, नैराश्य जोपासणा-या ग्राहक-संस्कृतीच्या चंगळवादी जाळ्यात अडकून रहाण्यापासून मिळालेली मुक्ती... मात्र ह्यासाठी जाणीवपूर्वक, विचार करुन आयुष्यातील प्रायॉरिटीज ठरवायला हव्यात..
आलिशान घर, लक्झरी कार, कुटुंबाकरता चैनीच्या वस्तु खरेदी करायच्या आहेत? खुशाल खरेदी करा.. करिअरच्या मागे धावायचं आहे? तसं करा.. पण त्या आधी आयुष्यातील प्रायॉरिटीज ठरावा.. उगाचच ग्राहक-संस्कृती, जाहिराती यांच्या मा-याखाली दबून जाऊन, स्वत:ची विचारशक्ती हरवून, आपल्या आयुष्यातल्या सर्वात आनंद देणा-या इतर गोष्टींना डावलून हे करु नका इतकं साधं मिनिमलिस्ट जीवन पद्धतीचे सूत्र आहे..
घर-संसार व्यवस्थित सांभाळून, वस्तुंचा उपभोग घेऊनही मिनिमलिस्ट जीवन पद्धती जोपासता येते.. फक्त त्या वस्तुंना, चैनीला स्वत:च्या आयुष्यात किती महत्व द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचं.. आपले आरोग्य, नातेसंबंध, छंद, व्यक्तिमत्वाची जोपासना, एक व्यक्ती म्हणून आपली होणारी वाढ यापेक्षा या वस्तु मोठ्या आहेत का? हे तपासून पाहायचं.. आपण ह्या भोवतालच्या पर्यावरणाचा, समाजाचा एक घटक आहोत, आपलं आयुष्य जगताना त्यांचंही देणं ही लागतो ह्याचे भान ठेवून, आजूबाजूच्या पर्यावरणाचा एक भाग होऊन जगायचं..
प्रत्येकाचे क्लटरफ़्री, मिनिमलिस्ट लाइफ़स्टाईल जोपासण्याचे ध्येय वेगवेगळे असू शकते. तेव्हा ही जीवनपद्धती कश्यासाठी हवी आहे? हे तपासून पहिले पाहिजे.. साधं रहाणीमान हवं आहे, पैसे वाचवायचे आहेत कि खरेदी कमी करायची आहे?, धावपळ-दगदग कमी करून ताण-तणाव कमी करायचे आहेत का असलेले व्याप कमी करून क्लटरफ़्री जगायचं आहे?, कि पर्यावरण स्नेही व्हायचं आहे?... मग इतरांनी काय काय केलय यापेक्षा, नेमक्या कशाने आपल्याला आनंद मिळेल, ध्येयाप्रत पोचता येईल याचा शांतपणे विचार करुन, वेळेची एक चौकट ठरवून त्यानुसार वागता येईल.
२००८ च्या अनुभवानंतर, "२ वर्षात जे काही वापरले नाही ते पुढे लागणार नाही" हे अवलंबण्याचा प्रयत्न करते आहे.. हा विचार थोडा त्रासदायक आहे पण ह्यामुळे निदान बरीच वर्षे कपाटात पडून असलेल्या गोष्टींचा विचार होतो, कदाचित त्या काढून ही टाकल्या जातात.. आणि प्रत्येक नव्या खरेदीच्या वेळी क्रेडीट कार्ड पुढे करण्याआधी “खरंच याची गरज आहे का?” हा प्रश्न स्वतःला विचारून खात्री करून घेते..
One step at a time किंवा अश्या baby steps घेत थोडे जरी मिनिमलिझम अंगिकारता आले तरी बराच पसारा कमी होईल, नाही का? “शंभरहून कमी गोष्टींसोबत जगणे” सध्या जरी अशक्य वाटत असले तरी, आपण शंभर गोष्टी कमी करायचा नक्कीच प्रयत्न करू शकतो..
-मी मधुरा..
२ सप्टेंबर २०२०
मिनिमलिझम आणि मी ३...
जी गोष्ट वस्तुंच्या बाबतीत तिच नातेसंबंधांच्याही!! खंडीभर मित्र मैत्रिणींची गर्दी अवती भवती करण्यापेक्षा मोजकेच, आयुष्य समृद्ध करणारे मित्र मैत्रिणी जोडणे, जे आहेत ते जपणे हे महत्वाचे..
आपल्या सारख्या सोशल मीडियाच्या व्हर्चुअल जगात जगणाऱ्यांसाठी तर हा पसारा दिवसेंदिवस खूपच मोठ्ठा होत चालला आहे.. फेसबुकवर किती फ्रेंड्स आहेत, इन्स्टा ट्विटर वर किती फॉलोअर्स आहेत ह्यावर होणारी माणसाची पारख आणि व्हाट्स ऍप वर असणारे शेकडो ग्रूप्स.. प्रत्येकाने सातत्याने अपडेट केलेली स्टेटस, टाकलेले फोटो, ते आज कुठे जेवताहेत, कॉफ़ी पिताहेत, त्यांच्या आयुष्यातल्या बारीक सारीक घडामोडी, घटना ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात काडीचाही फ़रक पडणार नसतो पण त्या जाणून घेण्यात आपले कित्येक तास खर्च होतात.. त्यावर प्रतिक्रिया देणे, आलेल्या उत्तराची दखल घेणे, त्यांच्या एका ’लाईक’ ला उत्तर म्हणून आपले चार ’लाईक’.. या सगळ्याला अंत नाही.
प्रत्यक्ष आयुष्यातही आपण नातेवाईकां बरोबरच अनेक लोकांशी जोडले गेलेलो असतो.. शेजारी पाजारी, कॉलनीतले, ऑफिसमधले, मॉर्निंगवॉक-हास्यक्लब-जिम मधले, भिशी-ट्रीप्स-प्रवासात ओळखी झालेले, जोडीदाराचे मित्र-मैत्रिणी.. अगदी रोजचा भाजीवाला, फळवाला, वाणी, इस्त्रीवाला, वॉचमन, कामाला येणाऱ्या बायका..
कधीकधी नुसती ही गर्दी आजूबाजूला असण्याचाही तो ताण येतो.. त्यांच्याशी संबंध ठेवणे, घरी जाणे, बोलावणे, फोनवरुन विचारपूस करणे ही नको वाटू लागते..
खरंच ह्या भरपूर मित्र-मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या, आपल्या जवळच्या लोकांच्या ह्या पसाऱ्यात, गर्दीत वेळेला उपयोगी पडणारे किती असतात?.. काहीवेळा त्या चार उपयोगी पडणाऱ्या लोकांसाठी ही गर्दी, हा पसारा जपावा ही लागतो..
अनेकदा नात्यात, मैत्रीत कडवटपणा आलेला असतो, तर काही चिघळलेली असतात.. पण तरीही आपण ती कितीही ताण आला तरी जपतच राहतो.. एकटं पडण्याच्या भितीतून, आपण आजूबाजूला ही गर्दी जमवलेली नाही ना? याचा काटेकोर, स्पष्ट विचार करायला हवा.. असे नातेसंबंध जपून जगण्यातले अनारोग्य वाढवण्यापेक्षा, आपल्याला सोबत लोकांचा गराडा हवाच हा मनाचा हट्ट कमी केला तर?? कघी चार लोकांसोबत तर कधी कधी एकटेपणाने जगण्यात सुद्धा किती मोठा आनंद आहें, शांतता आहे, सोपेपणा आहे हे कदाचित सहज समजून येईल.
ऑगस्ट २०१९ मध्ये, जेव्हा मी 'सोशल मीडिया डिटॉक्स चॅलेंज' स्वीकारले, तेव्हा पहिल्यांदा फेसबुक वापरणे बंद केले.. फेसबुकवर पोस्ट न करणे इथून सुरुवात झाली.. नंतर दिवसातून एकदा ब्राऊज करणे आणि आता तर दोनचार दिवसातून एकदा ५-१० मिनिटे इतकाच काय तो वापर होतो... महत्वाचे म्हणजे त्यामुळे माझ्या सोशल लाईफ मध्ये बिलबुल फरक पडला नाही... पण अनावश्यक ताण नक्कीच कमी झाला.
तसेच व्हॅट्स ऍप चे पण.. ग्रुप नोटिफिकेशन गेले वर्षभर बंद आहे.. पर्सनल नोटिफिकेशन ऑन असल्याने ते लगेच पहिले ही जातात.. otherwise दिवसातून २-४ वेळा व्हाट्स ऍप पाहिले जाते.. आणि तेवढे सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठी पुरेसे आहे असे मला वाटते..
-मी मधुरा..
१ सप्टेंबर २०२०
मिनिमलिझम आणि मी २...
पसारा आहे हे मान्य केल्यावर मग पुढे काय?
त्याकडे दुर्लक्ष करणे किंवा तो नाहीच असे समजून वावरत रहाणे.. हे अगदी सोपे उत्तर, पण एका मर्यादेनंतर असे वागणे ही अवघड जाते.. मग तो आवरण्याचा प्रयत्न करणे किंवा तो नजरेसमोरुन नाहीसा करण्याचा प्रयत्न करणे इतकेच काय ते हातात राहते..
२००८ ला अमेरिकेतून इंग्लंडला काही वर्षांसाठी प्रोजेक्टवर जाताना मी ह्या दिव्यातून गेले आहे.. आणि 'गरजेपेक्षा जास्ती गोष्टी खरेदी करायच्या नाहीत, सोसासोसाने जमावायच्या नाहीत' हा कानाला खडा ही लावला होता.. पण काळापरत्वे, तो खडा कधी गळून पडला हे कळलेच नाही.. काही गोष्टी काढून टाकणे, फेकून देणे तेव्हाही जमले नव्हते.. मुख्यत्वे करून ज्यामागे काही आठवणी आहेत, ज्यात भावना गुंतल्या आहेत.. 'आठवणींचा हिंदोळा' असे लिहिलेले कित्येक बॉक्सेस (हो हो बॉक्सेस) आजही स्टोरेज मध्ये पडून आहेत.
सगळ्यात जास्त पसारा, गोंधळ असणारे, किंवा तो आहे असं कायमच वाटणारे ठिकाण म्हणजे आपले कपड्यांचे कपाट. जेथे इंडियन, एथिनिक, वेस्टर्न, इंडोवेस्टर्न दाटीवाटीने वर्षानुवर्षे नांदत असतात..
ह्याशिवाय साड्या.. 'साडी' आवडता पोशाख असल्याने हा तर वेगळाच चर्चेचा विषय आहे.. आईनी हौसेनी घेतलेली पहिली साडी, लग्नातला शालू (जो त्याच दिवशी पहिला आणि शेवटचा नेसला), आजीची नऊवार पासून ते माझे स्वतःचे कलेक्शन.. पेटीकोट, ब्लाउजेस.. त्याचेही आता दोन-तीन सेट. न होणारे, होणारे, नव्या स्टाईलचे. त्यात रेडिमेडचीही भर...
जीन्स, ट्राउझर्स, कॅप्रीज, टॉप्स, टी-शर्ट, ब्लाऊजेस, स्कर्ट्स, मिडीज, ट्युनिक्स, चुडीदार, सलवार, पतियाळा, लेगिन्ग्ज, कुर्ते, ओढण्या, स्टोल्स....
न होणारे, वजन कमी-जास्त होईल तेव्हा घालू म्हणून ठेवून दिलेले, आठवणीखातर ठेवलेले कपडे काढून टाकणे, जुन्या सवयीच्या, प्रेमाने घेतलेल्या, दिलेल्या वस्तु फ़ेकून देणे सोपे नाही.
मॅचिंग बॅग्स, पर्सेस, क्लचेस तसेच सँडल्स, चप्पल, बूट यांची गणती तर संपतच नाही..
तसेच दागिन्यांचेही.. सोन्याचांदीचे लग्नातले, काही कारणाने घेतलेले दागिने, प्रेशस-सेमी प्रेशस स्टोन्स, बरोबरच मॅचिंगची बीड्स, कॉस्च्युम ज्वेलरी.. वापरात नसले तरी कधीतरी लागेल म्हणून ठेवलेले, किंवा कोणीतरी दिले आहे म्हणून जपून ठेवलेले असे अनेक दागिने..
कधीतरी लागतील म्हणून जपून ठेवलेले रॅपिंग पेपर्स, गिफ्ट बॅग्स, गिफ्ट बॉक्सेस…
स्वयंपाकघरातील पसारा... स्वयंपाकाची भांडीकुंडी काही जुनी काही आधुनिक.. जुनी टाकवत नाहीत आणि नवीन भांड्यांचा मोह सुटत नाही.. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स तर रोज शेकडोने बाजारात येतात... येथे ही आठवणींचा पसारा आहेच.. लग्नातल्या रुखवतापासून ते पिढीजात चालत आलेल्या वस्तू मोठ्यांचा आशीर्वाद म्हणून किंवा आठवण म्हणून जपून ठेवल्या जातात..
फोटो, फोटो अल्बम्स, ग्रीटिंग कार्ड्स, लेटर्स, मेमो बुक्स, सुविनीर्स हे सगळे कसे टाकून द्यायचे?... खरंच हा पसारा आहे का? पसारा असला तरी मन हे मानायला तयार होत नाही.. मग 'आठवणींचा हिंदोळा' असे लेबल लावून एका छनाश्या बॉक्स मध्ये जपून ठेवले जाते..
म्हणूनच आठवणींचा पसारा सगळ्यात मोठा आणि त्या पसाऱ्याचा भारही...
आवरायचा प्रयत्न करतानाच कळत जातं आपल्या आवरण्या पलीकडचा आहे हा पसारा...
हा सगळा पसारा आपणच निर्माण केलेला आहे.. आपला पैसा, वेळ, उर्जा खर्च करुन जमा केलेला आहे.. या वस्तु ना धड गरजेच्या, ना धड अडगळीच्या, पण मनाला सुख देणाऱ्या नक्कीच असतात..
-मी मधुरा..
१ सप्टेंबर २०२०
मिनिमलिझम आणि मी...
आज रविवार.. सकाळी सकाळी घर एकदम शांत आहे.. बाहेर पक्षांचा किलबिलाट सुरु आहे.. बाजूला छान कॉफीचा मोठ्ठा कप, ऋचाचा cozy बेड (शेजारी ऋचा आणि तिची प्रेमळ उब) आणि मांडीवर MacBook.. अहाहा.. माझी ideal sunday morning..
सध्या COVID च्या दिवसात सगळे दिवस तसे सारखेच.. त्यात summer break.. ना सकाळी उठायची गडबड, ना रात्री वेळेत झोपायचे बंधन.. 'सकाळी नऊ वाजता जिम हिट करायचे, किमान आठवड्यातील ४ दिवसतरी' म्हणून निदान आज weekend असा फील तरी आहे.. MacBook वर बऱ्याच windows open आहेत.. काल रात्री Netflix वर अर्धवट पाहून झालेला movie.. Google Drive वर वाचत असलेले पुस्तक.. Gmail.. Youtube वर रंगपंढरी.. Hotstar.. तेवढ्यात समोरच्या टेबलवर ठेवलेली ऋचाच्या पुस्तकांची थप्पी दिसते.. ही काल परवाच Amazon वरून order केलेली पुस्तके.. आता खरंच नवीन Book Shelf घ्यायला पाहिजे... पण किती हा पसारा.. ही पुस्तके तरी Kindle वर घ्यायला हवी होती.. तेवढाच पसारा कमी झाला असता.. पुस्तकांबरोबरच आजूबाजूला पडलेला पसारा मला दिसतो.. खोलीभर पहुडलेले Stuff Budies, pillows, कपडे.. कशी राहणार dorm मध्ये???.. माझी motherly concern..
ह्या motherly concern बरोबरच डोक्यात अनेक विचार डोकावू पाहतायेत.. अगदी parenting पासून ते ह्या long weekend ला काय करायचे, ह्यावर्षीची चुकलेली India trip, नवीन शाळेचे वर्ष कसे असेल? असे बरेच काही.. डोक्यात विचारांचा पण पसारा होऊ पाहतोय.. मनाच्या तळाशी अस्वस्थतेचा अजून एक नवा थर रचला जाण्याआधीच समोरचा पसारा माझे लक्ष वेधून घेतोय..
ह्या पसाऱ्याबरोबरच घरातील इतर पसाऱ्याच्या जागा मन शोधू पाहतय.. छान आवरलेल्या कपाटात ही नंतर बघू म्हणून ठेवलेले काही कपडे खुणावत आहेत.. दरवर्षी spring cleaning मध्ये नको म्हणून काढलेल्या, त्याचं आता नेमकं करायचं असा हताश प्रश्न पडल्याने गराज मध्ये नुसत्या पडून राहिलेल्या, कित्तेक वस्तू.. भारत भेटीत मिळालेल्या आणि इकडे देण्यासाठी म्हणून आलेल्या भेटवस्तू.. मॅटचिंगची कानातली-गळ्यातली.. कॉस्मॅटिकस, नेलपॉलिश लिपस्टिक च्या असंख्य शेड्स.. इमोशनल किपसेक्स.. आईने रुखवतात दिलेली भांडी ही अजुनी तशीच कोरी कपाटात पडून आहेत.. हे सगळं एकदा आवरायला हवय.. कशाकरता घेऊन ठेवलं हे आपण? याला उत्तर नाहीच. मग ह्या उस्तवारीचा नकळत मनावर एक नवा ताण निर्माण होतो आणि ह्या रोज न दिसणाऱ्या पण असणाऱ्या पसाऱ्याकडे दुर्लक्ष होतं.. घर मोठठं आहेना.. चलता हैं, हे attitude.. दुसरे काय?
अगदी आत्तापर्यंत जेवण हा प्रकार किती सोपा होता. पोळी,भाजी, आमटी, भात, कोशिंबीर, चटणी. पण आता जगासोबतच स्वयंपाकघरही ग्लोबल झालं आहे. आज इंडिअन, उद्या मेक्सिकन, परवा पिझ्झा, मग नूडल्स, तर कधी सूप आणि सॅलडच, तर कधी थाय, चाट हा ऑपशन तर कायमच on.. त्यामुळे ह्यासाठी लागणारे खास मसाले, निरनिराळी स्वयंपाकाची भांडी ही वाढत आहेत. दहा दुकाने फिरून ग्रोसरी करावी लागते ते वेगळेच.. त्यात डाएट कॉन्शस असेल तर पाहायलाच नको.. 'जेवण नको पण पसारा आवर'... अशी परिस्थिती..
अरे बापरे.. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स.. विचारानेच अंगावर काटा आला.. काही चालणारी, काही न चालणारी.. काही जेनरेशन ओल्ड पण चालणारी, काही नवीन टेकनॉलॉजि सपोर्ट न करणारी.. त्या वायर्स, त्यांचे चार्जेर्स, बॅटरीज.. इलेक्ट्रॉनिक स्टोरेज.. माझ्या व्यवस्थित ठेवण्याच्या वेडापायी, हे सगळे लेबल लावून, वेगवेगळ्या बॉक्सेस मध्ये छान जपून ठेवले आहे.. छान ठेवले तरी तो पसाराच ना..
तेवीस वर्षांपूर्वी, भारतातून इकडे अमेरिकेत येताना आणलेल्या चार बॅग्सचा इतका मोठ्ठा पसारा होईल असे वाटले नव्हते.. किती सुखाचे होते ते दिवस.. ना कसली चिंता ना कसली काळजी.. काळ सुद्धा शांत वेगाने पुढे जायचा.. तो वेग आता शतपटीने वाढल्याचं जाणवतंय.. सतत काहीतरी राहून गेलय, खूप काहीतरी करायचं राहिलय ह्यातून डोक्यात विचारांचा पसारा वाढत जातोय.. सतत कशाच्यातरी मागे धावता धावता क्षणभर थांबायचं राहतंय, मनातलं बोलायचं राहतंय, भावनांच्या गुंतागुंतीचा पण मनात पसारा होतोय..
हे सगळं एकदा आवरायला हवंय... फक्त गरजेच्या गोष्टी ठेवून बाकी सगळ्या 'देऊन टाकायला' हव्यात.. टाकून देण्यापेक्षा 'देऊन टाकलेले' केव्हाही चांगले.. 'someones junk is someones treasure'... नाही का?...
-मी मधुरा..
३० ऑगस्ट २०२०
Sunday, August 2, 2020
माझा लढा..
पहिला lockdown संपत असतानाच एके दिवशी सकाळी व्हाट्स अँप वर दीपकचे फॅन्सी PPE किट मधले फोटो, एअर प्युरिफायर लावून सज्ज असलेली OPD पहिली आणि रोजच्या कामाला लागले.. काम करता करता डोक्यात विचार आला, हे नक्की काय पहिले मी? दीपक अश्या ऍस्ट्रोनॉट किट मध्ये? कामात लक्ष लागेना.. म्हणून परत दिपकची पोस्ट नीट वाचली आणि लगेच त्याला मेसेज पाठवला.. सगळे ठीक आहे ना?.. काळजी घे.. पण डोक्यातून काही ते फोटोज जाईनात.. आता पहिल्यांदा COVID नामक मॉन्स्टर ची भीती वाटू लागली.. मग डोळ्यासमोर एक एक अत्पस्वकिय डॉक्टर्स, ह्या किट मध्ये दिसू लागले तशी अजुनी भीती, काळजी ह्यांनी मन घेरलं.. लांब असले कि जरा जास्तच जाणवते हेच खरे.. लगेच बाकीच्यांना फोन लावले.. त्यांचे ही त्यांच्या गरजे प्रमाणे OPD प्रोटोकॅल्स सेट करणे सुरु होते.. आपलं कोणी तरी अश्या परिस्थितीत स्वतःच्या जीवाशी खेळते आहे पाहून, न राहून ठणकावून विचारालेच.., "का सुरु केलीस OPD?, का रिस्क घेतो आहेस?, नाही काम केलेस तरी छान बसून खाशील इतके मिळवले आहेस ना?, दुसरे कोणी ..." आणि माझी मलाच लाज वाटली.. समोरून आवाज आला.., "दुसरे कोणी नाही म्हणून 'मी'.. असे नाही, हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे.. आणि मला हे मनापासून करायचे आहे.. ह्यात पैसे मिळवणे हा उद्द्येश आत्ता तरी नाही.." 'काळजी घे' म्हणून मी फोन बंद केला..
मग रोजच एक दोन चौकशीचे फोन होऊ लागले.. खूपदा VDO कॉल्सच.. शब्द बोलत नाहीत तेव्हा चेहरा बोलतो अशी आपली माझी समजूत.. आज OPD आहे का? किती पेशंट आहेत? Surgery आहे का? कोणत्या hospital ला?.. असे काही ठराविक मोजके प्रश्न.. समोरून अगदी शांतपणे माझ्या प्रश्नाची उत्तरे यायची.. आवाजात ना भीती, ना आपण कोणी ग्रेट आहोत ही भावना.. एकमेकांच्या डोळ्यात पाहून मूकपणेच आधार दिला जायचा.. कश्यापासून बनली आहेत ही माणसे? इतकी तठस्थ कशी राहू शकतात? भावना बोथट होतात का ह्यांच्या? परिणामांची कल्पना असताना, आपल्याला, आपल्या कुटुंबाला जीवाचा धोका असताना, हे काम करताना त्यांच्या मनात नेमकं काय सुरु असतं? मग ते हे सगळं चेहऱ्यावरून, शब्दातून का नाही व्यक्त करत?.. आता तर परिस्थिती अजुनी बिकट झाली आहे.. कोणत्याही डॉक्टरला कधी ही COVID सेंटर्स ना ड्युटी लागू शकते.. OPD, OTs बरोबर आता कम्पल्सरी आठ तासाची एक्सट्रा ड्युटी.. म्हणजे आता डायरेक्ट COVID च्या एरियात जाऊन लढायचे.. इतके सगळे करून पेशंटचे बरे वाईट झाले तर?? डॉक्टर ला ही वेगळी भीती आहेच.. अश्या परिस्थितीत सुद्धा ह्यांनी माणूसपण जपून ठेवले आहे.. हिपोक्रेटीक ओथ घेतलेले पांढऱ्या कोटातील हे मावळे अकर्मी योगीच.. नाही का?.. ह्या मावळ्यांचा मला सार्थ अभिमान वाटतो..
खरचं सात आठ महिन्यापूर्वी ह्यातील कित्त्येक गोष्टी आपल्याला माहिती ही नव्हत्या.. चायना, UK, America असा प्रवास करत, हा पाहुणा, कधी मुंबई, पुणे आणि आता चक्क आपल्या दारात उभा ठाकला कळालेच नाही.. सुरुवातीला lockdown ची मजा घेत dalgona coffee, नथीचा नखरा अशी वेगवेगळी challeges दिमाखात status वर झळकत होती, आता ती जागा boredom ने घेतली आहे.. सुरुवातीला प्रशासनाने घालून दिलेली chillout वाटणारी चौकट आता जाचक वाटू लागली आहे.. घालून दिलेल्या चौकटीत राहून new normशी जुळवून घेणाऱ्या, लहान मोठ्ठ्या शिलेदारांनी, ह्या चौकटी बाहेर जाऊन काम करणाऱ्या Front Line Heros, Warriors ना कधी टाळ्या तर कधी थाळ्या वाजवून, कधी दिवे उजळवून तर कधी पुष्पवृष्टी करून मानाची सलामी दिली.. त्यात ही एक वेगळा जोश, उत्साह, एकी पाहायला मिळाली.. पण आता सगळीकडे एक भीतीचे, नैराश्येचे सावट दिसते आहे..
असो.. अश्याही वातावरणात आपण घरी safe राहू शकतो ते ह्या Front Line Heros मुळे.. त्यात अगदी डॉक्टर्स, समाजसेवक, प्रशासन, पोलीस खाते या पासून ते बँक कर्मचारी, वाणी, दूधवाला, पेपरवाला सगळे सगळे आले.. माझ्या शाळेच्या ही ग्रुप मध्ये दीपक, चारू, पत्की सारखे डॉक्टर्स, ground level वर काम करणारी सरपंच सुनीता भोपे, जगण्यातील व्हिटॅमिन M जपणारी म्हणजेच बँकेत जॉब करणारी ललिता खलाटे ह्या front line heros बरोबर रक्तदान शिबीरसारखे उपक्रम आयोजित करून खारीचा वाटा उचलणारा महादेव.. यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.. guys thank you so so much.. तुम्ही बाहेर काम करता म्हणून, आम्ही आखून दिलेल्या चौकटीत का असेना, घरी स्वस्थ राहू शकतो.. तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा.. I Love You... love you all... and Happy Friendship Day!!
ही कविता तुम्हा सर्वांसाठी..
माझा लढा..
दख्खनच्या मावळ्यांना अश्या लढ्याचे काही वाटतच नाही..
हर हर महादेव म्हटलं कि रक्त कसं उफाळून येतं आणि
मग गनिम काय आणि यम काय सपशेल हार मानून जातं...
पण आजचा हा लढा काही वेगळाच आहे..
हा लढा आहे तो मानवता जपण्याचा, संकटे परतवण्याचा
माणसे जगवण्याचा आणि शांतता राखण्याचा..
पावित्र्य राखण्यासाठी, जगावरल्या प्रीतीसाठी संगरात झोकून देण्याचा..
खरचं, हा लढा काही वेगळाच आहे..
हा लढा आहे तो त्या न दिसणाऱ्या करोनाशी, रोज नवनवीन मिळणाऱ्या माहितीशी..
दोन वेळच्या भाकरीशी आणि लहानग्यांच्या चेहऱ्यावरील अनेक प्रश्नांशी..
मोठ्यांच्या डोळ्यातील काळजीशी, हा लढा आहे स्वतःचाच स्वतःशी..
पण हा वेगळा लढा मी लढते आहे..
झाकून घेऊन स्वतःचा चेहरा, बुरखा मनावरचा फेडला..
स्वतःची तमा तर नव्हतीच पण काळजीला ही जागा नव्हती..
माझ्या कर्तव्याने मला निवडले होते, चिलखत घालून धाडले होते..
मग निघाले तडक लढायला, मानवतेला जपायला..
एकजुटीची मशाल हाती घेऊन, ह्या देशाचा मावळा होऊन...
ह्या देशाचा मावळा होऊन, हा लढा मी लढते आहे, हा लढा मी लढते आहे...
-मी मधुरा..
२ ऑगस्ट २०२०
Wednesday, July 22, 2020
तो आणि ती
ह्या गोष्टीत पण आटपाट नगर आहे.. आणि ह्या नगरात आहेत आपल्या कथेचा नायक "तो" आणि नायिका "ती"...
"तो" हुशार, चुणचुणीत, सगळ्यांच्या गळ्यातला ताईत.. त्यामुळे थोडासा 'मी शहाणा' असे समजणारा..
आणि "ती" गोबऱ्या गालांची, काळ्या-कुरळ्या, लांब केसांची, स्वतःच्याच भावविश्वात रमणारी..
"तो" तसा जगनमित्र, पण "ती" मोजक्याच चार मैत्रिणींच्या टोळक्यात राहणारी...
दोघांचे जग एकदम वेगळे पण तरी एकमेकांच्या समांतर जाणारे.. बालपणीचा काळ सुखाचा असे काहीसे गेलेले बालपण.. दोघं एकाच गावात लहानाची मोठ्ठी झाली..
एकाच शाळेत जात असली तरी वर्ग मात्र दोघांचे वेगळे.. खाकी चड्डी पांढरा शर्ट मधला "तो" मुलांच्या वर्गात तर निळा स्कर्ट पांढरा ब्लाउज मधली "ती" मुलींच्या.. अव्वा इश्य करायच्या वयात मात्र दोघे एका वर्गात आले.. नुकतंच मुसुरड फुटलेल्या त्याची आणि वयात आलेल्या तिची एका नवीन जगाशी ओळख होऊ लागली...
ती:
तो:
ओठावरच्या शब्दांना अर्थ समजला तुझ्यामुळे
असं वाटणं, सतत तुझाच विचार करणं, म्हणजे प्रेम असेल तर हो मी नक्कीच प्रेमात आहे...
💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
वर्गातल्या नजरा नजरीचे हे खेळ आता शाळेत, शाळेबाहेर ही घडू लागले.. एकमेकांचे टाईम टेबल आपसूकच पक्के झाले.. क्लासला, शाळेला जाण्यायेण्याची वेळ दोघे साधू लागले.. एकमेकांना पहिल्या शिवाय जगणे अशक्य वाटू लागले..
नुसते सूचक बघत राहतेस
ती:
लाजले बुजले तरी, अपेक्षा आहे मला
खरं तर आतुर आहे तुला प्रतिसाद देण्यासाठी
वाट पाहते आहे तुझी, सोबतीने चालण्यासाठी...
मनातले असे संवाद मनातच होत राहिले.. दोघांच्या ओठांवर ते कधी आलेच नाहीत.. भावनांची मनातील कोंडी कशी फोडायची हे, ना तिला कळत होतं ना त्याला.. हळूहळू नजरेची देवाणघेवाण, एकमेकांचे अस्तित्व सवयीचं झालं.. नजरेच्या बोलाचालीत, मोहक धुंदीत दिवस मात्र भराभर सरत होते..
ती:
ब्रेकअप व्हायला, आधी जुळायला तर हवेना
मग हे काय होतंय मला, काहीच कसं कळेना
जेवण जाईना, झोप येईना, कशातच मन रमेना
कोणाशी बोलवेना, घरी जावेना, आयुष्यात रसच वाटेना
रोज तुला पाहून, नव्याने प्रेमात पडायला मन नाही म्हणेना
पेपर कोरा टाकून, मैत्रिणींशी भांडून रागाचा सौदा काही पटेना
दुःखाचं आभाळ फुटलं तरी मळभ काही हटेना
प्रेमाचे बीज खोलवर रुजलं तरी अंकुर काही फुटेना
मग हे काय होतंय मला, काहीच कसं कळेना
ब्रेकअप झाला तरी मन कसं मानेना, मन कसं मानेना..
बघता बघता दहावीचे वर्ष उजाडलं.. अभ्यासाचं, बोर्डाच्या परिक्षेचं वारं वाहू लागलं.. "तो" तर हुशार आणि जिद्दी.. कसलीच अपेक्षा नसलेली "ती" ही आता अभ्यासाला लागली.. नजरानजर होत होती.. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकतच होती.. "तो" मात्र स्वतःच्या धुंदीत होता.. नजरेने तिला काही तरी सांगायचा प्रयत्न करत होता.. तिच्या मनाची घालमेल त्याच्या ठावी ही नव्हती..
तो:
का छळतेस तू मला अशी?
बसलो असा अभ्यासाला की,
रुंजी घालत फिरत असतेस अवतीभोवती..
अन तुझ्या टपोऱ्या डोळ्यात निराळेच विश्व दिसू लागतं..
तिथे असतं माझं राज्य, ज्याचा असतो मी राजा अन तू राणी..
दिवसभर हातात हात गुंफून आपण मग बागडत राहतो,
कधी नदीकाठी तर कधी बागेत रममाण होतो...
तुझ्या निरर्थ बडबडीत वेळ कसा जातो कळतच नाही..
पुस्तकाचं पान उलटायचं मग भान ही रहात नाही..
छळू नकोस राणी तू मला अशी
संपवून अभ्यास परत येईन तुझ्यापाशी..
प्रिलिम झाली.. सेंड ऑफ चा दिवस ही उजाडला..
आज "तो" आणि "ती" जीवाची होणारी घालमेल लपवत होते.. नजरेच्या कोपऱ्यातून एकमेकांचा अंदाज घेत होते.. व्यक्त होण्यासाठी धडपडत होते.. कारण आज नंतर कदाचित परत ते कधी भेटणार नव्हते..
तुला प्रेमात पाडायचं राहूनच गेलं..
ओठावर आलेले शब्द तसेच सांडून गेले
डोळ्यात दाटलेले भाव तिथेच विरून गेले
चंद्र तारे तोडून द्यावेत असं मनात यायचं
पण हे शक्य नाही लगेच ध्यानात यायचं
मग मी माझी इच्छा फुलावरच भगवायचो
पण ते फुल ही पुस्तकातच सुकून जायचं
सगळी तयारी, सगळी हिम्मत नेहमी अशीच फुकट गेली
तिच्यासाठी असलेला हळवा कप्पा ती न पाहताच निघून गेली..
ती:
परीक्षा झाली.. रिझल्ट लागला..
पण आज सुद्धा "तो" तिला नाही दिसला.. मन खट्टू झालं.. जड मनानेच मैत्रिणींबरोबर सेलिब्रेशन झालं..
मार्क्स कमी पडल्याचं सल खूप मोठठंय.. Good for Nothing ही जाणीव जीव घेतीय माझा.. "ती"ला पाहायचंय, "ती"ला भेटायचंय... त्यानं तरी मन शांत होतंय का पाहायचंय..
शब्दांवाटे नाही तरी डोळ्यांवाटे वाहून जातंय..
छोट्या भेटी, आठवणीतील असंख्य गोष्टी
विखुरलेल्या क्षणांमध्ये मन तुला धुंडाळतंय
शब्दांवाटे नाही तरी डोळ्यांवाटे वाहून जातंय..
तुझा दरवळ, तुझा श्वास, सगळीकडे तुझाच भास
कोसळणाऱ्या पावसामध्ये तुझ्या संगे मन कसं चिंब होतंय
शब्दांवाटे नाही तरी डोळ्यांवाटे वाहून जातंय..
"तो" आणि "ती... आणि यांच्या आयुष्याचा नवा टप्पा.. नवं कॉलेज, नवी आव्हानं, नवीन मित्र मैत्रिणी, नवी स्वप्नं.. सगळंच नवं.. पण दोघांची वेगळी अशी दोन नवीन विश्व..
दोघांचं विश्व पार बदलून गेलं..
ती:
आपापल्या विश्वात दोघंही रुळले असले तरी त्याने तिला आणि तिने त्याला मनाच्या हळव्या कुपीत जपून ठेवले होते. शेवटी त्या अल्लड भावनांचे, अवखळ प्रेमाचे दोघं सोबती होते..
ती:

तो:
तिच्या आठवणींचा सुगंधी रेशमी रुमाल हृदयाच्या कप्यात मी लपवून ठेवलाय.. अस्वस्थ झालो कि अलगद बाहेर काढून तिला श्वासात भरून घेतो.. आणि जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे सगळं जग एकदम बदलून जातं..
खरंच कशी असेल "ती"? पूर्वी होती तशीच का काळानुसार बदलली असेल?
अशीच असेल का ती अजुनी
स्वतःत रमणारी, इतरांना जपणारी
आनंद झाला कि खळखळून हसणारी..
अशीच असेल का ती अजुनी
थोडी समजुतदार, थोडी भांडणारी
लहान सहान कारणावरून रुसून बसणारी...
अशीच असेल का ती अजुनी
डोळ्याने बोलणारी अन हसून लाजणारी
हवं ते मिळाल्यावर गिरकी घेऊन नाचणारी...
जशी आहेस तशी मला हवी आहेस
रुणझुणत्या पावलांनी, किणकिणत्या हातांनी
साथीने चालायला, स्वप्ने साकारायला तू मला हवी आहेस..
कॉलेज संपलं, जॉब सुरु झाले.. "तो" आणि "ती" आपल्या आयुष्यात स्थिरस्थावर झाले.. इतक्या वर्षात दोघांचे अनेक मित्रमैत्रिणी झाले पण तिला त्याच्या सारखा दुसरा "तो" आणि त्याला तिच्या सारखी दुसरी "ती" सापडलेच नाहीत.. धम्माल आयुष्य जगताना त्या खास व्यक्तीची कमी दोघांना जाणवत होती..
आज दोघेही जरा खुशीतच होते.. निमित्य, शाळेचा अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचं!.. शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना आलेल्या त्या आग्रहाच्या आमंत्रणाचं!.. लगेचच मित्र मैत्रिणींना फोन झाले.. दोन दिवस आधीच भेटायचं ही ठरलं.. आणि गावाबाहेरचं छान रिसॉर्ट ही बुक झालं.. "ती" येईल का? "तो" येईल का?.. "तो" जातो आहे तसे "ती" ही येईलच.. असा विचार त्याने केला.. तसाच तिने ही.. सळसळत्या उत्साहात दोघांची तयारी सुरु झाली..
भेटीचा दिवस उजाडला.. शाळेनंतर तब्बल आठ वर्षांनी सगळे एकत्र भेटणार.. शाळेत एकमेकांशी बोलायला बुजणारे मुलं मुली एकमेकांना भेटायला उत्सुक होते.. "तो" जरा लवकरच रिसॉर्टवर आला.. तो मित्रांना भेटत होता पण त्याची नजर "ती"ला शोधात होती.. तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात "ती" मात्र दिसत नव्हती.. तिच्याबद्दल विचारावे का कोणाला?.. येणार नसेल तर लगेच निघता ही येईल... हा विचार करत असतानाच मागून खळखळून हसण्याचा आवाज आला आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला.. दरदरून घाम आला.. त्याने मागे वळून पाहिलं.. हो.. तीच.., तीच होती "ती"!.. निळ्या सलवार कमीझ मध्ये.. दोन वेण्यांत बांधलेले तिचे काळे कुरळे केस आज वाऱ्यावर मोकळे उडत होते.. किती सुंदर दिसतेय.. तिच्याकडे नुसते बघत राहावंसं वाटतंय.. आज मात्र तिला सांगितलाच पाहिजे.. आज नाही तर परत कधीच नाही.. असा विचार त्याने केला.. इतक्यात "ती"ची भिरभिरती नजर त्याच्यावर पडली.. दोघांची नजर नजर झाली.. अगदी शाळेत व्हायची तशीच.. पण ह्यावेळी त्याच्या नजरेने तिच्या मनाचा खोलवर ठाव घेतला होता.. आणि ती किंचितशी लाजली.. कसला स्मार्ट दिसतोय हा!!.. उंचापुरा, मस्त कमावलेलं शरीर, छान ट्रीम केलेली फ्रेंच बिअर्ड.. आणि कॉन्फिडन्ट पण..
दिवसभर "तो" आणि "ती" एकमेकांचा अंदाज घेत, नजरेच्या टप्प्यात होते.. न जाणो कधी बोलायचा चांन्स मिळेल.. आणि तो चांन्स मिळाला.. संध्याकाळी भेटायचं ही ठरलं..